

बुलढाण्याती धक्कादायक प्रकार
वर्षभर हजर न राहता शिक्षकांनी घेतला पगार
सात निलंबित शिक्षकांना मुख्यालयात हजार राहण्याचे आदेश होते
बुलढाणा जिल्ह्यात वर्षभर गैरहजर राहून कोणतेही काम न करता शिक्षकांनी पगार घेतला आहे. विविध कारणांनी निलंबित सात शिक्षकांना संग्रामपूर तालुक्यातील मुख्यालय येथे निलंबित काळासाठी हजर राहण्यास सांगितले होते. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या IAS मुख्याधिकाऱ्यांनी हे निलंबन आदेश काढले होते. त्यामध्ये निलंबित शिक्षकांना मुख्यालय राहणे बंधनकारक केले होते.
मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिलेले असतानाही यातील एकही शिक्षक वर्षभर मुख्यालयात हजर न राहता त्यांना वर्षभराचे वेतन देले आहे. संग्रामपूर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हे वेतन काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे जनतेच्या पैशाची स्वयंघोषित नियम बनवून कशी उधळपट्टी होत आहे, असं वास्तव समोर आले आहे.
निलंबित सात शिक्षकांपैकी रेखा मानकर या पॉक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी आहे. त्यांना संग्रामपूर तालुक्यातील निमखेड प्राथमिक शाळा हे मुख्यालय देण्यात आलेले आहे. मात्र, गेल्या डिसेंबर 2024पासून त्या एकही दिवस मुख्यालय आलेल्या नसल्याची नोंद या कॅमेरात कैद झाली आहे. याबाबत संग्रामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिरी दीपक देविदास ताले यांना विचारणा केली असता त्यांनी स्वयंघोषित नियमच माध्यमांना सांगितले.
या पंचायत समिती अंतर्गत सात निलंबित शिक्षक मुख्यालय हजर न राहता त्यांचे वर्षभराचे पगार काढल्याचही अजबच उत्तर गटशिक्षणाधिकारी ताले यांनी दिलं. तर निलंबित शिक्षकांना मुख्यालय हजर राहणे हे बंधनकारक नसून त्यांना पगार दिला जात नसून उदरनिर्वाह भत्ता दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेचा गेल्या वर्षभराचा पगार मुख्यालय हजर न राहता काढल्याने आता गटशिक्षणाधिकारी अडचणीत आले आहे. कारण त्यांनी जनतेच्या पैशाचा अपव्य केल्याचं म्हटलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.