Me Vasantrao On Jio Studio: जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’ लवकरच डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या वर्षी अनेक फिल्म महोत्सव तसेच भारतीय सिनेमागृहात प्रदर्शित होताच देशभरातून समीक्षकांची दाद मिळालेल्या ह्या सिनेमाला प्रेक्षकांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.
एवढेच नव्हे तर प्रेक्षक OTT वर हा सिनेमा कधी बघायला मिळेल याची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे कारण जिओ सिनेमावर २१ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)
'मी वसंतराव' या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ९५ व्या ऑस्करसाठी जगभरातील ३०१ चित्रपटांची रिमांइंडर लिस्ट जाहीर केली होती यांमध्ये ‘मी वसंतराव’ चा समावेश होता.
जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट 'मी वसंतराव' पासून जिओ सिनेमावर मराठी चित्रपटांच्या डिजिटल वर्ल्ड प्रीमियरची सुरवात होणार आहे. पुढे ही जिओ स्टुडिओजचे आगामी प्रोजेक्ट्स ज्यात नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे चित्रपट, नव्या धाटणीचे वेब शोज, आणि मनाला भिडणाऱ्या अप्रतिम कथा यांचा समावेश असणार आहे.
गायक राहूल देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल देशपांडे म्हणाले की, ‘मी वसंतराव’ हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातू, एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो. त्यातील गाणी आणि संगीत दिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.
आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली याच्यासाठी मी आभारी आहे आणि आता आमच्या चित्रपटाचे जिओ सिनेमावर डिजिटल वर्ल्ड प्रीमियर होणार आहे त्यामुळे आमची ही कलाकृती जगभरातील सगळे प्रेक्षक बघू शकतील याचा मला खूप आनंद होतोय. त्यांच्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.