Marathi News Live: नागपूरमधील नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live today : आज रविवारी दिनांक ८ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Saam TV Live Marathi News
Today's Marathi News Live By Saam TV Saam TV
Published On

Pune News: पुण्यात बायकोनेच केला नवऱ्याचा खून

पुण्यात एका महिलेने आपल्याच पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पती दारू पिऊन त्रास देत असल्याने महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे.

नागपूरमधील नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

बुनागपूर जिल्हातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महादूला येथे पोहण्याच्या मोहात दोघांचा बुडून मृत्यू झाला. वृषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष साऊसाखडे अशी मृतक मुलांची नावे आहेय. ते दोघेही इयत्ता ८ व्या वर्गात शिकत होते. शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत दोघेही पोहायला गेले. पाण्याचा अंदाज आल्यानं खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालाय.

लोणीकंद पोलिसांनी पुण्यातील एन्जॉय ग्रुपच्या मुसक्या आवळल्या

एन्जॉय ग्रुपच्या गुन्हेगार सदस्याकडून 7 पिस्तुलेसह 23 काडतुसे असे जप्त करण्यात आहेत. एन्जॉय ग्रुपचा शुभम मॅटर जगतापसह सात जणांच्या मुसक्या लोणीकंद पोलिसांनी आवळल्या. सुमित उत्तरेश्वर जाधव, अमित मस्के आवाचरे, ओमकार उर्फ भैया जाधव, अजय उर्फ सागर हेगडे, राज बसवराज स्वामी, लतीकेश गौतम पोळ, रोप उर्फ लाला बागवान, या गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

वनराज आंदेकर खून प्रकरण; हत्यारे पुरवण्याप्रकरणी एकाला अटक

गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आरोपी संपत वाघमारे वय 20 वर्ष रा.आंबेगाव पठार पुणे यास ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने त्याचेकडे तपास करता त्याने हत्या करताना वापरलेले पिस्टल हे गुन्हयातील पोलिस कस्टडीतील आरोपी मित्र आकाश म्हस्के,अनिकेत दुधभाते यांचे सह घेवुन आल्याचे सांगितले. आंदेकर खून प्रकरणात संगम वाघमारे याने हत्यारे आणणे पुरवणे यामध्ये महत्वाची भुमिका बजावली आहे.त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने 11 सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai Accident: लोअर परेल ब्रिजवर भीषण अपघात, इलेक्ट्रिक कारची दुचाकीला धडक

लोअर परेल ब्रिजवर भीषण अपघात झालाय. भरधाव इलेक्ट्रिक कारची दुचाकीला धडक झाल्याने हा अपघात झालाय. यात एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी झालेत. कार चालक मनीष सिंगला (वय २५) ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय. अपघातात आयुष सिंह,२० नावाच्या तरुणाचा मृत्यू झालय. तर शिवम सिंह, २२ आणि विशाल सिंह, २१ हे दोघे जखमी झालेत. तिघेजण वरळीचे रहिवाशी असल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra Politics : पुण्यात भाजपला मोठा धक्का, माजी आमदार तुतारी फुंकण्याच्या तयारीत

पुण्यात वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची घरवापसी होणार बापूसाहेब पठारे गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून हाती तुतारी घेणार असल्याचे केले स्पष्ट केलं आहे.

Beed Rain News : बीडमध्ये अतिवृष्टी, माजलगाव तालुक्यात पूल गेला वाहून

बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड- चाहुर तांडा येथील ओढ्यावरील पूल अतिवृष्टीने वाहून गेल्याने गावातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.. निकृष्ट दर्जाचा पूल बांधल्याने पूल वाहून गेलाय, असा आरोप करत नागरिकांनी तात्काळ पर्यायी पुलाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे..दरम्यान हा पुल वाहून गेल्याने तालखेड, चाहुर तांडा, खेरडा खुर्द व शहापूर मजरा गावासाठी ये - जा करण्यासाठी ग्रामस्थ नागरिकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे..

