पुणे, ता. २१ मे २०२४
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सकाळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाबाबत सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर पालक, विद्यार्थ्यांची रिझल्ट पाहण्यासाठी एकच गडबड घडाल्याने सुरूवातीच्या काही मिनिटातच वेबसाईट डाऊन झाल्याचा प्रकार घडला. मात्र त्यानंतर तात्काळ सुरळितपणे वेबसाईट सुरू झाली.
सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर, Maharashtra HSC Result 2024 या लिंकवर क्लिक करा.
आता तुमचा परीक्ष क्रमांक टाईप करा.
त्यानंतर तुम्हाला स्क्रिनवर Maharashtra HSC Board Result 2024 दिसेल.
तुमचा निकाल व्यवस्थितपणे तपासून घ्या आणि डाऊनलोड करून घ्या.
या डाऊनलोड केलेल्या निकालाची तुम्ही प्रिंट देखील काढू शकता.
दरम्यान, यंदा बारावी परीक्षेसाठी एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी या परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालामध्ये यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आले. तर कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागातील ९७.५१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के इतका सर्वात कमी निकाल लागला आहे,
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.