Marathi News Live Update: पुण्यात गोळीबाराचा थरार; वनराज आंदेकर यांच्यावर झाडल्या गोळ्या

Maharashtra Breaking News Live today : आज रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Pune Crime : पुण्यात गोळीबाराचा थरार; वनराज आंदेकर यांच्यावर झाडल्या गोळ्या

वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना पुण्यात घडलीय. पाच राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. या गोळीबारात वनराज गंभीर जखमी झाले असून हल्लेखोर फरार झालेत.

Parbhani Rain:  परभणीच्या सेलू शहरात पावसाचा हाहाकार, वीज पुरवठा खंडित

परभणीच्या सेलू शहरात देखील दमदार पावसाने हाहाकार माजवला,शहरातील शनी मंदिर जवळच्या नाल्याला पाणी आल्याने नागरिकांच्या घरात पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याच मोठं नुकसान झाले आहे ,त्यातच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना दमदार पाऊस आणि वीज पुरवठा खंडित अश्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Beed Rain:  बीड-परळी महामार्गावरील तात्पुरता पूल गेला वाहून; वाहतूक ठप्प

बीड-परळी महामार्गावर असणारा तात्पुरता पूल वाहून गेलाय. गोपीनाथ गड परिसरात असणाऱ्या पापणाशी नदीवर हा तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. तो पूल नदीला पाणी आल्याने वाहून गेला आहे. यामुळं बीड -परळी महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा बंद झाली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस होत असून परळीसह परिसरात अनेक नद्यांना पाणी आले आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय.

हिंगोलीच्या सिध्देश्वर धरणाचे 14 दरवाजे उघडले,पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

हिंगोलीत सतत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सिद्धेश्वर धरण ओव्हरफुल झाले आहे, गेल्या अनेक महिन्यांपासून हिंगोलीकरांना सिद्धेश्वर धरण भरण्याची प्रतीक्षा लागली होती. दरम्यान सिद्धेश्वर धरण प्रशासनाने धरणाचे 14 दरवाजे उघडत पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

Pune Crime:  राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; विदेशी मद्यासह ७६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्ववभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने मुळशी तालुक्यात आदरवाडी गावाच्या हद्दीत, हॉटेल शैलेश समोरील पौड- माणगाव रस्त्यावर केलेल्या कारवाईत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण ७६ लाख ५५ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Ajit Pawar: अमरावतीमधील वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी अजित पवारांचा संवाद

अमरावतीच्या वरुड परिसरात सततच्या पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.वरुड तालुक्यातील नवासा पार्डी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी अजित पवार यांनी केली. यावेळी अमरावती जिल्हा दौऱ्यावर असतांना अजित पवार यांनी संत्रा बागेत आपला ताफा वळवत संत्रा गळतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांची विचारपूस केली,वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे संत्रा पिकाचे नुकसान होत आहे. सततच्या पावसामुळे संत्रा बहाराचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा आहे.आजपासूनचं मोठ्या संख्येने भाविक जेजुरीत दाखल झाले आहेत.महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा उद्या सोमवारी भरणार असून, उद्या सकाळी 11 वाजता खंडोबा देवाच्या पालखीचा प्रस्थान कऱ्हा नदीकडे होणार आहे. अंदाजे सायंकाळी साडेचार ते पाच वाजता कऱ्हा नदीवर श्री खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना धार्मिक वातावरणात स्नान घालण्यात येणार आहे.

वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस; जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना  पूर

वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून मानोरा ते कारंजा मार्गावरील दापुरा जवळच्या नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे, तसेच इंझोरी गावाजवळील नाल्याला मोठा पूर आल्यानं इंझोरी - जामदरा रस्ता झाला बंद झालाय..शेतात गेलेले शेतकरी अडकल्यानं हाल झालेत, तर मंगरुळपिर तालुक्यातील कोठारी बोरव्हा परिसरातील नाल्यानाही मोठा पूर आलाय,पोहरादेवी शिवारामधील शेतात पाणी घुसल्यानं शेतीचं अतोनात नुकसान झालंय.

Congress Assembly Election: काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू

पुण्यात काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पार पडणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत काँग्रेसचा आढावा आणि मार्गदर्शन या बैठकीत केलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते बैठकीला उपस्थित राहतील. पुण्यातील काँग्रेस भवन येथे 4 सप्टेंबर रोजी बैठक पार पडणार आहे.