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील घोंगडी बैठकीसाठी परळीत दाखल

मनोज जरांगे पाटील हे परळी शहरात घोंगडी बैठकीसाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, फटाक्यांच्या आतिषबाजीसह जेसीबीने फुलांची उधळण करत अन क्रेनने हार घालत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही मिरवणूक सभास्थळ असणाऱ्या हलगे गार्डन येथे पोहोचणार आहे. त्या ठिकाणी जरांगे पाटील हे घोंगडी बैठकीच्या माध्यमातून उपस्थित मराठा बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान मुंडेंच्या परळीमध्ये ही घोंगडी बैठक होत असल्याने या बैठकमय सभेतून जरांगे पाटील काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

कर्जत तालुक्यातील चिकन पाडा येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे.

पती, पत्नी आणि लहानग्या मुलाची अज्ञाताने हत्या केली.

नेरळ पोलिस घटनास्थळी दाखल, मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु

औसा विधानसभेवर काँग्रेसचा दावा, महाविकास आघाडीमध्ये ठिणगी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूरमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. औसा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याचे संकेत सध्या दिसत आहेत. कारण औसा विधानसभेच्या जागेवर या अगोदर ठाकरे गटाच्या शिवसेने दावा केला आहे. माञ आता त्यात महाविकास आघाडीचे नेते तथा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी औसा आणि निलंगा विधानसभेच्या जागेवरून एक सूचक विधान केलं आहे. औसा आणि निलंगा इथ आम्हाला कोंग्रेस पक्षाचा आमदार पाहिजे.

जालन्यात भटक्या विमुक्त आदिवासी समाजाची रॅली 

जालन्यातील अंबड येथे भटक्या विमुक्त आदिवासींच्या विविध मागणीसाठी राज्यस्तरीय चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आलं, या परिषदेचे अगोदर अंबड शहरातून रॅली काढण्यात आली. भटक्या विमुक्त समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात ॲट्रॉसिटी सारखा विशेष कायदा करावा , नॉन क्रिमिलियर ची आठ रद्द करावी यासह जातीय जनगणना करावी, या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली. दरम्यान आज एक दिवसाच्या चिंतन शिबिरामध्ये भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर चर्चा होऊन सरकार दरबारी आवाज उठवण्याचा निर्धार या शिबिरात केला जाणार आहे.

संजय शिरसाठ काय म्हणाले ?

अजित पवार त्यांनी केलेली चूक हे मान्य करणे म्हणजे मोठ्यापणा आहे. तुमच्यासारखे नाही की कुटुंबापासून विभक्त झाले म्हणजे विभक्त झाले. माझे कुटुंब माझे जबाबदारी इथपर्यंत तुम्ही मर्यादित राहिलेले लोक आहात. तुम्हाला कुटुंबाची व्याख्या काय करणार. कुटुंबात थोडी जरी फूट झाली तर त्याची यातना त्या त्या परिवारला भोगावी लागते,त्यांना त्याची जाणीव होते ,त्यांना जाणीव नसते ते लोक असे वक्तव्य करतात
संजय शिरसाठ

पुणे पोलिसांची जय्यत तयारी

पुण्यात गणेशोत्सवात मध्यभागात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी २७ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शहराच्या मध्यभागात मानाच्या गणपतींचे दर्शन तसेच देखावे पाहण्यासाठी पुणे शहर तसेच जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होते.

उत्सवाच्या काळात परगावाहून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

भाविकांना मोटारी, तसेच दुचाकी लावण्यासाठी २७ ठिकाणी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे,अशी माहिती वाहतूक शाखेनी दिली.

विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.

