Rajyamata Gomata : देशी गाय मतांची 'साय'? निवडणुकीआधी महायुती सरकारची 'गोमाता' रणनीती, पाहा व्हिडिओ

Maharashtra Rajya Mata-Gau Mata : देशी गाय आता राज्य माता म्हणून घोषित करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय...राज्य सरकारने निवडणुकीआधी हा मास्टरस्ट्रोक मारलाय...मात्र, यावरून विरोधकांनीही सरकारला घेरलंय...पाहुयात यावरचा रिपोर्ट...

मुंबई : महायुती सरकारने देशी गायींना राज्य मातेचा दर्जा दिलाय...विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मोठा निर्णय घेतलाय...भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे...हिंदू धर्मात गायीचं शेण, गोमूत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो...त्यामुळे गोमाता संरक्षणासाठी हा सरकारचा मास्टरस्ट्रोक मानला जातोय...

गायीचं महत्त्व?

गायीला कामधेनूही म्हटलं जातं. राज्यात गायीच्या विविध प्रजाती आढळतात. मराठवाड्यात देवनी, लालकंधारी या गायी आढळतात. तर पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी गायी आढळतात. तर विदर्भात गवलाऊ अशा जातींच्या गायी आढळतात.

राज्यात दिवसेंदिवस गायींची संख्याही कमी होताना दिसत असल्याचं जीआरमध्ये म्हटलंय...मानवी आहारातील गायीच्या दूधाचं महत्त्व आहे...गायीचं शेण आणि गोमूत्राचं महत्त्व पाहता गायीला राज्यमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय...निर्णय जाहीर होताच शिंदे, फडणवीसांनी गायींची पूजा केली...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com