

अजित पवार गटाने सांगली महापालिकेसाठी ३० जागांची थेट मागणी केलीय.
महायुतीत जागावाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता.
सांगली, मिरज आणि कुपवाड तिन्ही शहरात राष्ट्रवादीची जोरदार तयारी.
आगामी सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने रणशिंग फुंकले आहे.महापालिका निवडणुकीत महायुतीत सोबत लढण्याची भूमिका जाहीर करत राष्ट्रवादी अजित पवार गटाने 30 जागांची मागणी केली आहे. मात्र जिल्ह्यातील सहा नगरपालिका, दोन नगरपंचायतीच्यावेळी उडालेला राजकीय गदारोळ उडाला होता. त्याचदरम्यान अजित पवार गटानं थेट जवळपास निम्मे जागा मागितल्या आहेत, त्यामुळे आता महानगपालिकेत महायुतीची महायुतीची मोट कशी बांधली जाईल, हे याबाबत शंका उपस्थित होत आहे.
सांगली महानगरपालिकेची निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाणार? अजित पवार महायुतीसोबत असणार की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे अशा प्रश्नांची उत्तर पद्माकर जगदाळे सांगली शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी दिली आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला किती जागा हव्यात हेही स्पष्ट शब्दात सांगितलंय. सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जागांची मागणी करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारी मागणी अर्ज आजपासून देण्यात येणार असल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळेंनी स्पष्ट केलंय. तसेच तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून उमेदवाराची चाचपणी करून उमेदवारी देण्याची भूमिका घेण्यात येईल, त्याचबरोबर निवडणुकीत जागांच्या बाबतीतला अंतिम निर्णय अजित पवार घेतली,असे स्पष्ट करत देखील महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा,विश्वास देखील व्यक्त केला आहे.
दुसरीकडे भाजपचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार गट महायुतीसोबत असणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. नगरपालिका आणि नगरपरिषदेत उडालेल्या गोंधळावरून बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या जास्त असते. यात सर्व कार्यकर्त्यांना संधी देणे शक्य नसते. त्यामुळे कुठे महायुती तर कुठे स्थानिक नेत्यांना आघाडी करण्याबाबत अधिकार देण्यात आले होते.
याचमुळे सांगली जिल्ह्यातील जत, शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी अजित पवार गटाने आघाडी केली होती. तर काही ठिकाणी भाजपनेही स्थानिक आघाड्या केल्या होत्या. परंतु आता राष्ट्रवादीने थेट ३० जागांची मागणी केलीय. त्यामुळे महायुतीतील इतर पक्षांची काय भूमिका असेन, त्यांना ते मान्य असेन का? हे उपस्थित होत आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, रिपाई आठवले गट, जनसुराज्य शक्ती या घटक पक्षांचा समावेश आहे.
महायुतीचे जागा वाटप कसे होते यावरच महायुतीचे भविष्य टिकून आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची जागा मागणी जास्त आहे. कारण सहा माजी नगरसेवक या पक्षात आहेत. दुसरीकडे नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात जनसुराज्य शक्ती पक्षाने भाजपला मदत केलीय त्यामुळे भाजपला त्यांचाही विचार करावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.