शाळेबाहेर 'स्टिंग' विकण्यास बंदी, अन्न-औषध प्रशासन मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Sting Energy Drink Under Fire: स्टिंग एनर्जी ड्रिंकसंदर्भात भाजप आमदाराकडून गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारनं यासंदर्भात विधानसभेत चर्चा करून मोठी घोषणा केलीये. विधानसभेत हा मुद्दा कुणी उपस्थित केला आणि त्यावर मंत्र्यानी काय उत्तर दिलं? पाहूया यावरचा हा रिपोर्ट...
Maharashtra government bans sale of Sting energy drink near schools citing serious health risks to students.
Maharashtra government bans sale of Sting energy drink near schools citing serious health risks to students.saam tv
Published On

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त अन्नपदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांवर धाडसत्र सुरू आहे. अशातच आता एका एनर्जी ड्रिंकचा मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित करण्यात आलाय. बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या स्टिंग एनर्जी ड्रिंक संदर्भात भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी गंभीर आरोप केला. त्यानंतर यासंदर्भात विधानसभेत प्रश्नोत्तरांद्वारे चर्चा देखील करण्यात आलीये. या चर्चेअंती अन्न व औषध पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्टिंग विक्रीला शाळा परिसरात विक्रीस बंदी घालण्याची घोषणा केली.

स्टिंग कोल्ड्रिंकवर बंदी का?

- स्टिंगमधील अति-साखर आणि कॅफेन मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक

- पेयातील घटकांमुळे शाळकरी मुलांना व्यसन लागण्याची शक्यता

- लॅब टेस्टिंगमध्ये पेय घातक असल्याचं आढळलं

- काही घटक धोकादायक असल्याचं कंपनीलाही मान्य असल्याचा दावा

- स्टिंग पेय काही बाबतीत दारूपेक्षाही धोकादायक असल्याचा दावा

खरंतर, गुटखा, पानमसाला, सिगारेट या वस्तू शाळा परिसरात विक्रीस बंदी आहे. त्यात आता स्टिंग एनर्जी ड्रिंकचाही समावेश झाला आहे. असं असलं तरी सरकारच्या या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मात्र त्याचं विक्रेत्यांकडून कितपत पालन होणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com