होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचारांची परवानगी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, डॉक्टरांचा थेट बहिष्कार

Maharashtra CCMP GR, Homeopathy Doctors : होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी देणाऱ्या राज्य सरकारच्या जीआरविरोधात आयएमएसह विविध वैद्यकीय संघटनांनी २४ तासांच्या कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे.
Maharashtra CCMP certificate allopathy permission
Maharashtra CCMP certificate allopathy permissionSaam TV AI
Published On

Maharashtra CCMP certificate allopathy permission : मॉडर्न फार्मकोलॉजीचा (CCMP) सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना 'महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल' (MMC) मध्ये नोंदणी करून ॲलोपॅथी औषधे देण्याची मुभा देणारा जीआर (GR) राज्य सरकारने जारी केला आहे. या निर्णयाविरोधात राज्यातील ॲलोपॅथिक (MBBS/MD) डॉक्टर आक्रमक झाले असून त्यांनी कामावर बहिष्कार आणि संपाची हाक दिली आहे. २४ तास कामबंद आंदोलन अॅलोपॅथिक डॉक्टरांनी पुकारले आहे.

सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल, अशा इशारा डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध शहरात डॉक्टरांनी आदोलन पुकारले आहे. नांदेड, नागपूरसह पुणे, मुंबईतही डॉक्टरांनी २४ तास कामबंद आंदोलन केलेय.

Maharashtra CCMP certificate allopathy permission
महत्त्वाची बातमी! सोसायटीच्या मेंटेनन्सवर राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियमांत झाला बदल; जाणून घ्या नवीन गणित

'इंडियन मेडिकल असोसिएशन' (IMA) आणि विविध वैद्यकीय संघटनांच्या मते, केवळ वर्षभराचा कोर्स करून ॲलोपॅथी उपचारांची परवानगी देणे चुकीचं आहे. ५ ते ६ वर्षांचे कठोर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांवर हा अन्याय आहे. या निर्णायामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी अॅलोपॅथिक डॉक्टरांनी केली आहे.

Maharashtra CCMP certificate allopathy permission
Gold Price Today: खरेदीदारांना मोठा दिलासा! आज सोन्याच्या दरात घसरण; पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर
"हे आंदोलन डॉक्टरांच्या किंवा रुग्णांच्या विरोधात नसून, रुग्णांना सुरक्षित आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी आहे. या निर्णयामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या (ॲलोपॅथी) गुणवत्तेवर आणि रुग्णांच्या सुरक्षेवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल."
— डॉ. अशोक अढाव (माजी राष्ट्रीय अध्यक्ष, IMA)
Maharashtra CCMP certificate allopathy permission
Ladki Bahin Yojana : १५०० की ३००० रुपये? खात्यात किती पैसे येणार; आज मोठा निर्णय होणार

राज्य सरकारच्या प्रस्तावाविरोधात नागपुरातील डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि इतर विविध वैद्यकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. त्याशिवाय सरकारच्या या निर्णायाविरोधात नांदेडमधील डॉक्टर्स रस्त्यावर उतरले आहेत. 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने (IMA) पुकारलेल्या २४ तासांच्या कामबंद आंदोलनाला महाराष्ट्र मार्ड (MARD), एएसएमआय (ASMI) आणि इतर वैद्यकीय संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com