मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि मंत्री यांच्यासोबत अजित नवले आणि शिष्टमंडळ यांच्यासोबत चर्चा झाली
दुसरा मोर्चा विजय पंडित यांच्या नेतृत्वात होतात त्यांच्यासोबत ही चर्चा झाली
महत्वाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झालेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः चर्चा केलेली आहे मोर्चाचं समाधान होईल अशी चर्चा झाली
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. किरण सरनाईक यांना 3,903 मते मिळाली असून त्यांनी श्रीकांत देशपांडे यांच्यावर 1,694 मतांची आघाडी घेतली आहे. श्रीकांत देशपांडे यांना 2,209, आदिती पोहरे यांना 1,319, तर दत्तात्रय लहाने यांना 1,169 मते मिळाली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील कंधार शहराबाहेरील नगरपरिषदेच्या डंपिंग ग्राऊंडला आज दुपारी अचानक आग लागली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याने पेट घेतल्याने काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. या आगीमुळे कंधार-लोहा रस्त्यावर धुराचे लोट पसरले होते.
पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 15 गोविंदांना जामीन मंजूर झाला आहे. पालघर सत्र न्यायालयाने 15 गोविंदांना जामीन मंजूर केला. आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जामिनाचा निर्णय घेण्यात आला.
रॅपिडो (Rapido) कंपनीने पुणे जिल्ह्यात बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ॲग्रीगेटर परवाना प्राप्त केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. परवान्याविना बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत संबंधित कंपनीविरुद्ध १६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई तालुक्यातील आसले येथे आयोजित विशेष कार्यक्रमात श्रीमंत सरदार वाघ घराण्याच्या अधिकृत बोधचिन्ह व मुद्रेचे दिमाखात अनावरण करण्यात आले. राज्यभरात विखुरलेल्या वाघ घराण्यातील सदस्यांना एकत्र आणून परस्पर संवाद वाढवणे आणि घराण्याचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मिरचीच्या हंगामावर दुष्काळाचे मोठे सावट आहे. पावसाची दडी आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे यंदा मिरचीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी वेळेआधीच पिकावर नांगर फिरवल्याने मिरचीचे अर्थकारण कोलमडले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पावसाअभावी दुष्काळाची तीव्रता वाढली असून शेतीत पीक न आल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. वरझडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ७ पाड्यांतील तब्बल ८० टक्के नागरिकांनी उदरनिर्वाहासाठी मोठ्या शहरांसह परराज्यांचा रस्ता धरला आहे.
बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेलवली परिसरात धडक कारवाई करत मुख्य रस्त्यालगतची अतिक्रमणं हटवली. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य हायवेवरील सिग्नलजवळ ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमणांमुळे बदलापूर-कल्याण रस्त्यावर, विशेषतः अंबरनाथकडून मांजर्ली, गणेश चौक आणि शनिनगरकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी होत होती.
अमरावतीत महायुतीतील शिंदे सेनेचे उमेदवार किरण सरनाईक मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत किरण सरनाईक आघाडीवर असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांनी तूर्तास कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. संपूर्ण मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचे किरण सरनाईक यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि नारायणगाव परिसरातील चार घरफोड्यांचा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांना यश मिळालं. या प्रकरणी चार जणांना अटक करून सोनं, चांदी, रोख रक्कम आणि कार असा ३८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथे फ्लॉवरला अवघा ३ ते ४ रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी रमेश डुंबरे हतबल झाले आहेत. दीड एकर पिकासाठी ८० हजार रुपये खर्च करूनही तोडणी आणि वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने त्यांनी पिकात मेंढरं सोडली आहेत.
दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी फिरलंय! जुन्नर तालुक्यातील खामुंडीमध्ये फ्लॉवरला अवघा ३ ते ४ रुपये किलो भाव मिळत असल्याने हतबल शेतकरी रमेश डुंबरे यांनी चक्क आपल्या दीड एकर फ्लॉवर पिकात मेंढरं सोडली आहेत. ८० हजार रुपये खर्च करून उभं केलेलं पीक, पण बाजारभावाअभावी तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघेना. त्यामुळे दिवाळीत आनंदाऐवजी शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणणारी वेळ आलीय. कष्ट शेतकऱ्याचे, पीकही शेतकऱ्याचे, पण त्याला योग्य भाव कधी मिळणार, हा प्रश्न समोर आलाय
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने पात्र कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
अधिसंख्य पदांसाठी वार्षिक ९८३ कोटी ८० लाख रुपयांच्या खर्चास शासनाची मान्यता
१० वर्षांहून अधिक काळ आरोग्यसेवा देणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नावर निर्णय
पात्र कर्मचाऱ्यांचे सध्याचे वेतन संरक्षित; मूळ वेतनासह महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता लागू
वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेविका, औषधनिर्माते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना लाभ
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय
5 महामंडळांसह क्षेत्रिय कार्यालयांसाठी सुधारित आकृतिबंध निश्चित
एकूण 1 हजार 450 सिंचन शाखा कार्यालयांसाठी पद निर्मिती
एकूण 15 कार्यकारी अभियंता दर्जाच्या पदांची निर्मिती
कॅबिनेट बैठकीत मिळाली मंजुरी
बुलढाणा : वाढदिवसाचा केक तलवारीने कापून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे. ओम काकडे (रा. सागवान) असे आरोपीचे नाव आहे. परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने रील पोस्ट केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी आरोपीकडून ४१ सेंटीमीटर लांबीची धारदार तलवार जप्त केली असून, त्याच्याविरोधात आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे : पूर्णेकर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करत पूर्णेकर समर्थकांनी नौपाडा पोलीस ठाण्याबाहेरील रस्ता अडवला आहे. समर्थकांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केल्याने परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून, वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आरोपींच्या अटकेची मागणी करत समर्थक आक्रमक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आंदोलनामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
कुडाळ शहरातून रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नावरून ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. गणपतीपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन देऊनही काम झाले नसल्याचा आरोप करण्यात आला. दिवाळीपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे, अन्यथा रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
डोंबिवली जवळील हेदुटणे गावाजवळ MIDC च्या बदलापूर काटई पाईप लाईनवरून पाणी चोरी
टँकर माफियांकडून जमिनीखालुन पाईपला छिद्र पाडून पाणी चोरी
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि कारची जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. गुहागर आणि चिपळूणदरम्यान झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. धडक इतकी जोरदार होती की मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती; मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नाशिक : येवला तालुक्यातील नगरसुल येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून माजी सरपंच आणि शेतकरी प्रमोद पाटील यांचा २७ ट्रॉली मका चारा जळून खाक झाला. जनावरांसाठी घरासमोर साठवून ठेवलेला हा चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कुटुंबीयांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत सर्व चारा जळून खाक झाला. आधीच दुष्काळी परिस्थिती असताना या घटनेमुळे पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी महायुतीच्या सर्व बारा संचालकांनी बैठकीला उपस्थित राहावं, यासाठी आपण महायुतीच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत फोनवरून आपला संपर्क झाला असून त्यांना आपण विनंती केल्याची माहिती देखील. गोकुळचं नुकसान टाळण्यासाठी आणि स्वर्गीय आनंदराव चुयेकर यांच्या योगदानाचा सन्मान राखण्यासाठी शशिकांत चुयेकर यांना अध्यक्ष करण्यासाठी सर्व संचालकांनी सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. येत्या २९ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत महायुतीचे संचालक सहभागी होतील, असा विश्वासही सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई गोवा महामार्गावर अपघात; दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू
० माणगावच्या आडघर गाव हद्दीत झाला अपघात
० चुकीच्या डावर्जनने घेतला निष्पाप दुचाकीस्वाराचा बळी
० अपघाताचे दृष्य CCTV मध्ये कैद
मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस आणि नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात एमएसएफ सेक्युरिटी गार्डची दादागिरी उघड
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी असभ्य वर्तन, व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल
गाभाऱ्यात भाविक आल्यानंतर देवीचे दर्शन न घेवु देताच सेक्युरीटी गार्ड जनावरांप्रमाणे बाजुला ढकलत असल्याचा प्रकार समोर
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातुन भाविक तासनतास रांगेत थांबुन दर्शनासाठी येत असतात मात्र सेक्युरीटी गार्ड दर्शन होवु न देतात ढकलत असल्याने भाविकांत नाराजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात दाखल
राणा सूर्यवंशी यांची Y+ सुरक्षा कायम; पुण्यातील २० जणांची सुरक्षा काढली
राणा सूर्यवंशी यांची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्याचा गृह विभागाचा निर्णय.
सूर्यवंशी यांना आता वाय-प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा मिळणार असल्याची माहिती.
पुण्यातील २० महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था गृह विभागाकडून हटवण्यात आल्याचा दावा.
* ठाण्यात गुन्हेगारी विरोधात सर्वपक्षीय एल्गार!
* ‘भयमुक्त ठाणे’साठी चिंतामणी चौकात महाआंदोलन!
* प्रदीप पूर्णेकरांना न्याय द्या; पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!
* एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्यासाठी २९ ऑक्टोबरला ठाण्यात महाआंदोलन!
* जांभळीनाका येथील चिंतामणी चौकात होणार सर्वपक्षीय शक्तिप्रदर्शन!
पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या दांडीपाडा येथे २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
प्रतीक भगवान डुकले असे मृत तरुणाचे नाव आहे. या मृत्यूबाबत त्याच्या आई-वडिलांनी संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांचे निधन
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गायकवाड यांची गाडीतच प्राणज्योत मालवली
आज घरातून कामासाठी निघाले असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला
रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापूर्वीच निधन झाल्याची माहिती
ठाकरे सेनेतून फुटलेल्या बंडखोर खासदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
6 बंडखोर खासदारांचे विलिनीकरण वैध ठरवण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरेसेनेने दिलं आहे आव्हान
ठाकरे सेनेच्या 6 खासदारांनी शिंदे सेनेत विलीन होण्याचा घेतला निर्णय
शुद्ध इथेनॉलवर चालणाऱ्या ई-१०० वाहनांचा मार्ग मोकळा
पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांना गती देताना केंद्र सरकारने शंभर टक्क्यांपर्यंत इथेनॉल वापरू शकणाऱ्या वाहनांसाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा केली
ई२० किंवा सामान्य पेट्रोलसाठी तयार केलेल्या वाहनांमध्ये ई-८५ अथवा ई-१००इंधन वापरता येणार नाही
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात मनोज जरांगे मैदानात
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील भीमाशंकर कर्जत दौऱ्यासाठी रवाना
आज बीड जिल्ह्याचा दौरा करून उद्या म्हणजेच 28 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील कर्जत येथे सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या ठिकाणी भेट देणार आहे
निवडणूक आयोगाविरोधातील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या याचिकांवर आज सुनावणी
ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी आणि सदोष SIR प्रक्रिया रद्द करण्याची याचिकेत मागणी
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी
मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती
लातूरच्या शिरूर तालुक्यातील राणी अंकुरगा येथे
28 वर्षीय दत्तात्रय कुंभार या तरुणाने दुष्काळी परिस्थितीत खाजगी फायनान्स आणि बँकेच्या जाचाला कंटाळून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे,
राज्य मंत्री मंडळाच्या दुष्काळ निवारण उपसमितीची आज बैठक
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
राज्यातील 304 दुष्काळी तालुक्यांमधील उपाययोजनांचा घेणार आढावा
सध्याच्या काळात माणूस आणि मुक्या प्राण्यातील ऋणानुबंध दुर्मिळ होत असताना,सोलापुरातील मराठा वस्तीत माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले आहे.
तब्बल 19 वर्षे कुटुंबाचा आधारवड ठरलेल्या 'बांगडी' नावाच्या म्हशीचा मृत्यू झाल्यानंतर,हुच्चे कुटुंबियांनी घरातील जेष्ठ व्यक्तीप्रमाणे ट्रॅक्टरमध्ये अंत्ययात्रा काढून म्हशीला शेवटचा निरोप दिला आहे.
मुंबईच्या दिंडोशी परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर
गोरेगाव पूर्वेतील संकल्प गार्डनच्या मैदानात बिबट्या खुलेआम फिरताना दिसला
बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरात भीतीचे वातावरण
दिंडोशी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वाहतुकीदरम्यान तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता
अनेक तास लोकल सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती
जळगाव जिल्हा बँक निवडणूक पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री
रक्षा खडसेंसह सावकारे, कोलते, सोनल पवारांनी घेतले अर्ज
आई राजा उदो उदो जयघोषात तुळजापुरात पाच लाखांवर भाविकांनी अश्विनी पौर्णिमेचा खेटा केला पूर्ण
महाराष्ट्रासह,आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांची गर्दी
सोलापुरातील मानाच्या काट्यांसह अश्विन पौर्णिमेची छबिना मिरवणूक पडली पार
येरवडा गोल्फ चौकात जीन्स पॅन्टच्या वादातून मारामारी
येरवडा गोल्फ चौक परिसरात जीन्स पॅन्ट चोरीच्या संशयावरून भर सिग्नलवर मारामारी.
दुचाकीस्वाराने दुकानातून जीन्स पॅन्ट चोरल्याचा दुकानदाराचा आरोप.
गोल्फ क्लब परिसरात दुकानदाराने दुचाकीस्वाराला गाठून विचारला जाब.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मसाले, फरसाण उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
लसण चिवडा, मिक्स फरसाण आणि नमकीनचा एकूण 6 लाख 60 हजारांचा साठा जप्त
अस्वच्छ वातावरणात उत्पादन आणि कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून कारवाई.
वाशिम - देवाच्या आणि हिंदूंच्या नावाने मते मागून सत्ता मिळवली
प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर आरोप
दिवाळीनंतर दुष्काळ भीषण होणार आहे
सरकारने जनतेच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
सरकारने व्यवस्था केली नाही तर RSS, भाजप आणि बजरंग दलाच्या प्रमुखांच्या घरांसमोर जाणार
जनतेच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याची त्यांना मागणी करणार
यवतमाळ -
यवतमाळ शहरातील नगर परिषदेच्या खुल्या जागेत लागली आग
शहरातील अभ्यंकर कन्या शाळे समोर असलेल्या मिनी डंप ग्राउंडला लागली आग
शहरातील मध्यभागी आग लागल्याने नागरिकांमध्ये काही काळ पसरले होते भीतीचे वातावरण
अग्निशमन दलाच्या २ बंबानी विझवली आग
अग्निशमन पथकाने अथक प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.