मनोज जरांगे हेच ईडब्ल्यूएस आरक्षणचा खरा मारेकरी आहे. ईडब्ल्यू एस संदर्भातील पहिली भूमिका आता त्यांची असणारी मागणी यातून त्यांचे बदलते रंग यातून दिसून येत आहेत. खरं म्हणजे आता मनोज जरांगे पाटलांना वैफल्य आलं आहे. आता मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न बाजूला राहिला. केवळ राजकीय नौटंकी करण्याचं काम पाटील करताना दिसत आहेत. त्यामुळेच आता मराठा समाजाचा प्रतिसाद कमी होताना दिसून येत आहे.
प्रवीण दरेकर, भाजप नेते

धुळे- चोरट्यांनी घरातील कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवून साडेतीन लाखांहून अधिकचा ऐवज केला लंपास

धुळे शहरातील जामचा मळा येथील सुलतानया मदरसा परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्यांनी कुटुंबियांच्या डोक्याला बंदूक लावून घरातील सोन्या-चांदीचे दागिने लुटून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे, रात्रीच्या वेळी अचानक चोरट्यांनी मागच्या दरवाजाने घरात प्रवेश केला व घरात असलेल्या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून घरातील सोने-चांदीचे दागिने व पैसे कुठे ठेवले असे विचारणे केली, यानंतर या चोरट्यांनी घरात असलेल्या कपाटात तपासणी केली असता जवळपास साडेतीन लाखांहून अधिकचे सोन्या चांदीचे दागिने या चोरट्यांनी चोरून कोणालाही याबाबतची वाच्यता न करण्याची धमकी महिलेला दिली, त्यानंतर जाताना महिलेच्या अंगावरील देखील सोन्या-चांदीचे दागिने घेऊन या चोरट्यांनी पोबारा केला आहे.

आरोपी अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयात केलं हजर

बदलापूर लैंगीक अत्याचार प्रकरण

आरोपी अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयात केलं हजर

दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयाने सुनावली होती तीन दिवसांची पोलीस कोठडी

पोलीस कोठडी संपल्याने आज कल्याण न्यायलयात केलं हजर

मुलुंडमध्ये आढळली ९ फुटी मगर

मुलुंड येथील निर्मल लाईफस्टाईल येथील जवळील असलेल्या सोसायटीमध्ये आढळली 9 फुटाची मगर

मगर आढळतात मुलुंड मधील रॉ या संस्थे कडून आले पकडण्यात

निर्मल लाईफस्टाईल येथील रहिवासी विभागात मगर आढळल्याने भीतीचे वातावरण

मगरीवर औषधोपचार करून तिला पुन्हा जंगलात पाण्याच्या ठिकाणी सोडण्यात आले

Pune News: सीबीआयकडून पुण्यातील तत्कालीन महिला पोलीस उपायुक्त,  निवृत्त महिला ACP सह इतरांवर गुन्हा दाखल

विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधीमंडळात सादर केलेल्या पेन ड्राईव्हवरुन सीबीआयने आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सरकारी वकील प्रविण चव्हाण, पुण्यातील तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण विजय पाटील यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप विधीमंडळात केला होता. त्यावेळी त्यांनी पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्ह सादर केला होता. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयातील बसविलेल्या घड्याळात कॅमेर्‍यातून हे सर्व व्हिडिओ रेकॉडिंग करण्यात आले होते. याचा तपास शिंदे सरकार सत्तेवर आल्यावर सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.

Urli Kanchan News: दुकानात चोरी करणाऱ्या चोरांना ग्रामस्थांनी पकडलं

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत किराणा दुकानात खाद्य तेलांच्या डब्यांची चोरी करणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ग्रामस्थांनी तिघांना पकडले असून दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कस्तुरी मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या विजय ट्रेडर्स या ठिकाणी हि घटणा घडली आहे.