अजित पवार:-

काही लोकांनी विकास कामाच्या ऐवजी राजकारण केले. आज पण राज्यात आंदोलन करण्यात आली, पण लोकशाही आहे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे.

शिवाजी महाराजांनि हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य निर्माण केलं, असा राजा पुन्हा होणे नाही.

मी माफी मागितली तेव्हा पंतप्रधान यांनी माफी मागीतली. मात्र नंतर राज्यात राजकारण सुरू झालं.

सर्व जाती धर्मच्या लोकांचं भल व्हावं...

राजकोट किल्ल्यावर जी वेदनादायी घटना घडली ती वेदना देणारी आहे.

मी महाराष्ट्राची माफी मागतो, त्याची चौकशी करण्यात येईल, जो दोषी असेल त्याला सोडणार नाही

Mumbai News: राज्यव्यापी विचारमंथन व निर्धार परिषद, शरद पवार करणार मार्गदर्शन

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सामाजिक संस्था, संघटना, कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक व कलावंत यांचा सहभाग असणारी राज्यव्यापी विचारमंथन व निर्धार परिषद पार पडत आहे. राष्ट्रवादी एस पी गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद पार पडणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून या निर्धार परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या परिषदेला उपस्थित आहेत. राष्ट्रवादी एस पी गटाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

Maharashtra Rain News: पैनगंगा नदीला पूर,विदर्भ मराठवाडा संपर्क तुटला!

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीत झाल्याने सर्व नदी,नाले भरून वाहताहेत, पैनगंगा नदीला पूर आल्याने धनोडा येथील पुल पाण्या खाली गेला असून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहेत. विदर्भ आणि मराठवाडा संपर्क तुटलाय त्यामुळे यवतमाळ,माहुर ते किनवट राज्य मार्ग बंद आहेत.

Beed Rain News: बीड जिल्ह्यात 8 तासांपासून पावसाची संंततधार

बीड जिल्ह्यात तब्बल गेल्या आठ तासांपासून मध्यम स्वरूपाचा संतधर पाऊस सुरू आहे यामुळे जिल्ह्यातील बीड माजलगाव वडवणी परळी केज गेवराई आष्टी यासह सर्वच तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाला असून बाजारपेठ ठप्प झाले आहेत तरी या संतधर माध्यम स्वरूपाच्या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली देखील केले आहेत दरम्यान यामुळं आता जिल्ह्यातील नदी, ओढे दुथडी भरून वाहत असल्याने बीडकरांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहेत.

Aditi tatkare News: राष्ट्रवादी काँग्रेस किती महिलांना तिकीट देणार हे वरिष्ठ ठरवणार : आदिती तटकरे

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किती महिलांना संधी देणार यावर वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. नेहमीच अधिकाधिक महिलांना संधी देण्याची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिली आहे. आजही दादांच्या मंत्रिमंडळात एक महिला म्हणून मला संधी मिळाली आहे, हे उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेसमोर नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिसून येते. त्यामुळे मला खात्री आहे, सर्वांना समान संधी देण्यासाठी आमचे वरिष्ठ निर्णय घेतील.

Nashik News: येवल्यात हिंदू हुंकार मोर्चा, सकल हिंदू समाज व रामगिरी महाराज यांच्या भक्त परिवारतर्फे आयोजन

नाशिकच्या येवला येथे आज सरला बेटांचे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगला देशात हिंदूंवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्त सकल हिंदू समाज व रामगिरी महाराज यांच्या भक्त परिवारा तर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला,येवल्यातील विंचूर चौफुली ते तहसील कार्यालय पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी या ठिकाणी मोर्चा पोहचल्यावर तेथे सभेत रूपांतर झाले.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता,रामगिरी महाराजांवर येवल्यात गुन्हा दाखल असल्याने या मोर्चा कडे सगळ्यांचे लक्ष लागले होते महंत रामगिरी महाराज यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे आव्हान केले असून आम्हाला दोन मुलांचा अधिकार तर इतर समाजातील घटकांना दोन मुलांचा अधिकार असला पाहिजे अन्यथा आर्थिक बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला

Hingoli Rain News: हिंगोलीत पावसाचा कहर, गावात पाणी शिरल्याने नागरिकांच्या जीवाला धोका

