Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-अनिरुद्धच्या अश्रूंचा बांध फुटला; शेवटी मिलिंद गवळी म्हणाले, आई...

Madhurani Gokhale-Milind Gawali emotional : 'आई कुठे काय करते' या मालिकेचे शूटिंग संपले आहे. मालिकेच्या आठवणीत अरुंधती-अनिरुद्ध भावूक झाले.
Madhurani Gokhale-Milind Gawali emotional
Aai Kuthe Kay KarteSAAM TV
Published On

अनेकांची आवडती मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे. तब्बल पाच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिका बंद होत असल्यामुळे कलाकार खूप भावूक झाले आहेत.

'आई कुठे काय करते' या मालिकेने सुरुवातीला खूप कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेकांच्या घरी संध्याकाळी 'आई कुठे काय करते' अशी साद ऐकू येते. अनेक महिला या मालिकेशी भावनिकरित्य कनेक्ट झाल्या आहेत. त्यामुळे कलाकारांसोबतच चाहत्यांना देखील मालिका संपण्याचे दुःख झाले आहे.

नुकतीच 'आई कुठे काय करते' ची टीम 'होऊ दे धिंगाणा' या शोमध्ये आली होते. या शोमध्ये हे लोक खूप धमाल मस्ती करताना पाहायला मिळाले. 'होऊ दे धिंगाणा'च्या प्रोमो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,'आई कुठे काय करते' कलाकार भावनिक झाले होते. प्रेक्षकांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्यावर अरुंधती (Madhurani Gokhale) -अनिरुद्ध (Milind Gawali) अश्रूचा बांध फुटला आणि ते रडू लागले. त्यांचे डोळे पाणावले. त्यातील एक प्रेक्षक बोलतो की, गेली पाच वर्ष आम्ही 'आई कुठे काय करते' मालिका पाहत आहे.

मिलिंद गवळी बोलतात की, "याच क्षणासाठी मी काम करत होतो मात्र आज हा क्षण बघायला आई नाहीये" हे ऐकताच सर्वजणच भावूक होतात आणि त्यांचे डोळे पाणावतात. या मालिकेतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपला 'आई कुठे काय करते'चा प्रवास आणि आपला अनुभव सांगितला आहे. मिलिंद गवळी यांनी 'समृध्दी' बंगल्यासमोरील तुळस स्वतःच्या घरी घेऊन आले आहे.

'आई कुठे काय करते' ही मालिका 23डिसेंबर 2019 पहिल्यांदा प्रसारित झाली होती आणि आता ३० डिसेंबर 2024 ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Madhurani Gokhale-Milind Gawali emotional
Aishwarya Nadkarni : सौंदर्याची खाण! ऐश्वर्या नारकर यांच्या फिटनेसचं रहस्य काय? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com