

महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेत १२४ नवीन अभ्यासक्रमांचा समावेश
१२४ नवीन अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अपडेट
राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेमध्ये आणखी १२४ नवीन अभ्यासक्रमांचा समावेश केलाय. त्याची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासूनच होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) अंतर्गत नवे अभ्यासक्रम राबविण्याबाबत मार्च २०२५ मध्ये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व पात्र ठरणाऱ्या संलग्न, महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ पासून सुरू करण्यात आलेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन्ही योजनांमध्ये AEDP अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय सचिवस्तरीय समितीने मार्च २०२६ मध्ये घेतला होता. त्याला आता राज्य सरकारनेही मंजुरी दिलीय.
विकसित महाराष्ट्र २०४७ च्या अॅक्शन प्लॅनमध्ये AEDP कार्यक्रमाचे बळकटीकरण करण्याचा समावेश आहे. त्यानुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील AEDP अभ्यासक्रमांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यात आल्याचे सरकारने म्हटलंय.
शासन निर्णयांमध्ये विहित केलेल्या पात्रता अटी, उत्पन्न मर्यादा, जात प्रवर्गनिहाय निकष व अन्य शर्तींच्या अधीन राहून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू करण्यास सरकारने मान्यता दिलीय. योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना महा-डीबीटी संकेतस्थळावर विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.