धुळे जिल्ह्यात कोब्रा सापाचं डोकं बिअरच्या कॅनमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली.
सर्पमित्राने हुशारीने सापाची सुटका करून त्याला जंगलात सोडलं.
हे रेस्क्यू ऑपरेशन जवळपास अर्धा तास चाललं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कचरा उघड्यावर टाकल्याने वन्यजीवांना धोका निर्माण होतं आहे.
माकडाचं डोकं हंड्यात अडकलं, माणसाचा पाय कळशीत अडकला अशा बातम्या आपण ऐकत आलो आहोत. मात्र धुळे जिल्ह्यात सापाचं चक्क डोकं एका कॅनमध्ये अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान सर्प मित्राने या कोब्रा सापाला अत्यंत हुशारीने रेस्क्यू केले आहे. हे सर्व दृश्य अंगावरती शहारे आणणारे आहेत.
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील होळनांथे गावामध्ये एका अडचणीच्या ठिकाणी अस्ताव्यस्त कचरा पडला होता. या कचऱ्यात पत्र्याचा बियरचा कॅन पडलेला होता. या कॅनमध्ये कोब्रा सापाने शिरकाव केला असता त्याला बाहेर पडणं मुश्किल झालं. बाहेर येताना सापाचं पूर्ण शरीर बाहेर पडलं मात्र त्याचं डोकं कॅनच्या तोंडाजवळचं अडकून राहील.
स्वतःची सुटका करण्यासाठी सापाने बराच वेळ प्रयत्न केला. मात्र इतरांना घाबरावणारं सर्प मात्र या वेळेस मदती अभावी कॅनमध्ये निपचित पडून होतं. इतरवेळेस त्याच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून आपण याचना करतो. यावेळेस सापाला सर्प मित्राची गरज भासली. आजूबाजूच्या नागरिकांना या सापाची चाहूल लागताच नागरिकांनी सर्पमित्रांना कळवलं.
सर्पमित्रांनी कोब्रा नागाला अडचणीतून बाहेर काढलं. त्यानंतर एका सुरक्षित जागेवर नेऊन काठी आणि सुऱ्याच्या सहाय्याने मोठ्या शिताफीने कॅन कापला. आणि जवळपास अर्धा तास या कोब्रा नागाला वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करून सापाची सुटका केली. त्यानंतर सापाला जवळच्या एका जंगलात सोडण्यात आले.
मात्र दुकानात मिळणाऱ्या या कोल्ड्रिंक्स कॅनने पीऊन तोच पत्र्याचा टीनचा डब्बा तसाच उघड्यावर फेकल्याने त्यामध्ये हा सर्प त्यात जाऊन अडकला. कचऱ्याच्या डब्यात न फेकता हा टीनचा डब्बा उघड्यावर फेकल्यामुळे या मुक्या जीवाला त्याचा त्रास सहन करावा लागला हे ही तितकंच खरं आहे. या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला असून अंगावर काटा आणणारा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.