Maharashtra Live Update : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकरला आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 19 March 2025 : आज बुधवार दिनांक १९ मार्च २०२५ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, लाठीचार्ज, दगडफेक, अश्रुधुराचा मारा, धार्मिक वाद, नागपूर तणाव, औरंगजेबाची कबर, पोलिस बंदोबस्त, जाळपोळ, नागपूर महाल हिंसाचार, संतोष देशमुख हत्याकांड, हवामान अपडेट, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Marathi Breaking Live Marathi Headlines Updates
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकरला आग

खालापुर हद्दीत मुंबई लेनवरील फुडमॉल जवळील घटना

दुर्घटनाग्रस्त टँकर शेजारी इतर गाड्या असल्याने धोकादायक परिस्थिती

बचाव पथक घटना स्थळी दाखल

दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करा, वडिलांची मागणी

पुण्यातील घोरपडीमध्ये रेल्वेच्या जागेतील घरे व दुकाने जमीनदोस्त

घोरपडी गावात सोलापूर रेल्वे मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यासाठी मरीमाता वस्तीमधील काही घरांवर आज कारवाई करण्यात आली. रेल्वेच्या जागेवर अनधिकृत साधारण शंभर घरे आहेत.उड्डाणपुलाच्या कामासाठी आज १५ घरांवर व ३३ दुकानांवर कारवाई करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जानेवारीत या कारवाईला नागरिकांकडून विरोध करण्यात आला होता. त्यावेळी वादविवादा नंतर कारवाई स्थगित करण्यात आली होती.रेल्वेकडून घरांना बारा दिवस तर दुकानांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली होती.

Pune Crime: पुण्यातील सिग्नलवर अश्लील चाळे केल्याप्रकरणी गौरव आहुजाच्या मित्राला जामीन मंजूर

पुण्यातील येरवडा भागात एका आलिशान गाडीतून उतरून गौरव आहुजा ने एका सिग्नल वर लघुशंका करत अश्लील चाळे केले होते. यावेळी त्याचा मित्र भाग्येश ओसवाल हा गाडीत बसला होता. पुणे पोलिसांनी आहुजा यासोबत ओसवाल याला अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने ओसवाल याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून टायर जाळून रविकांत तुपकरांच्या अटकेचा निषेध

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना कर्जमाफी आंदोलनाच्या दरम्यान मुंबई मध्ये अटक करण्यात आली. याचा निषेध म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिसोड वाशिम महामार्गावरील हराळ फाट्याजवळ टायर पेटवून निषेध केला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला आता बीड न्यायालयात चालणार

एसआयटीकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केस न्यायालयऐवजी बीड न्यायालयात चालवावा यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावरती काल दुसरी सुनावणी पार पडली दोन्ही वकिलांचा युक्तिवादानंतर मुख्य न्यायाधीश यांनी निकाल राखीव ठेवण्यात आला होता.

पूजा खेडकरच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 15 एप्रिलला सुनावणी

सर्वसामान्य उमेदवार व दिव्यांग उमेदवाराच्या रूपात परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या संधी दिल्या जाऊ शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय प्रशासनिक सेवेच्या माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला मंगळवारी सांगितले. परीक्षेत फसवणूक केल्याचा व चुकीच्या पद्धतीने ओबीसी तसेच दिव्यांग कोट्याचा लाभ उठवल्याचा खेडकरवर आरोप आहे. 

 Aurangzeb News: खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अन्यथा जालना जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. जालन्यात आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली. औरंगजेबाची कबर केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे औरंगजेबची कबर या खात्याच्या संरक्षणमधून वगळावी, उगाच महाराष्ट्राला वेठीस धरून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे काम करू नये, असा इशारा देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आलाय.

