Nitin Desai : मोठी बातमी! नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात, कोण पाहणार कामकाज?

Nitin Desai News : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेतला आहे.
मोठी बातमी! नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात, कोण पाहणार कामकाज?
Nitin Desai Saam tv
Published On

मुंबई : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी. स्टुडीओ हा राज्य सरकारच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडिओला भेट दिली. तसेच कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडिओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

एनडी स्टुडिओची पाहणी करण्यासाठी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उप सचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता ( स्थापत्य ) विजय बापट, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी हजेरी लावली.

मोठी बातमी! नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात, कोण पाहणार कामकाज?
1st Marathi Movie Released On Jio Studio: ‘मी वसंतराव’ जिओ स्टुडिओवर प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट.. कधी? केव्हा? पाहता येणार, जाणून घ्या

राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने महामंडळाने सादर केलेल्या संकल्प ठरावाला १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मान्यता दिली. त्यानंतर एन.डी.स्टुडीओचे दैनदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार आहेत. त्यामुळे सर्व कामकाज जाणून घेण्यासाठी खारगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एन.डी. स्टुडिओची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यवस्थापनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नियमित कार्यप्रणाली समजून घेतली.

विशेष कृती पथकाची स्थापना

प्रशासकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक यांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आलीये. महामंडळाच्या या पथकामध्ये सह व्यवस्थापकीय संचालक समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी उप समन्वयक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्यलेखावित्तधिकारी, व्यवस्थापक कलागारे, उप अभियंता ( स्थापत्य ), उप अभियंता (विद्युत) आदि अधिकारी हे सदस्य म्हणून काम पाहणार असल्याची माहिती मिळाली आहे. याचबरोबर वित्तीय, विधी, आयटी, मनुष्यबळ क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

मोठी बातमी! नितीन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात, कोण पाहणार कामकाज?
Nitin Desai Life Journey: 'ट्रकभर स्वप्नाचा' एका क्षणात शेवट, असा होता नितीन देसाई यांचा जीवनप्रवास

आता व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील प्रशासकीय कामकाज पाहणार असल्याची माहिती मिळआली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com