Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 5 October 2024: आज शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी महाराष्ट्र दौरा, राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Chandrapur News : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

चंद्रपूर : रेल्वे रुळाची देखभाल करणाऱ्या दोन MPT मशीन एकमेकांवर आदळल्याने चार रेल्वे कर्मचारी जखमी झाले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर घडली. मूल रेल्वे स्थानकावर एक मशीन आधीच उभी असताना मागून आलेल्या मशीनने धडक दिली. यावेळी जोराचा आवाज झाला. स्थानकावरील लोक थोड्या वेळासाठी भयभीत झाले. यात एका मशीनचा दर्शनी भाग क्षतिग्रस्त झाला असून, जे चार कामगार जखमी झाले, त्यांना मूल येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

BJP vs NCP : महायुतीतल्या नेत्यांमध्ये पुन्हा जुंपली; भरसभेत एकमेकांना कोपरखळ्या

महायुतीतल्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली असू भरसभेत एकमेकांना कोपरखळ्या मारण्यात आल्या आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना चिमटा काढला आहे..

आमदार बाबासाहेब पाटील आमच्यासोबत असून देखील आम्हाला ते आमच्या सोबत आहेत अस, आम्हाला वाटत नाही, असं गणेश हाके म्हणाले. तर युती करायची का नाही, हे माझ्या हातात नाही. पण तुमच्यासोबत नांदायचं की नाही हे माझ्या मनावर आहे. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील विकासाचा निधी दिला आहे, असं आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले.

Sharad Pawar : शरद पवार स्वतः इच्छुकांच्या घेणार मुलाखती

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार तयारीला लागले असून उमेदवार निवडीसाठी ते स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. आज शरद पवार मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती असून त्यानंतर सलग तीन दिवस पवार पुण्यात तळ ठोकून असणार आहे. १० तारखेपर्यंत उमेदवारांची पक्षांतर्गत चर्चा होणार आहे.

Pandharpur News : पंढरपूरजवळ धावत्या शिवशाही बसला आग, प्रवाशांची धावपळ

पंढरपूर जवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बस‌ पेटल्याची घटना आज शनिवारी (ता ५) सकाळी घडली. चालकाने प्रसंगावधान दाखवून सर्व प्रवाशांना बस बाहेर काढले. पंढरपूर आगाराची ही बस पुण्याला निघाली‌ होती. बस वाडीकुरोली गावा जवळ आली असता बसने अचानक पेट घेतला. आगीमध्ये बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा

चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेची ही असतात की नाही? का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतचं राहायचं. असा प्रश्न उपस्थित करत, अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. मावळ विधानसभेत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात अजित पवारांनी शरद पवारांपासून दूर होण्याचं कारण सांगितलं. काळानुरूप बदल स्वीकारले जातात. वडील सत्तरी पार केल्यावर आपल्या डोळ्यात देखत मुलावर जबाबदारी सोपवतो, मात्र काहीजण ऐकतच नाहीत. एवढा हट्टीपणा कशाला, असं म्हणत अजित दादांनी शरद पवारांना उद्देशून वक्तव्य केलं.

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे सहकुटुंब घेणार दर्शन घेणार आहेत. उद्या राज ठाकरे घेणार उत्तर महाराष्ट्रातील मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील मनसे पदाधिकाऱ्यांना स्वतः राज ठाकरे राजमंत्र देणार आहे. संभाव्य इच्छुकांची भेट आणि पक्ष संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून करणार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज पदाधिकाऱ्यांना काय राज मंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Amravati News : अमरावतीत तणावपूर्ण शांतता, नागपुरी गेट परिसरात जमाबंदी लागू

गाझियाबाद येथे स्वामी यती नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी रात्री मोठा जमाव नागपूर गेट पोलीस स्टेशनवर आला. काही वेळात हा जमाव हिंसक झाला व अचानक नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर व हजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली. यात मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचे व पोलीस स्टेशनचे देखील नुकसान झाले आहे. दोन ते अडीच हजार लोकांचा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना रात्री अखेर हवेत गोळीबार अश्रुधुरांच्या नळकांड्यावर लाठीचार्ज करावा लागला.

रात्री एक वाजता नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. जमावाकडून करण्यात आलेला दगडफेकीमध्ये 29 पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झालेले आहेत. या परिसरात सध्या जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून शांतता राखण्याच्या आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com