Bus Accident: मुरबाड-शहापूर बसचा अपघात; डिझेल टाकी फुटल्यानंतर बसने घेतला पेट

मुरबाड - शहापूर रस्त्यावरील कुडवली गावाजवळ महामंडळाची बस पलटी झाली. या अपघातात बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झालेत. पलटी झाल्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने बसने अचानक पेट घेतला. मुरबाड-शहापूर बस मुरबाडहून शहापूरच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. कुडवली गावाजवळ रस्त्यात बसचा बेल्ट तुटल्याने बसची स्टेरिंग लॉक झाले, त्यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

वन्यजीव प्रेमींचं सतीश उर्फ खोक्या भोसलेविरोधात उद्या आझाद मैदानावर उपोषण

बीड जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी मुंबईकडे निघाले आहेत. सतीश उर्फ खोक्या भोसलेने हरण मारल्याचा आरोप करण्यात आलाय. सतीश उर्फ खोक्या भोसलेवर मकोका लावण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केलीय.

 Nashik Rangpanchmi:  नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्सव शिगेला

नाशिकमध्ये आज रंगपंचमी मोठ्या उत्सवात साजरी होत आहे. रंगपंचमी साजरी करण्यासाठी रंग प्रेमींने गोदा घाटावर रामकुंडावर रंगपंचमी साजरी करण्यासाठी गर्दी केली आहे. सहकुटुंब नाशिककर रंगपंचमी खेळण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे, त्यामुळे नाशिक शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे.

अनेक ठिकाणी शहरातील विविध भागात रस्त्यांवर शावर आणि डीजेच्या तालावर तरुण-तरुणी थिरकत आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने नाशिक मध्ये रंगपंचमी साजरी होत आहे. आणि म्हणूनच संपूर्ण नाशिकमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यांवर तैनात करण्यात आलाय.

Dhule News:  सफाई कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाचे तीन दिवसीय धरणे आंदोलन सुरू

प्रलंबित मागण्यांसाठी आजपासुन संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने तीन दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे, तत्पूर्वी महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरे बांधुन द्यावीत, सफाई कामगारांच्या वारसास 30 दिवसात नियुक्ती द्यावी, सफाई कामगारांच्या मुला-मुलींना मानधन तत्वावर नोकरी द्यावी आणि सेवानिवृत्त, सफाई कामगारांना वाढीव उपदानाची व सातव्या वेतन आयोगाची रक्कम त्वरीत अदा करावी आणि महानगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांच्या अॅडव्हॉन्स मध्ये वाढ करावी.

Beed News: बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू

बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आलाय. सध्या जिल्ह्यात नेत्याचे प्रमुख कार्यकर्त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा वाद होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात निदर्शन, आंदोलन, उपोषण, मोर्चे होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर हा मनाई आदेश लागू करण्यात आलाय. जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडून हे मनाई आदेश जारी करण्यात आलेत. 19 मार्च रात्री बारापासून ते 2 एप्रिल पर्यंत हे आदेश लागू असतील. परिस्थिती लक्षात घेऊन. मनाई आदेश वाढण्यात येण्याची शक्यता आहे. या आदेशानुसार मोर्चे निदर्शने आंदोलने परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध असतील.

Raigad News:  रायगडमधील काळ जल विद्युत प्रकल्पाच्या मशीनचा स्फोट

काळ जल विद्युत प्रकल्पाच्या मशीनचा स्फोट झालाय. वणव्यामुळे आग लागून मशिनरीने पेट घेतलाय. काही वेळात झाले तीन स्फोट आणि काळ्या धुराचे लोट उठले आहेत. कोंझर ग्रामस्थांमध्ये घबराट झालीय. रायगड किल्ला परिसरात कोंझर कोंडरान गावच्या रस्त्यावर दुर्घटना झालीय. काळ जल विद्युत प्रकल्याची मशिनरी कोंझर गावच्या हद्दीतील पत्राशेडमध्ये ठेवण्यात आली होती. महाड नगर पालिका आणि महाड MIDC अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Nashik News: तिवंधा चौकातील रहाड आयोजकांनी केली बंद

