Maharashtra Government : शिंदे-फडणवीस सरकारचा खातेवाटपाचा मुहूर्त कधी ? दिल्लीतून होणार शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खातेवाटपावरुन खलबतं सुरु आहेत.
Eknath shinde and Devendra Fadnavis
Eknath shinde and Devendra Fadnavis saam tv
Published On

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारच्या १८ आमदारांचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी पार पडला. त्यामुळे तब्बल ४० दिवसांहून अधिक दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम लागला. दुसरीकडे मात्र शिंदे गटात सामील झालेल्या काही आमदारांची मंत्रिपदी वर्णी न लागल्याने नाराजीनाट्य सुरु झाले आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खातेवाटपावरुन खलबतं सुरु आहेत. परंतु, काही खात्यांबाबत अजूनही निर्णय झाला नसल्याचे कळते आहे. त्यामुळे खातेवाटपावर दिल्लीतूनच शिक्कामोर्तब होणार असून १५ ऑगस्ट नंतरच खातेवाटपाला मुहूर्त मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Eknath shinde and Devendra Fadnavis
सिव्हिल इंजिनीअर मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना कारणे दाखवा नोटीस

दिल्लीतून सिग्नल मिळत नाही, अजित पवारांचा टोला

राज्यात शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. परंतु, खातेवाटपावरुन अजूनही राज्य सरकारमध्ये गोंधळ असल्याचं चित्र आहे. यावरुन विरोधक शिंदे सरकारवर मिश्किल टीपण्णी करत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही टोला सरकारला टोला लगावला आहे. दिल्लीतून शिंदे-फडणवीस सरकारला अजूनही सिग्नल मिळालेलं दिसत नाही, असं म्हणत पवार यांनी राज्य सरकारला टोला हाणला आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले, तर त्यांचे स्वागतच आहे, असंही पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com