राष्ट्रपती द्रोपती मुर्मू करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी भाविकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आवाहन केले आहे. देवीच्या दर्शनासाठी द्रोपती मुर्मू या अंबाबाई मंदिरात येणार असल्याने भाविकांनी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंदिरात येणं टाळावं, असं आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
वाशिम -अमरावती मार्गावर साखरा फाट्यावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. दुचाकीवर दोन सख्खे भाऊ होते. राजू देवराव खोरणे आणि अनिल देवराव खोरणे असं मृतक दोन्ही भावाचं नावे आहेत. वाशिमवरून पारडी या आपल्या गावाकडे जात होते. या घटनेचा तपास वाशिम ग्रामीण पोलीस करत आहेत.
जॉब रॅकेटच्या ऑफिसवर छापा टाकत ५५ सिम कार्ड, ८ लॅपटॉप, २ मोबाईल फोन, २ बनावट स्टॅम्प तसेच १.२२ लाख रुपये जप्त. युरोपियन देशात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याचं समोर आलाय.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात 103 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना धरणाच्या पाण्याचे पुजन केले. कोयनामाईची अशीचं कृपा राहू दे असं साकडं त्यांनी यावेळी घातलं.
शरद पवार 2 ते 4 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तीन दिवसांमध्ये कोल्हापुरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाची शरद पवार पाहणी करणार आहेत. कागल येथे समरजीत सिंह घाटगे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.
महाविकास आघाडीच्या उद्याच्या सरकारला जोडो मारो आंदोलन अद्यापही परवानगी मिळालेली नाहीये. महाविकास आघाडीचे नेत्यांना पोलीस परवानगीची प्रतीक्षा लागून आहे. मात्र परवानगी जरी मिळाली नाही तरी उद्या ठरवल्याप्रमाणे हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यादरम्यान मोर्चा काढणार आहेत.
सरसकट कर्जमाफी, पिक विमा आणि हमीभाव या मागणीसाठी बीडच्या माजलगाव तालुक्यातील माळीपारगाव येथे आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रस्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते. तर यावेळी तब्बल दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता, त्याचबरोबर या रस्ता रोकोमुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
भाजपच्या पुणे जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटील यांनी दांडी मारलीय. निमंत्रण देऊनही हर्षवर्धन पाटील उपस्थित राहिले नाहीत. आज दौंड येथे पुणे जिल्हा भाजपच्या अधिवेशनाचा कार्यक्रम होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना या अधिवेशनासाठी निमंत्रण दिले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आईची भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचा उद्यापासून दौरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गला जाताना मनोज जरांगे पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या घरी भेट दिली.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
आता हरियाणाच्या विधानसभेसाठी ५ ऑक्टोबरला होणार मतदान
यापूर्वी मतदान १ ऑक्टोबरला होणार होत मात्र आता ते ५ ऑक्टोबरला होणार
जम्मू काश्मीर आणि हरियाणाची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार
आधी मतमोजणीची तारीख आयोगाने ४ ऑक्टोबर निश्चित केली होती
बदलापूर घटनेनंतर राज्यात आता 'हर घर दुर्गा अभियान' सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील आयटीआय मध्ये आत्मसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे.या अभियानात वर्षभर ज्युदो, कराटे यांसारखे प्रशिक्षण दिले जाणार असून आठवड्यातून कमीत कमी दोन तासिका घेतल्या जाणार आहेत.
मॅरेथाॅन विश्वातली खडतर समजली जाणारी सातारा हिल हाफ मॅरेथाॅन रविवारी पार पडणार असून ही १३ वी मॅरेथाॅन पार पडत आहे. या मॅरेथाॅनमध्ये ८ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून रविवारी या स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. देश विदेशातून या मॅरेथाॅनमध्ये धावपटू सहभागी झाले आहेत.
सरकारी तिजोरीची उधळपट्टी करून सरकारी पैसे खर्च करण्यात सरकार व्यस्त, असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. फॅशन शोमध्ये जसा रॅम्प असतो तसा रॅम्प नागपूरच्या कार्यक्रमस्थळी केला. सरकार रॅम्पवर चालत आहे. 4 कोटी रुपये खर्च एका कार्यक्रमात करून जनतेच्या पैस्यावर मस्तवाल पणा सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ठाण्यात पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. ऑलिम्पिकमधील भारताचे यश पाहून आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेनेतून हे केद्र सुरू होत आहे. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आरोपी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटीलला मालवण पोलीसांनी कोर्टात हजर केलं आहे. मालवण येथील दिवाणी न्यायालयात काही वेळापूर्वीच हजर केलं. चेतन पाटीलची बाजू मांडण्यासाठी कोल्हापूरमधून वकिलांची फौज दाखल झाली आहे. ॲड तुषार शिंदे, ॲड सोनावले, ॲड अभिजीत हिरुगडे, कोमलराव राणे ॲड सुरेश तेली हे आरोपीची बाजू कोर्टात मांडणार आहे.
