दुष्काळाची घोषणा शनिवारी? मुख्यमंत्र्यांचा बुधवारपासून दुष्काळ भागाचा दौरा

Maharashtra Drought Crisis Deepens: राज्याच्या अनेक भागात पावसाची मोठी तूट आहे. पिकं करपली आहेत. जमिनीला चक्क भेगा पडल्या आहेत. दुष्काळाच्या झळा बसलेल्या बळीराजाचा आक्रोश पाहून सरकार दरबारी हालचाली सुरु झाल्यात. राज्यात दुष्काळाची घोषणा कधी होऊ शकते? दुष्काळ जाहीर होतो म्हणजे काय ? पाहूया याबाबत एक खास रिपोर्ट...
Maharashtra drought first notification by Saturday 2026
Maharashtra drought first notification by Saturday 2026saam tv
Published On

राज्यावर दुष्काळाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात खरीप पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्याचा आक्रोश पाहून सरकार दरबारीही आता हालचाली सुरु झाल्यात. दुष्काळासंदर्भात पहिली अधिसूचना शनिवारपूर्वी काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीये. तसंच महसूलमंत्री बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची विशेषाधिकार समिती स्थापन करण्यात आलीेये. ही समिती दर आठवड्याला दुष्काळाचा आढावा घेणार आहे.

पावसाची मोठी तूट असलेल्या 20 जिल्ह्यांबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. दुसरीकडे मुख्यमंत्री बुधवारपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. सोलापूरसह लातूर, धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते परिस्थितीची पाहणी करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दुष्काळी भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, दुष्काळ जाहीर होतो म्हणजे काय ? ते पाहूया...

दुष्काळ जाहीर होतो म्हणजे काय ?

आपत्ती निवारण निधीतून नुकसान भरपाई मिळते

कृषी कर्जाच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती दिली जाते आणि कर्जाचे पुनर्गठन केले जाते

शेतीपंपांच्या वीज बिलात सूट किंवा सवलत मिळते

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शिक्षण शुल्क माफ केले जाते.

धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाते.

टँकरने पाणी पुरवठा करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या जातात

दुष्काळग्रस्त भागातल्या सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाच्या नुकसानीची प्राथमिक नोंद झालीय. 5 ऑक्टोबरपर्यंत ई-पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम आकडेवारी समोर येणारेय. अस्मानी संकटानी पिचलेल्या बळीराजाच्या वेदनेवर आता सरकार कशी फुंकर मारणार याकडे बळीराजाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com