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात  अतिसाराची लागण; तिघांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या दुर्गम अशा गोमाल या गावामध्ये अतिसाराच्या लागणमुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर अनेक रुग्ण हे जळगाव जामोद व मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. गोमाल हे गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहन जायला रस्ता नसल्याने अतिसारामुळे मृत झालेल्या रुग्णांना रुग्णालयात न्यायला वेळ झाल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर मृत्यूनंतरही या रुग्णांचे मृतदेह गावात न्यायला 15 किलोमीटर झोळीत टाकून न्यावे लागले आहे .त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही या गावात रस्ता नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य प्रशासनाला या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्वला पाटील यांनी साम टीव्ही शी बोलताना सांगितलं. त्यामुळे गोमाल गावात अतिसाराची लागण असल्यावरही बुलढाणा आरोग्य प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती आहे. तर गोमाल या गावात व परिसरात भीतीच वातावरण पसरला आहे.

Gondia News: अज्ञात आरोपींनी लावली पान टपरिला आग, आगीत टपरी जळून खाक

गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे अज्ञात आरोपींनी पान टपरीला आग लावली. त्यामुळे पान टपरी जळुन खाक झाली आहे. गोरेगाव येथील टेंभूर्निकर बंधूंनी पान टपरी चालवून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करत आहे. मात्र हि बाब गोरेगाव येथिल काही असामाजिक लोकांना नेहमी खटकत होती. त्यामुळे रात्रीच्या सुमारास काहीं अज्ञात लोकांनी पान टपरीला आग लावली. आग इतकी भयानक होती की आगीत संपुर्ण टपरी जळुन खाक झाली. त्यामुळे टेंभूर्निकर बंधूंना आपल्या उदर निर्वाहच प्रश्न पडला आहे. याची तक्रार गोरेगाव पोलिसांत देण्यात आली असुन पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Ajit Pawar Janata Darbar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार सुरू, नागरिकांची मोठी गर्दी,,,,,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जनता दरबाराला सुरुवात झाली असून या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, भगवानराव वैराट यांना विधान परिषदेवर संधी द्यावी या मागणीसाठी समर्थकांनी देखील मोठी गर्दी केली आहे

Jayant Patil: जयंत पाटील उद्या पुणे दौऱ्यावर

राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या पुणे दौऱ्यावर!उद्या पुण्यातील गणपती मंडळाचे दर्शन घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे उद्या गणपती मंडळांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

Mahesh landge : भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

पोलिस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांची सुपारी मिळाल्याचं एका अज्ञात व्यक्तीने सांगितेलय. मोशी मधील तरुणाला या संदर्भात ताब्यात घेतलेय.

वैतरणा नदीत दोन जण वाहून गेले

अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने या प्रवाहत भास्कर पाधीर व एक 7 वर्षाची लहान मुलगी असे दोन जण वाहून गेले प्रसंग सावधान राखत भास्कर पाधीर यांनी लहान मुलीला आपल्या खांद्यावर बसून नदि काठी असलेल्या ग्रामस्थांच्या स्वाधीन केले मात्र नदिच्या अति पाण्याचा प्रवाहात मुळे तो नदीत वाहून गेला आज सकाळपासून सावर्डे गावीतील लोक भास्कर चा सोध घेत आहेत. मात्र त्याचा कुठेही सोध लागला नाही. अखेर गावकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने गावकरी

संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

मुंबईतील व्यापार गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शहा यांच्याबाबत महाराष्ट्रातील भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत पण कमजोर गृहमंत्री आहेत. ह्या महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. या गृहमंत्र्याच्या देशाच्या कायदा सुव्यवस्थाकडे अजिबात लक्ष नाही. मला भीती वाटते ज्याप्रमाणे अनेक उद्योग त्यांनी पळवले, अनेक संस्था पळवल्या, त्याप्रमाणे एक दिवशी लालबागचा राजा देखील गुजरातला नेणार नाहीत ना?
संजय राऊत, खासदार, शिवसेना (ठाकरे गट)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदी दौऱ्यावर 

शांतीब्रह्म ह. भ. प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या 93 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी तसेच वारकरी पूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आळंदी दौऱ्यावर येत आहेत. अवघ्या काही मिनिटांनी एकनाथ शिंदे यांचे आळंदी येथे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे त्यानंतर ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी स्थळी जाऊन ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेणार आहेत. माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Ganesh utsav 2024 : गणेशोत्सवासाठी धाराशिव विभागातील 190 एसटी बस कोकणात रवाना