पत्राचाळ प्रकरणी स्वप्ना पाटकर यांना ईडीचे समन्स मिळाले आहे. यामुळे स्वप्ना पाटकर आणि शिवसेना महिला आघाडी ED कार्यालयात दाखल होतील. स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहून धमकी मिळत असल्याचं सांगितलं होतं. पत्राचाळ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाव घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याचं स्वप्न पाटकर यांनी आरोप केला होता.
समृद्धी महामार्गावरच्या हर्सूल सावंगी एंटरचेंजवर कारचा भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्यासाठी सावंगी एंटरचेंजवरून कार समृद्धीवरून खाली उतरताना दुभाजकला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचे समोरचे दोन्हीही टायर निखळून पडले आणि दूर फेकल्या गेले.
बुलढाण्यात कोळी महादेव समाजाचं आंदोलन चिघळलं. बुलढाण्यात कोळी महादेव समाज आक्रमक झाला आहे. रास्तारोको, झाडावर चढून आंदोलन सुरु झालं आहे. 19 दिवसापासून मलकापूर येथे सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश काला. यावेळी बाबूलाल मरांडी , माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन उपस्थित होते. मधु कोडा यांची पत्नी गीता कोडा यांनी या वर्षांच्या सुरुवातीला काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
तुर्भे येथील एलपीजी गॅस तंत्र टीम भिवंडीत दाखल झाली आहे. आता गॅस टॅंकरची गळती बंद करण्याचे काम सुरू झालं आहे. दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांकडून गॅस टॅंकरवर पाणी फवारणी सुरु आहे. साडे तीन तासानंतर गॅस टॅंकरची गळती बंद केली आहे .
गिरगावमध्ये मेट्रो प्रकल्पाचं काम सुरु आहे. या ठिकाणी एक अपघात झाला आहे. एक मशीन पडली आहे, अशी माहिती मिळतेय. ठाकूरद्वार येथे पायडिंग करणारी मशीन ( क्रेन टाइप) कोसळली. सुदैवाने कोणीही जखमी नाही. मात्र मोठी जिवीतहानी टळली आहे.
अमरावतीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांविरोधात मातंग समाजाने निषेध नोंदविलाय. आरक्षण वर्गीकरणाला काँग्रेसने विरोध दर्शविल्याने लहुजी शक्ती सेना आक्रमक झालीय. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे झालेल्या मातंग समाजाच्या मेळाव्यात विजय वडट्टीवारांच्या वक्तव्याचे संतप्त पडसाद पाहायला मिळाले. भर सभेत चपला, जोडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. भाजपा आमदार प्रताप अडसड़ यांचीही मेळाव्याला उपस्थिती होती.
रायगडमध्ये दोन शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरूणीनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. महाड MIDC पोलिस ठाणा हद्दीतील घटना आहे. जखमी तरुणीवर महाडच्या ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महाड MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार R V जाधव अधिक तपास करीत आहेत.
नवी मुंबईत सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे. 250 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे सोमवारी टेंडर खुले होणार आहे. नवी मुंबई मनपा तर्फे सोमवारी ईनिविदा काढण्यात येणार आहे.
नाशिकच्या सातपूर परिसरातील धक्कादायक घटना समोर आलीय. २६ वर्षीय तरुणाने गायीवर अत्याचार केलेत. संशयित विकृत तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. संशयित चक्रधर नारायण ठाकरे वय २६ वर्ष याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे नागरिक संतप्त झालेत.
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने पंढरपुरात कांद्याला चांगला भाव आला आहे. सध्या प्रतिकिलो 45 ते 50 रूपये दर मिळत आहे. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सुमारे दोन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार काटोलमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार बाईक रॅलीच्या माध्यमातून अजित पवारांचे काटोलमध्ये शक्तिप्रदर्शन करत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा मेळावा होतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात महिला आणि शेतकऱ्यांची अजित पवार संवाद साधणार आहेत. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने काटोल मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा केलाय.
