Today Marathi News : मध्य रेल्वेवरील महा मेगाब्लॉकला सुरुवात, रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत प्रवाशांचे होणार हाल

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (30 may 2024) : राज्यातील ताज्या सर्व घडामोडी, देश आणि विदेशातील घडामोडी, लोकसभा निवडणूकीचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा.
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे

पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार यांचे राज्य सरकारकडून निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार हा उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे

महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले

मध्य रेल्वेवरील महा मेगाब्लॉकला सुरुवात, रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत प्रवाशांचे होणार हाल

पुढचे तीन दिवस मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठे जिकरीचे असणार आहेत कारण गुरवारी मध्यरात्री साडे बारापासून मध्य रेल्वेवरील महा मेगाब्लॉकला सुरुवात होणार आहे. तब्बल 63 तासांचा हा मेगाब्लॉक असून रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

नवीन लोकसभा स्थापन झाल्याची अधिसूचना येईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार : निवडणूक आयोग

सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

पंतप्रधान मौन व्रतासाठी गेलेत, आता डिबेट अशक्य; शेवटच्या दिवशीही राहुल गांधीनी मोंदींना काढला चिमटा

आज लोकसभेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता, प्रचार संपला... देशात INDIA आघाडीचं सरकार बनणार आहे

काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की शेवटच्या मिनिटापर्यंत पोलिंग बूथ, EVM मशिन्स वर लक्ष द्या

मी पंतप्रधान यांना आवाहन केल होत की मी डिबेटसाठी तयार आहे तुम्हीही या पण ते आले नाहीत

आता डिबेट शक्य नाही कारण पंतप्रधान मौन व्रतासाठी गेलेत

राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियंका गांधी यांच्या सभा, रोड शो अधिक

राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त प्रियंका गांधी यांच्या सभा आणि रोड शो

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी 55 दिवसात 108 सभा आणि रोड शो केले

तर राहुल गांधी यांनी 107 प्रचार सभा, रोड शो आणि कॉर्नर सभांना संबोधित केलं

आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली

सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान होणार आहे

पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेनेची सहा महिन्यापासून तयारी -विनायक राऊत

रत्नागिरी - कोकण पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेनेची सहा महिन्यापासून ची तयारी - विनायक राऊत

नाशिक किंवा कोकण यापैकी एक जागा शिवसेना काँग्रेसला सोडणार

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारांना फसवण्याचा धंदा चालू केला आहे

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांचे मनसुबे सफल होणार नाही

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी सर्वात जास्त जागा जिंकेल

MHADA : विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला

विक्रोळी येथील म्हाडा च्या ४० क्रमांक इमारतीमध्ये घरातील स्लॅब कोसळला, दोन गंभीर जखमी , सूर्यकांत म्हादलकर

शरद म्हसाळ अशी जखमींची नावे दोघांना आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले

आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, पदवीधर निवडणुकीसंदर्भात चर्चा

भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

भेटीत विधानपरिषद आणि पदवीधर निवडणुकांसंदर्भात चर्चा झालीची माहिती

अभिजीत पानसे यांचं नाव राज ठाकरे यांनी घोषित केल्यावर महायुतीमध्ये वाद असल्याची चर्चा

महायुतीस समन्वय साधावा आणि राज ठाकरे यांनी देखील महायुतीला समर्थन दिल्यामुळे त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी अशी शेलार आणि राज ठाकरेंची भेट घेतली त्याची माहिती

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, भावेश भिंडेची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना

आरोपी भावेश भिंडेची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

दुर्घटनेत १७ लोकांचा झाला होता मृत्यू तर ७४ जखमी

पोलीस महासंचालिका रेशमी शुक्ला यांनी माध्यमांकडे फिरवली पाठ

पोलीस महासंचालिका रेशमी शुक्ला यांची बैठक संपली त्यानंतर रश्मी शुक्ला रवाना झाल्या. रेशमी शुक्ला यांनी माध्यमांकडे फिरवली पाठ. माध्यम प्रतिनिधींना चकवा देत त्या दुसऱ्या गेटने निघून गेल्या.

