राज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं.
मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २,२१५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली.
३१.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार आहे
पुढील ८ ते १० दिवसांत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पूराचा फटका ३० जिल्ह्यांना बसला आहे. आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अतिवृष्टीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये पीक नुकसानीसाठी २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आी आहे. राज्यातील तब्बल ३१.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे कधी जमा होणार हे सांगितले. या महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना पैसे मिळतील. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये सर्व मंत्री आणि पालकमंत्र्यांना राज्यभरातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'उद्यापासून नुकसाग्रस्त भागांचा पाहणी दौरा करा असे आदेश सर्व मंत्र्यांना देण्यात आले आहेत. राज्यात ९७५ मिली मीटर पाऊस झाला. तो सरासरीच्या १०२ टक्के जास्त आहे. सध्या धाराशिव आणि बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे. मंत्री गिरीश महाजन तिकडेच आहेत. ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या ८ ते १० दिवसांत पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. तब्बल २२१५ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे.'
मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, 'शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकाद्याचा मृत्यू असेल, घरांचे नुकसान असेल, जनावरे दगावली असेल त्या कुटुंबाला मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. पालकमंत्री आणि मंत्र्यांना पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यास सांगितले. मी देखील पूरग्रस्त भागात जाणार आहे. परिस्थिती समजून घेऊन आणखी मदत करता येईल का हे प्रयत्न सुरू आहेत. ओला दुष्काळचं जाऊ द्या याठिकाणी जे काही नुकसान झाले आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत नियमानुसार देता येईल ती देऊ. खरडू गेलेल्या जमिनीकरता आपल्याकडे जीआरआहे त्यानुसार मदत करता येईल.'
केंद्र सरकारकडून मदत घेतली जाईल असे म्हणत मुख्यमंत्री म्हणाले की, 'केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. ती मदत येण्यास उशिर लागतो. केंद्र सरकारची मदत निश्चित घेऊन. पण त्याकरता राज्य सरकार थांबणार नाही. आम्ही २२१५ कोटी आम्ही शेतकऱ्यांची मदत दिली आहे. सध्या वाटप सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत केली जात आहे. ज्या नागरिकांचे स्थलांतर केले आहे. त्याच्या राहण्या- खाण्याची आणि पिण्याची व्यवस्था केली आहे. पाणी ओसरल्यानंतर साफसफाई झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल. तोपर्यंत सरकार त्यांची व्यवस्था करेल. राज्यात अतिवृष्टीमुळे ८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जनावरं दगावली. आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असते. पण मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही. आम्हाला शक्य तितकी मदत आम्ही करून आणि केंद्र सरकारची मदत घेऊ.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.