हिंगोली च्या औंढा तालुक्यातील गोजेगावमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, गावाच्या मध्यभागी असलेल्या ओढ्याला पूर आल्याने ही स्थिती ओढवली आहे, सध्या गोजेगाव मधील शाळा व मंदिराला देखील पाण्याने वेढा घातल्याने रहिवाशी नागरिक असुरक्षित झाले आहेत. दरम्यान तातडीने प्रशासनाने गोजेगाव मध्ये दाखल होऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी नागरिक करत आहेत

Kalyan News: अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ टिटवाळ्यात मोर्चा, काळ्या फिती बांधून नोंदवला निषेध

बदलापूर , टिटवाळा येथे अल्पवयीन चिमूकल्या मुलींवर घडलेल्या लैंगिक घटनंतर सर्वच थरातून संताप व्यक्त करण्यात येतोय .या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी कल्याण जवळील टिटवाळा पश्चिमेकडील पंचवटी चौक ते टिटवाळा पूर्वेकडील वाजपेयी चौकापर्यत शेकडो नागरिकांनी निषेध मोर्चा काढला होता .या मोर्चात काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता .यावेळी या घटनांचा निषेध नोंदवत ही विकृती थांबवली पाहिजे ,आरोपीना कठोर शिक्षा व्हावी ,पीडितेला न्याय द्या अशी मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली

BJP Protest Jalna: महाविकास आघाडीच्या विरोधात जालन्यात भाजपा आक्रमक

महाविकास आघाडीच्या विरोधात जालन्यात भाजपा आक्रमक झालीय. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा पदाधिकाऱ्यांनी मविआचा निषेध व्यक्त केलाय. मालवण दुर्घटनेप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते राजकारण करताय असा आरोप यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय. मतांच्या राजकारासाठी महाविकास आघाडी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे असं सांगत आज जालन्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी मविआ नेत्यांचा निषेध नोंदविलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

Uday Samant: उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका

उच्च न्यायालयाने निकाल दिला तरी राजकीय नेते बाहेर जाऊन पत्रकार परिषद घेऊन बोलत आहेत. न्याय देवतेच्या डोळ्यावरिल पट्टी काढली पाहिजे असं राजकीय नेते म्हणतायत. ते न्यायधीशाला सल्ले देत आहेत. ते एवढे मोठे झाले आहेत. याला लगाम घालण्याचे काम झाल पाहिजे, असे म्हणत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

NCP Leader Suraj Chavan ON MVA Protest: 'निवडणुकीच्या तोंडावर राजकारण', अजित पवार गटाची मविआवर टीका

मध्य प्रदेशमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा पाडला गेला तेव्हा हे लोक रस्त्यावर उतरले नाहीत. आता विधानसभा निवडणुकीच्या तेोंडावर केवळ राजकारण्यासाठी हे सुरू आहे. मविआच्या नेत्यांच हे प्रेम केवळ मतांसाठी जाग झालं आहे. महाराष्ट्रातील जनता यांना थारा देणार नाही, असे म्हणत अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनावर टीका केली आहे.

Rain Update :हिंगोलीत मुसळधार पावसाची बॅटिंग

हिंगोलीत मागील बारा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे तर हिंगोली शहराच्या जवळून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला असून समदा गावाच्या जवळ असलेल्या पुलावरून दहा फूट पाणी वाहत असल्याने वीस ते पंचवीस गावातील चाळीस हजार नागरिकांचा शहराशी थेट संपर्क तुटला आहे दरम्यान काही नागरिक रेल्वे उडान पुलावरून जीव धोक्यात घालून दुचाकी घेऊन जात असल्याने प्रशासनानं देखील आता या पुलावर पोहचलं आहे दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस व महसूल प्रशासनाने केले आहे.

Nagpur : फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीमुळे खळबळ

जबलपूरवरू हैदराबाद जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे फ्लाईट डाव्हर्ट कऱण्यात आली. त्यामुळे नागपूर विमानतळावर खळबळ उडाली.

प्रशासनात खळबळ उडाल्याने मुख्यमंत्री यांची फ्लाईट उशिरा.

प्रश्नांकडून आलेली फ्लाईटची संपूर्ण तपासणी, अद्याल काहीच मिळाला नसल्याची माहिती..

