EVM विरोधात पराभूत मैदानात ; 22 पराभूत उमेदवारांचं निवडणूक आयोगाला चॅलेंज

Assembly Election: मविआचा दारुण पराभव झाल्यामुळे पुन्हा EVM वर संशय बळावलाय. राज्यात ईव्हीएमविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई सुरु झाली आहे. तब्बल 22 पऱाभूत उमेदवारांनी मतमोजणीवर संशय घेत ईव्हीएमच्या पडताळणीसाठी शुल्क भरून अर्ज केलाय. पाहूया एक रिपोर्ट.
Assembly Election
EVMSaam
Published On

राज्यात विधानसभेचा अभूतपुर्व असा निकाल लागला. मविआचा दारुण पराभव झाल्यामुळे पुन्हा EVM वर संशय बळावलाय. आणि म्हणूनच राज्यात ईव्हीएमविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढवू असं मविआनं जाहीर केल्यानंतर आता राज्यातील 22 पराभूत उमेदवारांनी मतमोजणीवर संशय घेत ईव्हीएमच्या पडताळणीसाठी शुल्क भरून अर्ज केलाय. कोण आहेत हे २२ पराभूत उमेदवार ते पाहूयात.

EVMवर संशय

पुन्हा मतमोजणी

बाळासाहेब थोरात

रमेश बागवे

राम शिंदे

अभिषेक कळमकर

राणी लंके

प्राजक्त तनपुरे

संदीप वरपे

सुनील भुसारा

प्रशांत जगताप

सचिन दोडके

अशोक पवार

राहुल कलाटे

चरण वाघमारे

फवाद अहमद

केदार दिघे

राजन विचारे

नरेश मणेरा

दीपेश म्हात्रे

एम.के.मडवी

हितेंद्र ठाकूर

क्षितीज ठाकूर

राजेश पाटील

Assembly Election
EVM वरील संशयाचं धुकं गावागावात, सोलापूर जिल्ह्यातील गावात 3 डिसेंबरला होणार मतपत्रिकेवर मतदान

पराभूत उमेदवारांनी निकालाला आव्हान दिलंय. तर विजयी उमेदवारांनी ईव्हीएमचा दोष असल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचं खुलं आव्हान दिलंय. मतमोजणीवर आक्षेप असल्यास ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटची पडताळणी नेमकी कशी होते ते पाहूयात.

कशी होते ईव्हीएम व्हिव्हीपॅटची पडताळणी?

उमेदवाराला 7 दिवसांच्या आत आक्षेप नोंदवावा लागतो

अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत ईव्हीएमची पडताळणी होते

मतमोजणी झालेल्या एकूण मतांपैकी 5 टक्के व्हीव्हीपॅटची पडताळणी होते

तर एका केंद्रावरील ईव्हीएमच्या पडताळणीसाठी 47 हजार 200 रुपये शुल्क आकारलं जातं.

Assembly Election
EVM वरील संशयाचं धुकं गावागावात, सोलापूर जिल्ह्यातील गावात 3 डिसेंबरला होणार मतपत्रिकेवर मतदान

राज्यात कधी नव्हे तेवढ्या पराभूत उमेदवारांनी लाखो रुपयांचं शुल्क भरून निकालाला आव्हान दिलंय. यात जर काही तफावर आढळली तर विरोधक आणखीन आक्रमक होणार यात शंका नाही. त्यामुळे पळताळणीमुळ सा-या राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com