Sangli : विरोधकांचं ते कामच आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सांगली जिल्हा दाै-यावर आले हाेते.
Eknath Shinde , Sangli
Eknath Shinde , Sangli saam tv
Published On

Sangli : आरोप करण हे विरोधकांचं कामच आहे. परंतु गेल्या एका महिन्यात आमच्या सरकारनं मोठ्या प्रमाणात लोकाभिमुख निर्णय घेतले. आमच्या निर्णयांबाबत जनतेला सर्व माहित आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे नमूद केले. मंत्रिमंडळ विस्तार झाला परंतु अद्याप स्वातंत्र्यदिनासाठी राज्यात पालकमंत्री नाहीत अशी टीका विराेधकांकडून केली जात असल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे बाेलत हाेते. (cm eknath shinde sangli latest marathi news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगली जिल्ह्याचे दाै-यावर आले हाेते. त्यावेळी माध्यमांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देताना आम्ही जनतेच्या हिताच्या निर्णय घेतले आहेत. आमच्या निर्णयाची माहिती जनतेस आहे. सांगली आणि काेल्हापूर जिल्ह्यातील शेतक-यांना मदत व्हावी यासाठी आमचं सरकार काळजी घेत आहे.

Eknath Shinde , Sangli
Ratnagiri : 'उद्धव ठाकरे देव नाहीत, ते सांगताहेत ते सर्व खरं नाही'

सांगली जिल्ह्यातील खानापूर विटा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गट आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झालं. बाबर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विटा येथे आले हाेते. तसेच वसंतदादा पाटील यांची नात, विशाल पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या बहीण डॉ. मधु पाटील यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.

Edited By : Siddharth Latkar

Eknath Shinde , Sangli
Shirdi : काँग्रेसचं टेन्शन घेऊ नका ! त्यांच्यात हिम्मतच नाही : खासदार सुजय विखे पाटील
Eknath Shinde , Sangli
Nana Patole : काॅंग्रेस मित्रांना दगा देत नाही; भाजपसह नाना पटाेलेंचा मित्र पक्षास टाेला
Eknath Shinde , Sangli
Ambadas Danve : शिंदे-फडणवीस सरकारनं पुसली शेतक-यांच्या तोंडाला पाने : अंबादास दानवे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com