दुष्काळामुळे राज्यात पाणी प्रश्न गंभीर, धरणांवर आता पोलिसांचा पहारा

Water Shortage in Jalna: राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्यानं पाणीटंचाईचं संकट गडद झालंय. आरक्षित पाणीसाठ्यावर सुरक्षा व्यवस्थेसाठी पाटबंधारे विभाग अॅक्शन मोडवर आलाय. कुठे धरणांवर पोलीसांकडून पहारा ठेवण्यात आलाय?... पाहूयात या रिपोर्टमधून...
MAHARASHTRA DROUGHT: POLICE GUARD DAMS AS JALNA WATER STORAGE FALLS TO 11.62%
MAHARASHTRA DROUGHT: POLICE GUARD DAMS AS JALNA WATER STORAGE FALLS TO 11.62%saam tv
Published On: 

राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत चालल्यात. गावागावात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. आता तर थेट पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ प्रशासनावर आलीय़. अनेक ठिकाणी धरणांवर पोलिसांचा पहारा देण्यात येतोय. असंच जालन्याचं प्रशासन अॅक्शन मोडवर आलंय. पिण्याच्या पाण्याच्या साठ्याची राखण करण्याची वेळ प्रशासनावर आलीये. भोकरदन तालुक्यातील धामणा धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलाय. त्यामुळे धरणातील पाण्याचा अवैध उपसा होऊ नये, म्हणून स्थानिक प्रशासन सतर्क झालंय. महसूल आणि पाटबंधारे विभागाचं संयुक्त पथक धरण परिसरात तैनात करण्यात आलंय.

धरणातून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी या पथकाकडून दिवस-रात्र धरण परिसरात पेट्रोलिंग करण्यात येतंय. एव्हंढच नव्हे तर पाण्याच्या सुरक्षेसाठी आता पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.

जालना जिल्ह्यातील 57 लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 11.62 टक्के एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांना आगामी काळात पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्यात दुष्काळाचं सावट गडद होत असताना जलसाठे झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवल्यामुळे त्याची सुरक्षा थेट पोलिसांच्या हाती सोपवण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com