Rain Update : हिंगोली शहराला पुराचा धोका वाढला, नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले

हिंगोलीत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे हिंगोली शहराला पुराचा धोका वाढला आहे, शहराच्या परिसरात असलेल्या अनेक नाले ओढ्यांना पूर आल्याने हे पाणी हळूहळू शहरात शीरत आहे , हिंगोली शहरातील इंदिरा चौक भागात सपाट असलेल्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने शहरातील अंतर्गत वाहतूक देखील बंद झाली आहे दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

MVA Protest :  अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत भर पावसात आंदोलन

सरकारच्या विरोधात राज्यभरात महाविकास आघाडीचे जोडेमारो आंदोलन सुरू आहे. आज नांदेडमध्ये देखील महाविकास आघाडीने जोडेमारो आंदोलन केले. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारण्यात आले.

manoj jarange : छत्रपतींच्या जीवावर राजकारण करु नका - मनोज जरांगे

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मनोज जरांगे यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना यात कोणीही राजकारण करू नये, जे छत्रपतींच्या जीवावर राजकारण करत आहेत त्यांना आपण जास्त शहाणे असल्यासारखे वाटत आहे, असे जरांगे म्हणाले.

Pune News : अखेर पुण्यातील त्या मृतदेहाचं गूढ उकललं

Pune Crime News : अखेर पुण्यातील "त्या" मृतदेहाचे गूढ उकलण्यात पुणे पोलिसांना यश आलेय. महिलेची हत्या करणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Mumbai Crime : विदेशात नोकरी लावण्याचा नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक

विदेशात नोकरी लावण्याचा नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक

बनावट एम्लॉयमेंट ऑफिसवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई,

इ एक्सेस इमिग्रेशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने बनावट ऑफिस सुरू

परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून, त्यांच्याकडून मोठी रक्कम स्विकारून त्यांना बनावट वर्क परमिट लेटर दिले जायचे

नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या गुन्हे शाखा आठ कडे माहिती

फसवणूक झाल्याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार

तपास गुन्हे शाखा ८ कडे येताच आरोपीला अटक

कृष्णा कमलाकांत त्रिपाठी असं अटक आरोपीचे नाव

आरोपीला 3 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

Maharashtra Politics : भाजप आणि संघाची ही महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics :  या बैठकीला भाजपचे नेते रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे,भागवत कराड, यांच्यासह काही महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाची ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे.

त्याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

MVA Protest : महाविकास आघाडीचा मोर्चा गेटवे ऑफ इंडियाला धडकणार

Mumbai News : काही वेळातच महाविकास आघाडीचा मोर्चा गेटवे ऑफ इंडिया येथे धडकणार असून जोडे मारा आंदोलन येथे केलं जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे, सकाळी १० पासून गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद असेल, गेटवे ऑफ इंडिया येथून सुटणाऱ्या फेरी सेवा देखील पोलिसांनी बंद ठेवलेय.

Dam Water lavel : जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८५ टक्क्यांवर

Dam Water Lavel : मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज ८५ टक्क्यांवर पोहचला आहे. शिवाय बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्प वगळता मराठवाड्यातील इतर धरण प्रकल्पा तील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागलीय. त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता हळूहळू दूर होऊ लागली आहे.

BJP Protest : महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या विरोधात भाजपचे आंदोलन

महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या विरोधात भाजपचे आंदोलन होणार आहे. दादर पूर्वेला मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीत आंदोलन होणार आहे. तेथे सध्या पोवाडे सुरू आहेत.

Hingoli News : हिंगोली शहरातील मध्यवर्ती भागात तरुणाचा मृतदेह आढळला

हिंगोली शहरातील मध्यवर्ती भागात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. हरीश सुनील खिल्लारी असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. पडीक असलेल्या विहिरीत मृतदेह आढळला. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास घटना आली.

Mumbai News : धारावीत ११ वर्षीय चिमुरडीचा विनयभंग झाल्याने खळबळ

मुंबईत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. धारावीत ११ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धारावी पोलिसांनी २५ वर्षीय नराधमाला अटक केलीय. चिमुरडीच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा उचलत नराधमाने संधी साधली. चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून कोणाला काही न सांगण्याची धमकी देऊन आरोपी फरार झाला होता.

