Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत काल पासून अनेक चिठ्ठ्या कर्मचाऱ्यांच्या हाती

Marathi Breaking Live Headlines Updates : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल, पूर्णेकर हत्या प्रकरण,मनोज जरांगे, ज्ञानेश कुमार निवडणूक आयोग, हवामानाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत काल पासून अनेक चिठ्ठ्या कर्मचाऱ्यांच्या हाती

- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत काल पासून अनेक चिठ्ठ्या कर्मचाऱ्यांच्या हाती.

- एका उमेदवाराचा नाम उल्लेख करत थेट चिठीतून शिवीगाळ.

- पदवी केली पश्चाताप झाला, एका चिठ्ठीत उल्लेख.

- अंशतः मान्यताप्राप्त शाळांना शंभर टक्के अनुदान द्याव

- एका उमेदवाराचे नाव घेऊन आता थांबा असे उल्लेख.

Nashik : महामार्गावर दुचाकीचा भिषण अपघात,दोन जण ठार

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवल्याच्या अंदरसुल जवळ दुचाकी व टाटा सुमो गाडी यांच्यात झालेल्या अपधातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ मतमोजणी अपडेट

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ मतमोजणी अपडेट

गेल्या 24 तासांपासून अमरावती शिक्षक मतदार संघाची मतमोजणी सुरूच

17 व्या बाद फेरी अंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 3650 हजार मतांनी आघाडीवर...

काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे ह्या शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांच्यावर मात करत आल्या दुसऱ्या क्रमांकावर

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

दुपारी 2 नंतर सुप्रीम कोर्टात शिंदे सेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग अणि ध्रुव मेहता करणार युक्तिवाद

पक्ष आणि चिन्ह याबाबतचा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर शिंदे सेना आमदार अपात्रता प्रकरणी आणि विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराबाबत युक्तिवाद करण्याची शक्यता

त्यामुळे सुप्रीम कोर्टातील सुनावणी कडे राज्याचे लक्ष लागले आहे

नागपूर पदवीधर निवडणुकीतील चुरस वाढली

- नागपूर पदवीधर निवडणुकीतील चुरस वाढली

- आवश्यक असलेला 75 हजार 438 मतांचा कोटा कोणताही उमेदवार गाठू शकणार नाही

- त्यामुळे उमेदवारांचे एलिमीनेशन (बाद होणे) सुरू झाले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com