Padalkar vs Jitendra Awhad: विधानभवनात गुंडांना पास कोणी दिले? कडक करावाई करा, हाणामारीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Reaction: जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंड पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत गुंडांना प्रवेश कोणी दिला याचा तपास करावा, अशी मागणी केलीय.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Reaction on FightSaamtv
Published On

विधानसभेच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. विधीमंडळात येण्यासाठी अशा गुंडांना कोणी पास दिले. ज्यांनी पास दिलेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी सर्व कामे सोडून यावर कारवाई करावी, तरच ते जनतेला तोंड दाखवण्याच्या पात्रतेचे आहात, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात जात असताना रेड कार्पेटरवरच नाव न घेता घोषणाबाजी करत गोपीचंद पडखळकरांना डिवचलं होतं. आता या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहेत. बुधवारी गोपीचंद पडळकर यांनी कारच्या दरवाजाला लाथ मारली होती. कारचा दरवाजा आव्हाड यांना लागला होता.

त्यानंतर पडळकर यांनी आव्हाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आव्हाड यांच्या समर्थकांनी पडळकर यांना दम दिला होता. आज जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंड पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं.

या घटनेनंतर उद्धव ठाकरे संतापले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारत गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली. ते गुंड आहेत की समर्थक आहेत, जर अशी परिस्थिती असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिलेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांची नावे समोर आली पाहिजेत. कारण पास देण्याचा अधिकार आहे अध्यक्षांचा असतो. त्यांचीही दिशाभूल झालीय का? हे पाहावे लागले. विधानभवनात अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की होतेय.

Uddhav Thackeray
Padalkar vs Awhad: विधानसभेच्या गेटसमोरच गोपीचंद पडळकर-जितेंद्र आव्हाड भिडले; दोन्ही नेत्यांकडून शिवीगाळ|व्हिडिओ

जर गुंडगिरी विधानभवनापर्यंत पोहचली असेल तर हे खूप अवघड आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व विषय सोडून या गुंडांवरती आणि गुंड्यांच्या पोशिंद्यावरती कारवाई केली पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालकमंत्री आहात. तर तुम्ही जनतेल तोंड दाखवायचे लायकीचे आहात, अशा कडक शब्दात उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अहवाल आल्यानंतर मारहाण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com