
पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवारांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. महाराष्ट्र ठोश्याचे राज्य झाले आहे. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य होतं पण आज आपल्या राज्याची ओळख शेतकरी आत्महत्या आणि ड्रग्समुळे होतंय. संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये चांगलं जेवण मिळालं नाही म्हणून तेथील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेवट्टीवार यांनी सरकारवर टीका केलीय.
पुण्यात कोयत्या गँग धुमाकूळ घालतेय. आता सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झालीय. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात. जेवण चांगले मिळाले नाही म्हणून मारहाण करतात. गळकी एसटी बघून परिवहन मंत्र्यांचे काय करायचे? निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मंत्र्यांचे, दवाखान्यात औषध नाही मिळाले की आरोग्य मंत्र्याला हा न्याय लागू करायचा का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुंगटीवार म्हणाले राज्यात ११ हजार कोटींचे ड्रॅग आणि १० हजार कोटींचे सिंथेटिक ड्रग्स सापडलं. हे फक्त हिमनगाचे टोक आहे, सत्ताधारी आमदारच ही माहिती देत आहे, म्हणजेच किती गंभीर स्थिती आहे, याची कल्पना येईल, असं वडेवट्टीवार म्हणालेत. परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या संविधानाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणाची हत्या झाली. श्वसनाचा आजार असल्याने मृत्यू झाल्याची माहिती सरकारने सभागृहात दिली पण आता कोर्टाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. सरकार आता काय कारवाई करणार असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.