Mulshi Crime: मुळशीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुझा मुळशी पॅटर्न करेन; पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

Mulshi Crime News: मुळशीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. व्यवसायाच्या वादातून पुण्यातील एका व्यापाऱ्याला धमकी देण्यात आली आहे. मुळशीत पाय ठेवशील तर तुझा मुळशी पॅटर्न करेन, अशी धमकी व्यापाऱ्याला देण्यात आली आहे.
Mulshi Crime
Mulshi CrimeSaam Tv
Published On

मुळशीत एका व्यावसायिकाला धमकी देण्यात आली आहे. मुळशीत पाय ठेवलास तर मुळशी पॅटर्न करेन, असं म्हणतं व्यवसायिकाला धमकी देत घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे.पुण्यात टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वादातून व्यावसायिकाला धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mulshi Crime
Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

नाहीतर मुळशी पॅटर्न करेन, पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

"धंद्याासाठी गाड्या आणायच्या नाहीत, नाहीतर मुळशी पॅटर्न करेन" अशा प्रकारची धमकी देण्यात आली. जाकीर गणी मुजावर (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवसायाच्या वादातून धमकी

दत्तात्रय मोरे (वय ५०) या या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी या दोघांचा ही टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या टुरिस्ट गाड्या मुळशी तालुक्यातील निवे येथे असलेल्या एका आश्रमामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. आश्रमाच्या अनुयायांची ने-आण करण्याची फिर्यादीची व्हेंडरशिप आहे.

Mulshi Crime
Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

दत्तात्रय मोरे याने १८ नोव्हेंबर रोजी फिर्यादीला "मुळशीमध्ये पाय ठेवायचा नाही. इकडे धंदयासाठी गाड्या आणायच्या नाहीत. नाहीतर मुळशी पॅटर्न करेन" अशी धमकी दिली होती घाबरलेल्या फिर्यादी ने हडपसर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रारी अर्ज दाखल केला होता. या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चौकशीसाठी पोलिसांनी मोरे याला फोन केला. त्याचा राग आल्याने आरोपीने मोबाईलवरुन फिर्यादी मुजावर यांना फोन केला. "तु माझी पोलिसांकडे तक्रार का केली? तुझ्याकडे बघुन घेतो" अशी धमकी दिली आहे.

Mulshi Crime
Pune : एकतर्फी प्रेमातून कांड, राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून, आरोपीला जन्मठेप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com