धाराशिव येथील एसटी विभागातील 190 एसटी बस या मुंबईकडे रवाना झाल्या असुन कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असतो त्यामुळे चाकरमान्यांना वेळेत पोहचता यावे यासाठी परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील एसटीच्या विविध विभागातुन एसटी मागवल्या होत्या यामध्ये 190 बस या धाराशिव विभागातुन मुंबईला रवाना करण्यात आल्या आहेत.तर गणेश विसर्जनानंतर 12 सप्टेंबर नंतर या धाराशिव विभागातील बस माघारी परतणार आहेत तर जिल्ह्यात उर्वरित बसचे आगारानुसार नियोजन करुन बस फेऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती विभागीय वाहतुक अधिकाऱ्यांनी दिलीय.

ganesh utsav 2024 : आज दीड दिवसांच्या गणरायाला निरोप 

शनिवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा विराजमान झाले. परंतु, आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत आहे. काल आलेला गणराया आज जाणार आहे. आणि त्याचसाठी गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून आता मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे. महापालिकेकडुन कृत्रिम तलावाद्वारे विसर्जनाची तयारी केली आहे. मुंबईत एकूण २०४ कृत्रिम तलावाची निर्मिती केली जात आहे. मुंबईतील दादर मधील शिवाजी पार्क पार्क परिसरात तीन कृत्रिम तलावाची महापालिकेकडुन निर्मिती केली जात आहे. त्यातील एक ९ फूट खोलीचा व दोन दुसरे ७ फूट तसेच पीओपी व शाडू मातीच्या मुर्तींसाठी वेगळा कृत्रिम तलाव अशी व्यवस्था करण्यात आली असुन, सर्व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज आहे.

हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा

भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न करणाऱ्या हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासून आंदोलन केले. महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारा कडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला,राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुती मध्ये मिठाचा खडा पडला आहे.

Shirdi : रक्तदान करा मोफत व्हीआयपी दर्शन घ्या‌, शिर्डी साईबाबा संस्थानचा उपक्रम

शिर्डी साईबाबा संस्थानकडून रक्तदात्यांना रक्तदानाच आवाहन करण्यात आलय.. रक्तदान करा आणि साई समाधीचे व्हिआयपी दर्शन घ्या, या उपक्रमाद्वारे रक्त संकलन वाढवण्याचा मानस साई संस्थानचा आहे.. मंदिर परिसर आणि आता संस्थानच्या भक्तनिवास परिसरात देखील रक्तदानाची सुविधा सुरू करण्यात आलीय.. संस्थान मार्फत अल्पदरात दोन रुग्णालये चालवली जातात तेथे रक्ताचा तुटवडा होत असल्याने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी हा उपक्रम सुरू केल्याच सांगितलय..

सिल्लोड तालुक्यातला खेळणा मध्यम प्रकल्प ओव्हरफुल; 35 ते 40 गावांचा पाणी प्रश्न मिटला

शेतीच्या सिंचनाचाही प्रश्न लागला मार्गी; जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे प्रकल्प तुडुंब भरले

ANC: मागील 3 ते 4 दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातला खेळणा नदीवर असलेला खेळणा मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आसपास असलेल्या 35 ते 40 गावांचा पाणी प्रश्न मिटलाय. शिवाय शेतीच्या सिंचनासाठी या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गात देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान झालेल्या या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील इतरही छोटे-मोठे प्रकल्प तुडुंब भरल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

Nagpur News : नागपूर जिल्ह्यात दीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

नागपूर जिल्हातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महादूला येथे पोहण्याच्या मोहात दोघांचा बुडून मृत्यू झाला. वृषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष साऊसाखडे अशी मृतक मुलांची नावे आहे. ते दोघेही इयत्ता ८ व्या वर्गात शिकत होते. शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत दोघेही पोहायला गेले. पाण्याचा अंदाज आल्यानं खोल पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मित्रही बुडाला.

