Kharghar Tragedy: खारघर दुर्घटनेनंतर शासनाला उशिरा आली जाग; राज्य सरकारने मोकळ्या परिसरातील कार्यक्रमाबाबात घेतला मोठा निर्णय

maharashtra Government News: महाराष्ट्र पुरस्कार भूषण पुरस्कारावेळी घडलेल्या दुर्घटनेमुळे विरोधकांकडून राज्य सरकारच्या विरोधात टीकास्त्र सोडलं आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam tv
Published On

Mumbai News: महाराष्ट्र पुरस्कार भूषण पुरस्कारावेळी घडलेल्या दुर्घटनेमुळे विरोधकांकडून राज्य सरकारच्या विरोधात टीकास्त्र सोडलं आहे. या दुर्घटनेनंतर शासनाला जाग आली आहे. राज्य सरकारने मोकळ्या परिसरात शासकीय कार्यक्रमाच्या वेळेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी हा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र पुरस्कार भूषण पुरस्कारावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. खारघर दुर्घटनेत आतापर्यंत १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूने श्रीसदस्यांच्या मृत्यूने त्यांच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकरावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे मोकळ्या परिसरात सर्व शासकीय कार्यक्रम हे १२ ते ५ या वेळेत न करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान घडलेल्या घटना भविष्यात टाळण्यासाठी शासनाने हे पाऊल उचललं आहे.

Mumbai News
Sanjay Rathod News: मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार? थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र धाडून केली तक्रार

राज्य सरकारच्या निर्णयाबाबत भाष्य करताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, 'सरकारने जो जी आर काढला आहे, तो योग्यच आहे. १२ ते ५ या वेळेत मोकळ्या जागेवर सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचा तो योग्य आहे. कोणालाही कल्पना नव्हती की असे काही होईल. तीन-चार दिवस तापमान वाढले होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली'.

'विरोधकांचे काम आहे राजीनामा मागणे, पण कोणालाही कल्पना नव्हती की असेल काही होईल. शेड का उभारले नाही, मी यावर बोलू शकत नाही. संबंधित विभागाचे लोक त्यावर बोलू शकतील, असेही ते म्हणाले.

Mumbai News
Chhota Rajan News: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मोठा झटका; सिंगापूरमधील साथीदार अबू सावंत सीबीआयच्या जाळ्यात

'अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे आम्ही महिला दरबार सुरू करत आहोत. यापूर्वी ही आम्ही एक दोन कार्यक्रम घेतले होते. त्यात अनेक तक्रारी पुढे आल्या. सर्व विभागाचे अधिकारी यात उपस्थित राहतील आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. ज्या समस्येशी संबंधित अधिकारी नसेल ती समस्या नोंदवून घेतली जाईल, असे लोढा पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com