Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनाचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर; ७ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार कामकाज

Maharashtra Assembly Winter Session 2023: यंदा ७ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेश चालणार आहे.
Winter Session 2023
Winter Session 2023Saam TV
Published On

Maharashtra Assembly Winter Session 2023:

हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यंदा ७ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे. हिवाळी अधिवेशानाचे हे तात्पुरचे वेळापत्रक असून, २० डिसेंबरपर्यंतच्या कामकाजाची नोंद यात करण्यात आलीये.

Winter Session 2023
Crime News: संतापजनक! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ जणांकडून सामूहिक अत्याचार; काळीमा फासणारी घटना

२ दिवसांची कात्री

दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते. मात्र यावेळी तात्पुरत्या अधिवेशनाच्या वेळापत्रकात शुक्रवारीच अधिवेशन गुंडाळल्याचं दिसतंय. त्यामुळे या कामकाजाला पुढील दोन दिवसांची कात्री लावली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या मुद्द्यांवर होणार चर्चा

सध्या नाशिक -पुणे अंमली पदार्थांचे प्रकरण मोठ्या चर्चेत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील दुष्काळ, कायदा- सुव्यवस्था, नागपुरात झासेली अतिवृष्टी, पूरग्रस्त भागांती नागरिकांचे प्रश्न, अशा विविध प्रश्नांवर चर्चा होऊ शकते.

नागपुरात झालेल्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले होते. पुराच्या तडाख्यामुळे अद्यापही अनेकांना त्याच्या झळा सोसाव्या लागतायत. त्यामुळे या अधिवेशनात येथील व्यक्तींना विशेष पॅकेज जाहीर केले जाईल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं .

Winter Session 2023
Washim Crime News : तहसिलदारांची धडक कारवाई, ट्रकसह 6 लाखांचा तांदुळ पकडला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com