MVA Seat Sharing: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार, विदर्भ- मराठवाड्यात काँग्रेस, 'मविआ'च्या जागा वाटपाची ब्लू प्रिंट तयार?

Maharashtra Assembly Election 2024: मविआच्या जागा वाटपाची ब्लुप्रिंन्ट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विभागनुसार आणि पक्षांची ताकद पाहून मविआचे जागा वाटप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
MVA Seat Sharing: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार, विदर्भ- मराठवाड्यात काँग्रेस,'मविआ'च्या जागा वाटपाची ब्लू प्रिंट तयार?
MVA Seat Sharing Saam Tv
Published On

मुंबई, ता. २८ सप्टेंबर

MVA Seat Sharing Formula: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. विधानसभेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये जोर- बैठका सुरु आहेत. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून मविआच्या जागा वाटपाची ब्लुप्रिंन्ट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, विभागनुसार आणि पक्षांची ताकद पाहून मविआचे जागा वाटप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. टाईस्म ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागा वाटप प्रामुख्याने विभागनिहाय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याची ब्लूप्रिंटही ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महायुतीला सत्तेतून खाली खेचण्यााठी आणि राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी या फॉर्म्युलाला सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. या ब्लू प्रिंटनुसार, विभागनिहाय जागा वाटपावर भर देण्यात येणार आहे.

म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातील जागा वाटपात काँग्रेसला प्रथम स्थान, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला तर मुंबईसह कोकणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जास्त जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात एकूण ४६ आणि विदर्भात ६२ जागा आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात ५८ आणि उत्तर महाराष्ट्रात अ ४७ जागा आहेत. मुंबईसह कोकण पट्ट्यात एकूण 75 जागा आहेत.

MVA Seat Sharing: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार, विदर्भ- मराठवाड्यात काँग्रेस,'मविआ'च्या जागा वाटपाची ब्लू प्रिंट तयार?
Maharashtra Politics : महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू होणार? भाजप आमदारांना धडकी; अनेकांची झोपच उडाली

"पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते पाहायला मिळाले होते. पक्षफुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या पाठीमागे मोठा जनाधार आहे. दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात काँग्रेसने बाडी मारली आहे. लोकसभा निवडणुकीतही मराठवाड्यात काँग्रेसने मुसंडी मारली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसने ६२ पैकी ४३ विधानसभा जागांवर आघाडी मिळवली होती. तर मुंबईसह कोकणात ठाकरेंचा वरचष्मा राहिला आहे.

MVA Seat Sharing: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार, विदर्भ- मराठवाड्यात काँग्रेस,'मविआ'च्या जागा वाटपाची ब्लू प्रिंट तयार?
Crime News : बेपत्ता १६ वर्षीय शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबियांचा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या, गंभीर आरोप!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com