-
अमरावती जिल्ह्यात २,१८६ शाळांपैकी केवळ ६८५ शाळाच सीसीटीव्हीच्या निगराणीत आहे. तर २,१७५ शाळा सीसीटीव्हीविनाच आहे. त्यामुळे या शाळांना आता सीसीटीव्ही लागण्याकरिता एक महिन्यांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. आजपासून पुन्हा नाशिकमध्ये पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस मध्यम पावसासोबत हवामान दमट राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २८-२९ डिग्री सें. आणि किमान तापमान २२-२३ डिग्री सें. दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ३१ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह मध्यम ते जोदर पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पिठासमोर सुनावणी होणार आहे. ही दोन्ही प्रकरण सारखी असल्याने याची सुनावणी एकापाठोपाठ एक घेऊ असं कोर्टाने सांगितलं होतं. मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना नोटीस पाठवून उत्तर मागवलं होतं. सुनावणीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नाशिक महानगरपालिका हद्दीत कत्तलखाने आणि मास विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वनिमित्ताने नाशिक महापालिका हद्दीत कत्तलखाने आणि मासविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मनपाकडून देण्यात आलेत. 30 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे शासन निर्देश असून कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेऊन अहिंसा पाळण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलय. महापालिकेच्या पशुवैद्यकीय हे आदेश देण्यात आलेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात बैठकीत खलबत्त झाली असल्याची माहिती समोर आलीय. वर्षा बंगल्यावरील झालेल्या बैठकीत बाराही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू आहे. १२ पैकी ६ जागा भाजप , ३ जागा शिवसेना आणि ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला मिळणार असल्याची माहिती समोर येतेय. राज्यपाल नियुक्त 12 जागा बद्दलचं प्रकरण हे न्यायालयात आहे. मात्र, २ सप्टेंबरला या संदर्भात निर्णय येण्याची अपेक्षा आहे..
नाशिकमधून मोठी बातमी समोर येतेय. गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर दिव्यांच्या लेझर किरणांमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे मागील वर्षी उघड झाल्याने यंदाच्या गणेशोत्सवात या दिव्यांना पूर्णत: प्रतिबंध करण्याचे आदेश देण्यात आलेत. गणेशोत्सव महामंडळांनी देखील लेझर शो करणार नसल्याचं मान्य केलय. तसच गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात आलीय.
लालबाग परळ परिसरात आज तब्बल 41 गणपतींचा आगमन सोहळा होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी ही लालबाग परळ परिसरामध्ये गणपती मूर्ती घेणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची बघायला मिळते. तसेच ही गर्दी पाहता मोठ्या प्रमाणात ड्रायव्हर जॉन्स ट्रॅफिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नागपुरातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. मानधन वाढीसाठी आश्वासनानंतरही मागणी पूर्ण केली जात नाही, तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी आशा सेविकांना हजेरीची सक्ती करण्यात येत आहे/ मेळाव्यात आशा सेविकांना सक्तीचा प्रकार अन्यायकारक असल्याचा आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने आरोप केलाय. शासनाने आशा सेविकांना 7 हजार आणि गटप्रवर्तकांना 10 हजार रुपयाचे मासिक मानधन देण्याची आश्वासन दिल्यावरही अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे 'लाडकी बहीण योजने'च्या नागपुरातील राज्यस्तरीय आजच्या कार्यक्रमावर आशा सेविकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.
मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मालवणच्या दिशेने रवाना झालेत. ते उद्या राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवरायांचे स्मारक कोसळला त्याठिकाणची पाहणी करणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीतून मालवणच्या दिशेने रवाना झाले आहेत. उद्या ते राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्या ठिकाणची पाहणी करणार आहे.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सकाळी 82 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे संभाजीनगर, जालना शहरांसोबत उद्योग, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न पूर्णतः सुटला आहे. शिवाय जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून पाणीही सोडणे सुरू झाले आहे. सध्या 36 हजार क्युसेक इतकी आवक धरणामध्ये सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा शंभरी कडे वाटचाल करीत आहे.
बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प 100 टक्के भरल्याने ओव्हरफ्लो झालाय. तर यामुळं आता बीड शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून परिसरातील पाली, करचुंडी, कर्जनी, धानोरा यासह अन्य गावांना याचा फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसापासून प्रकल्प क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने, यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. दरम्यान यामुळं बीड शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.
