UP Crime: बहराइच हिंसाचारात रामगोपालची हत्या, आरोपी सरफराजला फाशी; 9 जणांना जन्मठेप

उत्तर प्रदेशातील बहराइच हिंसाचारातील रामगोपाल हत्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सरफराज याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
UP Crime: बहराइच हिंसाचारात रामगोपालची हत्या, आरोपी सरफराजला फाशी; 9 जणांना जन्मठेप
Published On

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये 13 ऑक्टोबर 2024 रोजी दुर्गा प्रतिमेच्या विसर्जनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात 22 वर्षीय रामगोपाल यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील 11 दोषींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने दोषी सरफराजला फाशीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय इतर 9 दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

न्यायालयाने काय दिला निर्णय?

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी बुधवारी आलेल्या निकालात न्यायालयाने मुख्य आरोपी अब्दुल हमीद, त्याचे तीन मुलं फहीम, सरफराज उर्फ रिंकू आणि तालिब उर्फ सबलू यांच्यासह 10 आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती.

UP Crime: बहराइच हिंसाचारात रामगोपालची हत्या, आरोपी सरफराजला फाशी; 9 जणांना जन्मठेप
Hotel मालक अन् वेटरकडून २ तरूणांना मारहाण; कारण फक्त एवढंच..., पुण्यात नेमकं घडलं काय?

यामध्ये कोर्टाने ९ डिसेंबर रोजी १३ आरोपींपैकी १० जणांना आरोपी करार देण्यात आला होता. तर उर्वरित तीन आरोपींना पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. दोषी ठरवण्यात आलेला आरोपी अब्दुल हमीद आणि त्याच्या मुलांची नावं फहीम, सरफराज, तालिब, सैफ, जावेद, जीशान, ननकऊ, शोएब आणि मारूफ आहेत. अब्दुलच्या मुलांपैकी सरफराजला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

UP Crime: बहराइच हिंसाचारात रामगोपालची हत्या, आरोपी सरफराजला फाशी; 9 जणांना जन्मठेप
रूळावर महिलेचा मृतदेह; संतप्त जमावाचा २ पोलिसांवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये नेमकं घडलं काय?

दरम्यान सरकारी वकील प्रमोद सिंह यांनी सांगितलं की, अवघे १३ महिने आणि २६ दिवसांत हे कोर्टात ट्रायल पूर्ण झालं असून त्याचा निर्णय हाती आला आहे.

घटना कधी आणि कुठे घडली?

ही घटना महसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजगंजमध्ये घडली होती. डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांवरून वाद सुरू झाला आणि त्याचदरम्यान दगडफेक आणि गोळीबार झाला होता. यावेळी रामगोपालला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला.

UP Crime: बहराइच हिंसाचारात रामगोपालची हत्या, आरोपी सरफराजला फाशी; 9 जणांना जन्मठेप
Pune: लग्नानंतर नवरा नपुंसक असल्याचं कळलं; नववधुला सासऱ्याकडून धमकी, कुणाला सांगितलं तर...

त्यानंतर पोलिसांनी 11 जानेवारी 2025 रोजी चार्जशीट दाखल केली होती. यानंतर 18 फेब्रुवारीला संशयितांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. 12 साक्षीदारांची साक्ष झाल्यानंतर 21 नोव्हेंबरला निकाल राखून ठेवण्यात आला होता.

UP Crime: बहराइच हिंसाचारात रामगोपालची हत्या, आरोपी सरफराजला फाशी; 9 जणांना जन्मठेप
Youtube बघून ऑपरेशन, डॉक्टरचं दारूच्या नशेत भयंकर कृत्य, महिलेच्या नसा, आतडी अन् अन्ननलिका कापली

कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल?

आरोपींवर BNS च्या कलम 103(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. याशिवाय कलमं 191(2), 191(3), 190, 109(2), 249, 61(2) आणि आर्म्स अॅक्टचे कलम 30 लावण्यात आलंय. या कलमांनुसार 2 ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा मृत्युदंडाची तरतूद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com