महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! इस्लामपूर नव्हे, आता ईश्वरपूर

Islampur Renames to Ishwarpur : औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्ह्याची नावे बदलण्यात आल्यानंतर आता आणखी एका शहराचे नाव बदलण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आले आहे. केंद्र सरकारनं नाव बदलण्यास मंजुरी दिलीय.
Islampur Renames  to Ishwarpur
Islampur officially renamed as Ishwarpur; Maharashtra government issues notification after cabinet approval.saam tv
Published On
Summary
  • दरम्यान आरएसएससह गोपीचंद पडळकर यांनीही नाव बदलण्याची मागणी केली होती.

  • इस्लामपूर नगर परिषदेला ईश्वरपूर असं नाव देण्यात आले

  • ७० च्या दशकात नामकरणाची मागणी करण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या नकाशात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे नाव दिसणार नाहीये. महाराष्ट्र सरकारने इस्लामपूरचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तहसीलचे नाव आता ईश्वरपूर असे ठेवण्यात येईल,असा आदेश जारी करण्यात आलाय. केंद्र सरकारनं सुद्धा याला मंजुरी दिलीय.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील जनतेची मागणी मान्य झाली आहे. दरम्यान आरएसएससह गोपीचंद पडळकर यांनीही नाव बदलण्याची मागणी केली होती. आता आजपासून इस्लामपूर नगर परिषदेला ईश्वरपूर असं नाव देण्यात आले असून याबाबत शासन निर्णय जाहीर झालाय.

Islampur Renames  to Ishwarpur
Nagar Parishad Nagar Panchayat Election: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, कशाप्रकारे होणार मतदान प्रक्रिया, काय असतील नियम?

सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारचे आभार व्यक्त केलेत. बावनकुळे यांनी पस्ट करत म्हटलं की, “इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागणी करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज निर्णय घेतला आहे. आज केंद्रीय गृहमंत्रालय व महाराष्ट्र शासनाने यााबत अधिसूचना जारी केलीय.

Islampur Renames  to Ishwarpur
रायगडनंतर नंदुरबारमध्येही महायुतीत राडा; शिवसेना-भाजपात तेढ,भाजप आमदाराला सेनेशी युती आवडेना

त्यानुसार आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर असं करण्यात आलंय. सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतल्याचं बावनकुळे म्हणालेत. “या निर्णयाबद्दल अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे बावनकुळे यांनी आभार मानलेत. इस्लामपूर शहर आणि इस्लामपूर नगर परिषदेचं नाव आता ईश्वरपूर असं झालंय.

आधी कोणी केली होती नाव बदलण्याची मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी ७० च्या दशकात नामकरणाची मागणी केली होती. शहराचे नाव ईश्वरपूर असं करावे, अशी पहिल्यांदा त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपूरमधील जाहीर “हे इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर असा उल्लेख केला होता. त्यानंतर भाजपा नेते अण्णा डांगे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांनी देखील हीच मागणी लावून धरली होती.

दरम्यान गाव किंवा शहरांची नावं बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असतो. या प्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसीसह सादर करण्यात आला. केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर नाव बदलण्यात आले. आतापर्यंत राज्यातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. यात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगरसारख्या शहरांची नावे बदलण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com