Sakal Study Report : फडणवीस सरकारकडून महाराष्ट्राच्या काय अपेक्षा? ज्यांनी निवडून दिलं त्यांनीच सांगितल्या ३ गोष्टी

Maharashtra Government Study Report : शेती, शिक्षण आणि रोजगार व्यवस्थित असेल तर राज्याचा विकास अधिक वेगवान होतो. फडणवीस सरकारपुढे या तीन क्षेत्रात सुधारणा करण्याचे मोठं आव्हान असेल. पाहणी अहवालात नेमकं काय आहे?
Devendra Fadnavis government
Devendra Fadnavis government
Published On

Devendra Fadnavis government 100 days Study Report : महायुती सरकारला महाराष्ट्रातील जनतेने दुसर्‍यांदा संधी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. फडणवीस सरकारच्या पहिल्या १०० दिवसाच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे. पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान सरकारपुढे असेल. महाराष्ट्रातील जनतेने फडणवीस सरकारने कोणत्या मुद्द्याकडे जास्त लक्ष द्यावे, त्याबाबत स्पष्ट सांगितले. ३६ जिल्ह्यामध्ये सकाळ समूह आणि पोल पंडित यांनी फडणवीस सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. शेती, उद्योग, रोजगर आणि शिक्षण या तीन मुद्द्यांवर सरकारला अधिक काम देण्याची गरज असल्याची भावना महाराष्ट्रातील जनतेने व्यक्त केल्याचे अहवालातून समोर आलेय.

फडणवीस सरकार पुढील ३ मोठी आव्हाने?

महाराष्ट्रातील जनतेच्या मते फडणवीस सरकारने शेतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ३६ जिल्ह्यांमधील नागरिकांच्या सर्व्हेत शेतीचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तब्बल ३४ टक्के नागरिकांच्या मते फडणवीस सरकारने शेतीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तर २३ टक्के लोकांच्या मते फडणवीस सरकारने ५ वर्षात रोजगार आणि उद्योग वाढवण्यावर भर द्यावा. तर १० टक्क्यांच्या मते फडणवीस सरकारला कायद आणि सुव्यवस्थावर विशेष भर द्यावा असे वाटतेय. आरोग्य आणि पायभूत सुविधांचा विकास करण्यासाठी गरज असल्याचे १४ टक्क्यांनी सांगितलेय.

Devendra Fadnavis government
Devendra Fadnavis: डिजिटल अरेस्टमध्ये शिकलेलेही अडकतात, मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई पोलिसांना दिले आदेश

शेतीला सर्वाधिक प्राधान्य का द्यावं? प्रमुख कारणे -

महाराष्ट्रातील बहुतांश नागरिक उदरनिर्वाहासाठी शेतीवरच अवलंबून आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांचा कल शेतीकडे अधिक दिसून येतो. ग्रामीण भागातील सर्वाधिक नागरिक हे शेतीला अधिक प्राधान्य देताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील नागरिक शेतीसोबत भावनिकरित्या जोडला गेलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे गरजेचे असल्याची भावना ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांमध्ये दिसून आली. शेतीला पिक विमा योजना आणि नुकसान भरपाई वेळेच्या वेळी मिळत नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

Devendra Fadnavis government
CM Devendra Fadnavis : जिकडे चूक आहे, तिकडे चूक म्हणावं लागेल, पण...; पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

रोजगार वाढवण्याचे मोठं आव्हान -

दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढतेय, पण त्या तुलनेत रोजगाराच्या संधी मात्र उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. रोजगारासाठी ग्रामीण भागातील तरूणांचं मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर होत आहे. पण रोजगार आणि त्यातून मिळणारे वेतन पुरेसे नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात बहुतांश लोक शेतीवर अवलंबून असतात, परंतु शेती करताना कमी उत्पन्न, वाढता खर्च आणि मिळत नसलेला हमीभाव यामुळे लोक शेतीसोबतच रोजगाराची मागणी करताना दिसून आले.

शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे मोठं आव्हान ?

दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत चाललाय, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. पैसा खर्च होतो, पण मुलांना हवं तसं शिक्षण मिळत नसल्याने नागरिक असमाधानी असल्याचे पाहणी अहवालात दिसून आले. या शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा, यंत्रणा आणि सुरक्षा असल्याचे देखील मत बहुतांश पालकांनी व्यक्त केले. आपला मुलगा इंग्रजी माध्यमातच टाकण्याचा अट्टाहास पालकांचा असतो. त्यातच मराठी माध्यमांच्या शाळांची स्थिती आणि संख्या देखील खालावत जात आहे, त्यामुळेही पालकांची नाराजी दिसून येते. शिक्षणाच्या दर्जाबाबत समाधानी असणारा बहुतांश वर्ग हा उच्चभ्रू असल्याचे या अहवालातून समोर आलेय.

सर्वे कसा आणि कुठे घेतला ?

सकाळ माध्यम समूह आणि पोल पंडित यांनी मिळून फडणवीस सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले. यातून तयार झालेला अहवाल महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील नागरिकांच्या मतांवर आधारित आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या फडणवीस सरकारच्या कामाबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. शेती, आरोग्य, रोजगार आणि कायदा-सुव्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवरील त्यांची मते नोंदवली गेली. एकूण ६९९२ लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला, त्यापैकी ३२६२ शहरी तर ३७३० ग्रामीण भागातील होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com