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाने हजर राहण्याचे दिले आदेश

 पुणे न्यायालयाने  १९ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

राहुल गांधींना 19 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहणेबाबत JMFC अक्षी जैन यांनी CrPC कलम 204 अन्वये आदेश दिलेत. याप्रकरणी प्रथम दर्शनी राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये लंडन येथील भाषणात निराधार विधाने करून सावरकरांची बदनामी केल्याचा चौकशी अहवाल पुणे शहर पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता.

पुणे अपघात प्रकरणावर राज्यपाल रमेश बैस यांचं मोठं वक्तव्य

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जर, एनसीसी प्रशिक्षण मिळाले असते तर त्याच्याकडून दुर्घटना घडली नसती.

राज्यपाल रमेश बैस यांचे वक्तव्य

एनसीसी मध्ये विद्यार्थ्यांवर देशभक्ती, शिस्त व समाजसेवेचे संस्कार घडतात.

सर्वांकरीता एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य झाले तर ती खरोखरच चांगली गोष्ट होईल.

विदर्भात आजही तापमान ४५ अंशांच्या पुढे, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 

विदर्भातील आजही तापमान 45 पार गेल्याचं दिसून आलेल आहे..आज सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्राह्मपुरी येथे 46.9 तर चंद्रपूर शहरात 45.6 तापमानाची नोंद झालेली आहे...तेच वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे...

कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये शिरला साप शिरला

कल्याणमधील रेल्वे हॉस्पिटलमध्ये साप आढळून आल्याने हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली . साप शरीराचे बातमी समजतात रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता . याबाबत वॉर फॉउंडेशन चे प्राणी मित्र सतीश बोबडे ह्यांना संपर्क केला प्राणीमित्र तन्मय माने व साहस बोबडे ह्यांच्या सोबत हॉस्पिटल ला जाऊन सापाचा सुखरूप बचाव केला व पकडलेला साप हा धामण जातीचा बिनविषारी सर्प असून सदर सर्प हा लवकरच योग्यती वैद्यकीय तपासणी करून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग मुक्त करण्यात येईल असे प्राणी मित्रांनी सांगितले.

Hinjewadi IT Park : हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्या परराज्यात स्थलांतरित करण्यावरून शरद पवार गट आक्रमक

हिंजवडी आय.टी पार्क मधील ३६ कंपनी परराज्यात स्थलांतरित करणाऱ्या राज्यसरकारच्या विरोधात युवक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक.

राज्यसरकारच्या बेरोजगारी वाढवणाऱ्या सरकारी धोरणा विरोधात युवकांची जोरदार घोषणाबाजी.

राज्यातील दुष्काळसदृश्य स्थितीत राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार

ज्या भागात पाण्याची टंचाई आहे. त्या भागात सुरू असलेली बांधकामं थांबविण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. पाण्याची बचत करण्यासाठी राज्य सरकार घेणार महत्वाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघा ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर महाराष्ट्रात अवघा २६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

Pune Porsche Car Accident :  पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला स्वतः घेतायेत आढावा

महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यात दाखल

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी रश्मी शुक्ला स्वतः घेत आहेत आढावा

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे बैठकीला उपस्थित

आत्तापर्यंत झालेला तपासाचा आढावा घेण्यासाठी रश्मी शुक्ला घेत आहेत बैठक

नवाज शरीफ यांच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

या मुद्द्यावर आमची भूमिका काय आहे हे तुम्हाला माहीत आहे

सध्याच्या परिस्थितीवरून हे स्पष्ट झाले आहे की पाकिस्तानमध्येही निःपक्षपाती दृष्टिकोन उदयास येत आहे

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांची प्रतिक्रिया

भारतासोबत 1999 साली केलेलं कारगिल युद्ध हा लाहोर कराराचा भंग असून ती आपली चूक होती अस दोन दिवसांपूर्वी शरीफ यांनी विधान केलं होत

Pune Porsche Car Accident : सीसीटीव्ही नव्हते अशा ठिकाणी ब्लड सॅम्पल घेतले, पुणे अपघात प्रकरणात सरकारी वकिलांचा दावा

मुलाचे ब्लड सॅंपल अशा ठीकाणी घेण्यात आले जिथे सीसीटीव्ही नाही

व्हॅाट्स अप कॅाल आणि संवाद ताब्यात घेतलेला आहे. त्यात इतर कोणाचा सहभाग होता याचा तपास घ्यायचा आहे

⁠विशाल अगरवाल आरोपींच्या संपर्कात होता हे तपासात पुढे आले आहे.

