मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. सरकारमधील १८ आमदारांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Maharashtra Government) खातेवाटपाबाबत अद्यापही शिक्कामोर्तब झाला नसल्याने विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. दुसरीकेड देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. परंतु, राज्यातील जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांची नेमणूक झाली नसल्याने यंदा १५ ऑगस्टला काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून ध्वजवंदन (Indian flag hoisting) केले जाणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये राज्यातील नवनिर्वाचीत मंत्री ध्वजवंदन करणार आहेत.
'या' मंत्र्यांकडून होणार ध्वजवंदन
१) देवेंद्र फडणवीस - नागपूर
२) सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर
३) चंद्रकांत पाटील - पुणे
४) राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर
५) गिरीश महाजन - नाशिक
६) दादा भुसे - धुळे
७) गुलाबराव पाटील - जळगाव
८) रविंद्र चव्हाण - ठाणे
९) मंगल प्रभात लोढा - मुंबई उपनगर
१०) दीपक केसरकर - सिंधुदुर्ग
११) उदय सामंत - रत्नागिरी
१२) अतुल सावे - परभणी
१३) संदिपान भुमरे - औरंगाबाद
१४) सुरेश खाडे - सांगली
१५) विजयकुमार गावित - नंदुरबार
१६) तानाजी सावंत - उस्मानाबाद
१७) शंभूराज देसाई - सातारा
१८) अब्दुल सत्तार - जालना
१९) संजय राठोड - यवतमाळ
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.