कोरड्याठाक मराठवाड्यात रोजगारावर संकट, नवरात्रीपूर्वीच शेतमजूरांवर स्थलांतराची वेळ

Drought Crisis in Maharashtra: राज्यात दुष्काळामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. पिकं करपून गेल्यानं पदरी निराशाच पडलीये. विशेष म्हणजे, यंदा नवरात्रीपूर्वीच मजूरांनी स्थलांतर सुरू केलंय. मात्र, गाव सोडून बाहेर जावं तर तिथेही हाताला काम नाहीये, अशी परिस्थिती आहे. दुष्काळामुळे राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था कशी कोलमडलीये?... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Maharashtra drought farm labourers migration before Navratri
Maharashtra drought farm labourers migration before Navratrisaam tv
Published On: 

राज्यातील दुष्काळामुळे ग्रामीण भागातील रोजगारावर मोठा परिणाम होऊ लागलाय. खरीप हंगाम संपल्यानंतर शेतमजूर पीक तोडणीच्या कामासाठी गावाबाहेर स्थलांतर करतात. मात्र, यंदा दुष्काळामुळे नवरात्रीपूर्वीच ग्रामीण भागातल्या शेतमजूरांवर रोजगाराच्या शोधात स्थलांतराची वेळ आलीय़. स्थलांतराचं सर्वात मोठं संकट कोरड्याठाक मराठवाड्यावर ओढवलंय. दुष्काळानं हातचं पीक तर हिराऊन नेलंच मात्र शेतातला रोजगारही हिरावून नेलाय. त्यामुळे मजूर गावाबाहेर पडत आहेत..

दुष्काळात पिकं गेल्यामुळे कापूस वेचणी, सोयाबीन काढणीची कामंच उरलेली नाहीत

रब्बी हंगामाची कोणतीही शाश्वती नाही

उसाचे उत्पादन घटलं असून साखर कारखाने चालण्याचा कालावधी अर्ध्यावर आला

दरवर्षी हंगामाआधी जी उचल घेतली जाते, तीसुद्धा फीटण्याची यंदा खात्री नाही

दुष्काळामुळे स्थलांतराची वेळ आलीय. त्याळे केवळ रोजगाराचाच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शाळेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. रोजगाराची संधी शोधण्यासाठी मजुरांनी शहराची वाट धरली खरी. मात्र तिथंही कामासाठी संघर्ष करावा लागत असल्यामुळे दुष्काळग्रस्त दुहेरी संकटात साप़डाय. सणासुदीच्या काळात घरापासून दूर जाऊन काम करण्याची वेळ आल्याने मजूर कुटुंबांसमोर आर्थिक अडचणीही निर्माण होत आहेत. शेतात कामेच उरली नसल्यानं रोजगार हमी योजनेतून कामे देण्याची मागणी शेतमजूरांकडून केली जातेय. खरंतर, या मजुरीच्या पैशावर शेतमजूरांच्या कुटुंबीयांची आर्थिक गणितं अवलंबून असतात. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त शेतकरी आणि मजुरांना रोजगार हमी योजनेत सामावून घेऊन दिलासा देण्याची गरजेचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com