Navi Mumbai Hoarding : नवी मुंबईतील बेकायदेशीर होर्डिंग स्वखर्चानं हटवणार!

बेकायदा होर्डिंग स्वखर्चाने हटवणार

नवी मुंबईच्या नैना परिसरात होर्डिंग लावणाऱ्यांची मुंबई उच्च न्यायालयात हमी

चार आठवड्यांत होर्डिंग हटवण्याचे दिले आश्वासन

होर्डिंगवरील कारवाईबाबत धोरण ठोस नसल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी

सिडकोला न्यायालयाने पुन्हा धारेवर धरले

होर्डिंगवाल्यांना नव्याने परवानगीसाठी अर्ज करण्यास मुभा

दुर्घटनेला निमंत्रण मिळणार नसल्याची खबरदारी घेण्याची सिडकोला ताकीद

कर्नाटकमधील बेंगलोर रोझ कांद्याला निर्यात शुल्कातून वगळलं

कांदा निर्याती संदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी

कर्नाटक मधील बेंगलोर रोझ कांद्याला निर्यात शुल्कातून वगळलं

बेंगलोर रोझ कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवलं

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा निर्णय

तर महाराष्ट्रातील कांद्यावर मात्र पूर्वीप्रमाणे 40% निर्यात शुल्क

केंद्राकडून महाराष्ट्रतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय?

ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळं यांच्या विरोधात हिंगोलीत गुन्हा दाखल

ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळं यांच्या विरोधात हिंगोली पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरा पुढे गोळीबार झाल्याचे सांगत पोस्ट केली होती

मात्र पोलिसांच्या तपासात गोळीबार झाला नसल्याचे निष्पन्न झाल्याने , हिंगोली पोलिसांनी खोटी अफवा पसरून जनतेच्या मनात भीती निर्माण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे

पोहायला गेले पुन्हा परतलेच नाही; कोल्हापुरात बॅक वॉटरच्या पाण्यातून बुडून तिघांचा मृत्यू

कोल्हापूर : नाशिक आणि अहमदनगरमध्ये धरणात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता कोल्हापुरातही अशीच दुर्देवी घटना घडली आहे. कोल्हापुरात बॅक वॉटरच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राधानगरी धरणाच्या बॅक वॉटर म्हणजे दाजीपूर अभयारण्याच्या पायथ्याला असलेल्या भटवाडी येथील पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने कोल्हापुरात परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या राधानगरी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झालेल्या तिघांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि एक तेरा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या मृतांमधील एकाचे नाव सतीश टिपूगडे असे आहे. ते राधानगरीपैकी भैरीबांबर येथील राहणारे आहेत. तर अन्य दोन महिलांची ओळख पटलेली नाही. पोहायला गेल्यानंतर गाळात रुतून गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Pune Car Accident : विशाल अग्रवालच्या पत्नीची होणार चौकशी

पुणे कार अपघात प्रकरण

विशाल अग्रवालच्या पत्नीची चौकशी होणार

शिवानी अग्रवाल संशयाच्या भोवऱ्यात

अल्पवयीन तरुणाची आई शिवानी यांची ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी चौकशी होणार

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी होणार

पुणे पोलिसांकडून शिवानी अग्रवाल यांचा जबाब नोंदवणार

Pune News Update : ससूनचा डॉ. तावरे, हरनोळ, घटकांबळेच्या अडचणी वाढणार

पुणे -

रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकरणात डॉ. तावरे, हरनोळ, शिपाई घटकांबळे यांच्या अडचणी वाढणार

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील सेक्शन नव्याने वाढवले

⁠लाच घेतली असल्याचा पुणे पोलिसांचा ठपका

⁠हे सेक्शन लावल्यास न्यायालय बदलणार,

जेएमएफसी ऐवजी एसीबीसाठीच्या विशेष न्यायालयात होणार सुनावणी

Pune Sassoon Hospital : डॉ. तावरे, हळनोरसह तिघांना कोर्टात हजर करणार

पुणे

ससूनचे डॅाक्टर अजय तावरे, हळनोर आणि अतुल घटकांबळे यांची पोलीस कोठडी आज संपत आहे

⁠तिघांनाही दुपारी ३ वाजता कोर्टात हजर करणार

⁠पुणे पोलीस तिघांचीही पोलीस कोठडी वाढवून मागणार

⁠ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी तिघे मुख्य आरोपी

Nashik MNS Protest :  नाशिकमध्ये मनसेकडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध

नाशिक

शहरातील मनसे कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

जितेंद्र आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडवल्यानंतर जाळले

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मनसेही आक्रमक

आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी दिला आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा

ज्या ठिकाणी पोस्टर फाडले तिथे जाऊन नाक रगडून माफी मागावी; अन्यथा सिन्नर आणि मुंब्रा येथील आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करू, मनसेचा इशारा

Dombivli blast : डोंबिवली आगीच्या घटनेतील मृतांचा आकडा १३ वर, शेजारील कंपनीतील कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

डोंबिवली

डोंबिवली एमआयडीतील अमुदान कंपनी आणि आजूबाजूच्या कंपन्यांना लागली होती भीषण आग

अमुदान कंपनीशेजारी असलेल्या कॉसमॉस इंजीनियरिंग कंपनीलाही लागली होती आग

या आगीत जय नित्या सरकार हा कामगार झाला होता गंभीर जखमी

उपचारादरम्यान जय सरकार या कामगाराचा मृत्यू

मानपाडा पोलिसांची माहिती

साईभक्तांना मोठा दिलासा, नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्समध्येच प्रसादाचा लाडू मिळणार

शिर्डी / अहमदनगर

आता नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्समध्येच मिळणार प्रसादाचा लाडू

नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्समध्ये काउंटर सुरू

मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून काउंटर सुरू

साईभक्तांचा वेळ वाचणार

जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यासमोर झालेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. यावर आव्हाड यांनी माफी मागितली असली तरी, या कृतीच्या निषेधार्थ शिवसेना पुणे शहराच्या वतीने आज आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल आंदोलकांनी केला. हडपसर येथे आंदोलकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. जोरदार घोषणाबाजी करून कारवाईची मागणी केली.

जया शेट्टी हत्याकांड प्रकरण; छोटा राजन दोषी

हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजन दोषी ठरला आहे.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला आहे.

पुणे पोर्शे अपघात प्रकरण : ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल आरोपीच्या आईचे; अहवालात माहिती उघड

पुणे अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. डॉ. पल्लवी सापळे यांनी बनवलेल्या अहवालात मोठी माहिती समोर आली आहे.

ससूनमध्ये अल्पवयीन आरोपीचे म्हणून तीन व्यक्तीचे ब्लड सँपल घेण्यात आले आहे. एक महिला आणि दोन वयस्कर व्यक्तींचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.

डॉ श्रीहरी हरणोळने तीन ब्लड सॅम्पल घेतले होते. सबंधित महिलेची ब्लड सॅम्पल हे अल्पवयीन आरोपीच्या आईचे ब्लड सॅम्पल असल्याची माहिती आहे.

पुरावा नष्ट करण्याच्या प्रकरणात आईवर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. पोलीस अल्पवयीन आरोपीची आई अश्विनी अग्रवाल यांचाही शोध घेत आहे.

उत्तर भारताला उन्हाचा तडाखा कायम, दिल्ली, पंजाबसह इतर राज्यात उष्णतेचा रेड अलर्ट

उत्तर भारतात आजही उन्हाचा तडाखा कायम आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, सह इतर 8 राज्यात उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल दिल्लीत तापमान 47 डिग्री सेल्सिअसच्या पुढे होते. नागरिकांनी काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आव्हान करण्यात आलं आहे. गजबजलेल्या इंडिया गेट परिसरात सकाळी 10 नंतर पर्यटक नसल्याचं चित्र आहे.

Pune Hit and Run case : ससूनच्या 'त्या' तिघांची कसून चौकशी होणार

पुणे

डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे यांची सखोल चौकशी होणार

चौकशीसाठी तिघांना पुणे पोलीस आयुक्तालयात आणले गेले

आर्थिक रसद, ब्लड रिपोर्ट फेरफार करणे, मोबाइलमधील मेसेज आणि कॉल अशा अनेक गोष्टींची चौकशी होणार

डॉ. अजय तावरे आणि डॉ. हाळनोर यांना आज न्यायालयात हजर करणार

Pune News : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज पुण्यात येण्याची शक्यता

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज पुण्यात येण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्तालयात येण्याची शक्यता आहे. पुणे कल्याणी नगर अपघात, मतदान मोजणी, वाहतूक कोंडी अशा अनेक विषयांचा आढावा घेण्यासाठी शुक्ला यांची ही भेट असणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे.