Chhatrapati Sambhajinagar :  सिल्लोड तालुक्यातला खेळणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो ;35 ते 40 गावांचा पाणी प्रश्न मिटला

मागील 3 ते 4 दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातला खेळणा नदीवर असलेला खेळणा मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आसपास असलेल्या 35 ते 40 गावांचा पाणी प्रश्न मिटलाय. शिवाय शेतीच्या सिंचनासाठी या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गात देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान झालेल्या या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील इतरही छोटे-मोठे प्रकल्प तुडुंब भरल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

Manoj Jarange : धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये मध्यरात्री चर्चा

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची रात्री अडीच वाजता अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. जवळपास तासभर धनंजय मुंडे तिथे होते. रात्री अडीच वाजल्यापासून ते साडेतीन वाजेपर्यंत धनंजय मुंडे मनोज जरांगे पाटील यांच्याशी विविध मुद्द्यावरून चर्चा करत होते. त्यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील अजून पुढे आला नाही. मात्र आज मनोज जरांगे पाटील यांची परळीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने परळी, अंबाजोगाई आणि माजलगाव परिसरातील मराठा बांधव येतील अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली असल्याची चर्चा आहे.

बुलढाणा : एसटी बस चालकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला...

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे जळगाव जामोद आगारची बस अकोला वरून सोनाळा मार्गे जात होती. सोनाळा येथे रोड चे बांधकाम सुरू असल्यामुळे रोडच्या बाजूला खोदकाम केले आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडचण निर्माण होतं आहे. अशातच अकोला वरून जळगावजामोद ला येणाऱ्या एसटी बसचा अपघात बसचालकाच्या सतर्कतेमुळे टळला आहे.... संध्याकाळच्या सुमारास पाऊस सुरु असल्यामुळे रोड वर पाणीच पाणी साचले होते , त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती... याच वेळी रोडच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये एसटी बस अडकली होती. यावेळी एसटी बस चालकाने समय सूचकता दाखवत गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व मोठा अपघात टळला...

Marathi news : अहमदनगर २ मोकाट वळूंची भर रस्त्यात झूंज, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद  

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला असून या जनावरांच्या भर रस्त्यात होणाऱ्या झुंजी नित्याचा विषय बनला आहे. काल शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर दोन मोकाट वळुंमध्ये झुंज सुरू झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.. त्यातच या दोन वळूंनी झुंज करत असताना बाजूने दुचाकीवरून चाललेल्या पुरुष आणि महिलेला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही खाली पडून जखमी झाले. यात दुचाकीचे नुकसान झाले मात्र सुदैवाने दुचाकीवरील दोघेही थोडक्यात बचावले असून हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय. कोपरगाव नगरपरिषदेने शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : 8 हजार 500 माता आर्थिक लाभापासून वंचित; प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेची हुलकावणी.

Latest News : गरोदरपणात कष्टकरी आणि गरीब सकस आहार मिळावा त्यांचे आरोग्य सक्षम राहावे आणि जन्माला येणाऱ्या बाळाचे चांगले पोषण व्हावे यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेच्या माध्यमातून महिलांना 5000 रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाते. मात्र गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 8 हजार 363 महिला या अनुदानापासून वंचित असल्याची माहिती समोर आलीय. 2017 मध्ये सुरू झालेल्या या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख आहे मात्र या योजनेची महिलांना आता हुलकावणी बसल्याने आरोग्य विभागही हतबल झाला आहे.

Solapur : गणरायाची मूर्ती घेऊन जाताना अपघात, १० जखमी!

Solapur Latest News : सोलापुरात गणरायाची मूर्ती घेऊन निघालेल्या एका छोटा हत्ती आणि दुचाकी वाहनाला बल्करने धडक दिलीय. या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com