राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार, शपथविधी उद्याच होणार? भुजबळांनी दिली सविस्तर माहिती

Chhagan Bhujbal Statement On Sunetra Pawar Deputy CM Post: महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार का? सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत. छगन भुजबळांनी दिली सविस्तर माहिती.
Senior NCP leaders discuss leadership change as Sunetra Pawar emerges as frontrunner for Deputy CM post.
Senior NCP leaders discuss leadership change as Sunetra Pawar emerges as frontrunner for Deputy CM post.Saam Tv
Published On

प्रफुल पटेल, सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि मी ही त्या बैठकीत होतो. या बैठकीत सुनेत्रा वहिनींचे नाव विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड करायची असे या बैठकीत ठरले. पण दुखवटा आणि सूतक असल्याकारणाने कदाचित थोडे थांबले असतील पण प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे लक्ष घालून आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अजित पवार यांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम पार पडत असतानाच दुसरीकडे मुंबईमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी खलबत सुरू होती. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठक पार पडली आणि यावेळी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे नाव सुचवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर छगन भुजबळ यांनी यासंदर्भात माहिती दिली.

भुजबळ म्हणाले, आज आमच्यासमोर विधीमंडळामध्ये आमच्या पक्षाच्या प्रमुखाची निवड करणे म्हणजेच उपमुख्यमंत्री करणे आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का नाही हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले हा नंतरचा प्रश्न आहे. पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे निर्णय झाला नाही. पुढच्या एक दोन तासात तुम्हाला माहिती मिळेल तसेच झाले तर उद्याच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे स्पष्ट संकेत छगन भुजबळांनी दिले.

Senior NCP leaders discuss leadership change as Sunetra Pawar emerges as frontrunner for Deputy CM post.
Ajit Pawar Death: दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...; अजितदादांसाठी रोहित पवारांची भावुक पोस्ट

अजित दादांचा उत्तराधिकारी पवार कुटुंबातीलच आणि सुनेत्रा पवारच

बारामतीत दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले असून पक्षाच्या भवितव्याबाबत महत्त्वाची भूमिका मांडली जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली , सुनेत्रा पवार यांनीच पक्षाचे आणि सरकारचे नेतृत्व करावे, अशी एकमुखी मागणी असल्याचे सांगितले. माणिकराव कोकाटे म्हणाले की, अजितदादा आमदारांसाठी केवळ सहकारी नव्हते, तर आमचे पंचप्राण होते. आमचे भवितव्यच काळाने हिरावून घेतले आहे. या दुःखातून सावरण्याच्या मानसिकतेत सध्या कोणीही काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही.

ते पुढे म्हणाले, आमचा पक्ष म्हणजेच अजित दादा होते. आम्ही सर्व आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय फक्त अजित दादांमुळेच घेतला होता. आमदारांची स्वतंत्र बैठक घेण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत कोकाटे यांनी स्पष्ट केले की, सर्व आमदारांची एकच इच्छा आहे. सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे, तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे द्यावी. पक्षाची संपूर्ण धुरा त्यांनीच सांभाळावी, अशी आमदारांची भावना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com