Marathwada News : जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज ८५ टक्क्यांवर

मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज ८५ टक्क्यांवर पोहचला आहे. शिवाय बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्प वगळता मराठवाड्यातील इतर धरण प्रकल्पा तील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागलीय. त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता हळूहळू दूर होऊ लागली आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी या भागामध्ये काही ठिकाणी सुरू आहे. शिवाय जालना, संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे आणखी पाऊस पडेल अशी शक्यता आहे. उसावर प्रकल्प आणि धोरणामधील पाणी साठ्यात चांगलीच वाढ होईल. पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठी या पाण्याची मदत होईल.

Nanded News : नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत, घरात शिरले पाणी 

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापुर गावात पुराचे पाणी शिरले आहे. गावाच्या बाजूने ओढा आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे या ओढ्याला मोठा पूर आलाय. या पुराचे पाणी गावातील घराघरात शिरले. घरातील साहित्य भिजले किनवट तालुक्यातील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले. किनवट तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय.

Maharashtra Politics : छत्रपती संभाजी नगर शहरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे समन्वय बैठक

छत्रपती संभाजीनगर शहरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक होणार आहे. समन्वय बैठकीला देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाची महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीची बैठकीत रणनीती ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

Narhari Zirwal : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी हिरवळ यांना उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी हिरवळ यांना उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार देण्यात आलाय. 2018-2019 या कालावधीसाठी उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळालाय. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. ३ सप्टेंबला राष्ट्रपतींच्या उपस्थितीत उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषण या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Ajit Pawar : अजित पवार यांचा पुसद येथील जनसन्मान यात्रा कार्यक्रम रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुसद येथील कार्यक्रम रद्द कऱण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे कार्यक्रम रद्द करित असल्याची आमदार इंद्रनील नाईक यांची माहिती.

आज यवतमाळच्या पुसद इथे अजित पवार याचे जन सन्मान यात्रा दाखल होणार होती.त्या दरम्यान पवार हे जनतेशी संवाद साधणार होते.मात्र रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Maharashtra Politics:  भाजप आणि महाविकास आघाडी आमनेसामने

छत्रपती संभाजी नगरात आज पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडी आमनेसामने येण्याची शक्यता

क्रांती चौकात महाविकास आघाडी कडून सरकारला जोडे मारो आंदोलन तर भाजपचे महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार आंदोलन.

भाजप आणि महाविकास आघाडीचे क्रांती चौकात एकाच वेळी आंदोलन होणार असल्याने आज पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीत राडा होण्याची शक्यता .

अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून छत्रपती संभाजी नगर शहरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त.

crime News : पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

crime News : नंदुरबार जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गेल्या तीन दिवसात तीन गुन्हे समोर आले आहेत शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे अल्पवयीन मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार करत मुलीला गर्भवती केल्याच्या खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच संतापाची लाट निर्माण झाली आहे.

Marathi News : मविआकडून जोडो मारो आंदोलन

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज मविआकडून जोडे मारो आंदोलन केल जाणार आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र मविआ आपल्या आंदोलनावर ठाम असल्याने सकाळपासून हुतात्मा चौक परिसरात मोठ्या संख्येने पोलीस पाहायला मिळत आहेत. हुतात्मा चौक ते गेट ने ॲाफ इंडिया या मार्गावर मविआ आंदोलन करणार असून पोलिसांनी रस्त्यात बॅरिकेट लावले आहेत. हे आंदोलन चौकातच रोखण्याचा प्रयत्न असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.

 Dharashiv News : उमरगा येथे डेंगू सदृश्य आजाराने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू

धाराशिवच्या उमरगा शहरात डेंगू सदृश्य आजाराने आठ दिवसांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील सत्यजित हनुमंत देशमुख वय बारा वर्षीय मुलाचा आणि ओम शिवाजी साळुंखे या 18 वर्षीय विद्यार्थ्याचे निधन झाले. पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. शहरात औषध आणि धूर फवारणी होत नसल्यानं डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्याचबरोबर नगरपालिकेने शहरांमध्ये स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी देखील उमरगा शहरातील नागरिकांनी केली आहे.

Pune News : पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी, जास्त करण्याची शक्यता आहे, पाठबंधारे विभागाने माहिती दिलीय. धरण पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाने विश्रांती घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com