पुण्यातील राजगड किल्ल्यावरच्या सुवेळा माचीच्या पायी मार्गावर रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडलीय. माती, मुरूम, दगड गोट्यासह कड्याची मोठी दरड कोसळल्यामुळे माचीकडे जाणारा शंभर ते दीडशे फूट अंतराचा पायी मार्ग दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता. पाऊस थांबल्यावर गडावरील पुरातत्व विभागाचे पहारेकरी बापु साबळे आणि सुरक्षा रक्षक आकाश कचरे या दोघांनी खडतर परिश्रम करत फावड्यांनी दरडीच्या मुरुम,दगड, मातीचे ढिगारे बाजूला हटवले.
परभणीच्या पालम तालुक्यात लंपी आजाराची लागण झाली आहे, पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील18 हजार जनावरांचे लसीकरण केले आहे , जनावरांना या रोगाची लागण होत असल्याची स्थिती तालुक्यात दिसून आल्याने पशुपालक चिंतेत सापडले आहे. हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले. सध्या लम्पीस्कीन आजाराचा तितका विळखा जनावरांना पडताना दिसत नाही. तरीही लम्पी स्किनची बाधा झाल्या तत्काळ दवाखान्याची संपर्क साधावा असे आवाहन पशुधन विकास अधिकारी यांनी केलंय.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल रात्री शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी भेट घेतली आहे. दोघांमध्ये अंतरवाली सराटीत हैदराबाद आणि सातारा गॅजेट संदर्भात एक तास चर्चा झालीय. मराठवाड्याचा आरक्षण प्रश्न सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार असल्याच योगेश केदार यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तीन वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू होणार आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. आज दुपारी 12.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मेरठ लखनऊ, मदुराई बेंगलोर आणि चेन्नई नागरकोईल अशा तीन वंदे भारत आजपासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. यामुळे तीन राज्यांमधील दळणवळणाच्या सुविधा वाढणार आहेत.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईसाठी एका भाविकाने शुक्रवारी 71 तोळे 100 ग्रॅम सोन्याचा सुवर्णसिंह अर्पण केला. त्याचे अंदाजे 50 लाख 33 हजार इतकी मूल्य आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भाविकांने हा सुवर्णसिंह देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सचिव शिवराज नायकवडी, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.
घरासमोरील अंगणात मूग बडवीत असताना 40 वर्षीय महिलेचा अंगावर विज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या कोरेगाव येथे घडलीय. तापशीला बाळासाहेब दराडे वय 40 असं मयत महिलेचे नाव आहे.
विनेश फोगाट आज शेतकऱ्यांच्या मंचावर उपस्थित राहणार आहे. शेतकरी आंदोलनाला २०० दिवस पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची महापंचायत होतेय. दातासिंहवाला-खनौरी आणि शंभू बॉर्डरवर शेतकऱ्याची महापंचायत आहे. विनेश फोगाट आज आपल्या पतीसह दाता सिंह वाला- खनौरी बॉर्डर वर महापंचायतमध्ये सहभागी होणार आहे. ऑल्मिपिक स्पर्धेत १०० ग्रॅम वजन जास्त झाल्यानं पदक न मिळालेल्या विनेश फोगाटचा सत्कार केला जाणार आहे.
आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बफर स्टॉकमधील नाफेडचा कांदा बाजारात येणार, अशी सूत्रांनी माहिती दिलीय. गणेशोत्सवापासून नाफेडचा कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याच्या विक्रीसाठी ( ब्रोकर्स ) आडत्यांकडून निविदा मागवण्यात आल्यात. शेतकऱ्यांच्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत असताना नाफेडनं बफर स्टॉकचा कांदा बाजारात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. नाफेडचा कांदा बाजारात आल्यास कांद्याचे भाव पडण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नवी मुंबईत गणपती आगमन सोहळ्याचा उत्साह पहायला मिळतोय. नवी मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळाच्या गणेश मूर्तिचा आगमन सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय. वाशी मधील नवसाला पावणारा महाराजा आणि वाशीचा गणराज या मंडळाच्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा पार पडला असून यावेळी ढोल ताश्यांचा गजर, बेंजो, लेझिमच्या तालावर नाचणाऱ्या तरुणी यामुळे वातावरणात उत्साह संचारला होता.
रत्नागिरीत प्राथमिक शाळेतील मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाविरोधात 'पॉस्को'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका गावात ही घटना घडलीय. प्राथमिक शाळेच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल आणि अटक करण्यात आलीय. संगमेश्वर पोलिसांनी पालकांच्या तक्रारीनंतर तात्काळ कारवाई केलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.