ठरलं! कोकण पदवीधरची जागा काँग्रेस लढणार

कोकण पदवीधरची जागा काँग्रेस लढणार आहे. काँग्रेसचे रमेश कीर उमेदवारीचा अर्ज ३ जूनला दाखल करणार आहे. विधानपरिषद कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. नाना पटोले यांच्या उपस्थितीत कोकण भवनमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल

बळीराजासाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत घोषणा केली आहे

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेचा होता डॉ श्रीहरी हाळनोरवर दबाव

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार करण्यासाठी डॉ. अजय तावरेचा डॉ श्रीहरी हाळनोरवर दबाव असल्याचा माहिती समोर येत आहे. डॉ तावरे आणि विशाल यांच्यात बोलणे झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी तावरेनी दबाव टाकल्याची हाळनोरनी कबुली दिली आहे. रक्त बदल केले, पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत होते, हाळनोरने कबुली दिली आहे. डॉ श्रीहरी हाळनोर सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे.

Jitendra Awhad : भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील कोपरी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपचं आंदोलन सुरु आहे. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

सलमान खानच्या गोळीबार प्रकरण : बिश्नोई गँगच्या ३ सदस्यांना अटक

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्या शूटर्सना मदत करण्याच्या संशयावरून बिश्नोई गँगच्या तिघा सदस्यांना अटक करण्यात आली आहे. चंदिगढ पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. रवींद्र सिंह, करण कपूर आणि जावेद झिंझा नावाच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी वर्चुअल नंबर आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने एकमेकांशी संपर्कात होते. आरोपींवर पंजाब, राजस्थान आणि चंदीगडमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलीस लवकरच आरोपींचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

Pune hit and run Case : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : डॉक्टरांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू

पुणे ससून रुग्णालय ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. डॉ अजय तावरे याला रक्ताचे नमुने बदलण्यासाठी लाखो रुपये दिल्याची प्राथमिक माहिती आहे. डॉ. अजय तावरे याला दिलेल्या मोठ्या आर्थिक रकमेची पोलिसांकडून शोध सुरू आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात ३ लाख रुपये पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत.

Hingoli Accident : हिंगोलीत खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

हिंगोलीत खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या ट्रॅव्हल्समध्ये पंचावन्न प्रवासी होते. या अपघातात सात जण गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातात चालक गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोली नांदेड मार्गावरील वसमत फाटा येथे ही घटना घडली आहे.

Pune hit and run Case  : रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णालायत बाहेरील लोकांचा प्रवेश

रक्ताचे नमुने घेण्यासाठी चक्क ससून रुग्णालयात बाहेरील लोकांचा प्रवेश झाला. पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन तरुणाचे रक्त घेताना त्या ४ व्यक्ती कोण होत्या, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ससून रुग्णालयातील नव्हे तर बाहेरच्या लोकांनी आत येऊन रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Accident : पुण्यातील सातारा रोडवर असणाऱ्या पंचमी हॉटेल चौकात भयानक अपघात

पुण्यातील सातारा रोडवर असणाऱ्या पंचमी हॉटेल चौकात अपघात झाला आहे. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारणे बीआरटीत प्रवेश करत बीआरटीमधील बॅरिगेट तोडले. बॅरिगेट तोडत गाडी रस्त्यावर आली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

Railway mega block : पुणे-मुंबई दरम्यान २९ रेल्वे गाड्या रद्द

पुणे मुंबई दरम्यान 29 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळाच्या आणि टर्मिनलच्या कामाच्या विस्तारीकरणासाठी दोन दिवस पुणे मुंबई रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. 1 आणि 2 जून रोजी रेल्वे गाड्या रद्द राहणार आहेत. यात प्रगती एक्सप्रेस ,डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्सप्रेसचा समावेश आहे.

दिल्लीत उष्णतेचा कहर; अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना

दिल्लीमध्ये प्रचंड उष्णतेमुळे अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन विभागाला एका दिवसात आगीचे २२० कॉल आलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.