- रहाड परिसरात पोलीसांचा सौम्य लाठीचार्ज

- लाठीचार्ज करत गर्दीवर मिळवले नियंत्रण

- रहाडीत रंग खेळण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी

Pune News: पुण्यात मनविसेचे आंदोलन

वाडिया महाविद्यालय गेटवर आंदोलन

वाडिया महाविद्यालय येथे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या फलकावर अभाविप ने स्प्रे पेंटिंग ने जॉईन अभाविप असेल लिहिल्याने मनविसे आक्रमक

काही वेळात आंदोलन सुरू होईल

सांगोल्यातील करांडवाडीतील ग्रामस्थ तीन महिन्यांपासून रेशनच्या धान्यापासून वंचित

सांगोला तालुक्यातील करांडवाडीतील ग्रामस्थ मागील तीन महिन्यांपासून रेशनच्या धान्यापासून वंचित आहेत.

रेशनचे धान्य मिळत नसल्याने येथील गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. येथील रेशन दुकानातून धान्य मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सांगोल्यापासून 40 किलोमीटर अंतर दूर असलेल्या करांडवाडी या दुष्काळी गावात 84 लाभार्थी कुटुंब आहेत.

ही सर्व कुटुंब मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. शासनाकडून मिळणार्या स्वत धान्याचा या कुटुंबांना मोठा आधार आहे.

मात्र गेल्या तीन महिन्यांपासून येथील रेशन दुकानातून येथील लाभार्थी कुटुंबांना धान्य मिळाले नाही. त्यामुळे येथील कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे.

सांगोला येथील पुरवठा अधिकार्यांकडे वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही. आज येथील ग्रामस्थांनी पुरवठा कार्यालायत येऊन आपले कैफित मांडली. आठ दिवसात रेशनचे धान्य मिळावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा आता येथील ग्रामस्थांनी दिली आहे.

Nandurbar: शहादा तळोदा मतदारसंघात लवकरच एमआयडीसी व्हावी यासाठी उद्योग मंत्र्यांकडे कडे केली मागणी

नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात एकही मोठा उद्योग धंदा सुरू झालेला नाहीय..

नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असून रोजगाराच्या शोधात अनेक आदिवासी बांधवांना इतर जिल्ह्यासह दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर करावं लागत असतं

त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि कुपोषण सारख्या गंभीर समस्या या भागांमध्ये उपस्थित होत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यात एकही मोठा उद्योग धंदा आला नाही

त्यामुळे मोठा रोजगाराचा प्रश्न या भागांमध्ये गंभीर होत चाललेला आहे कुशल आणि अकुशल तरुणांना मोठ्या शहरात जाऊन काम करावं लागत असल्याची परिस्थिती या भागांमध्ये आहे..

या संदर्भातला प्रश्न आमदार राजेश पाडवी यांनी लक्षवेधी क्रमांक नऊ मध्ये विधानसभेत उपस्थित केले आहेत....

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 800 लाभार्थी अयोध्येला रवाना

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी आज अयोध्येला रवाना झाले. तिथे श्रीराम मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत. ही यात्रा 19 ते 23 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. आज सकाळी दुपारी बारा वाजता यात्रेकरूंना घेऊन रेल्वे रवाना झाली. उद्या, 20 मार्च रोजी श्रीराम मंदीर अयोध्या येथे हे ज्येष्ठ पाहोचणार आहे. 21 मार्च रोजी सांयकाळी सदर ट्रेन अयोध्या रेल्वे स्थानकावरुन निघून 23 मार्च रोजी चंद्रपूर येथे पोहोचणार आहे. जिल्हास्तरीय समितीने या यात्रेकरूंची निवड केली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यात्रेकरूंचे स्वागत केले आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Maharashtra Live Update: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो समर्थकांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गनिमी काव्याने भूमिगत होऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल होणार होते, पण खालापूर पोलिसांनी त्यांना आज दुपारपर्यंत नढाळ येथील पंचायत मंदिरात रोखून ठेवले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून ठेवल्या आहेत.राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. परंतु त्यांना पोलिसांनी खालापूर इथे रोखून धरले. शासनाच्या या कृतीचा तुपकर यांनी निषेध केलाय.

भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्यावर महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल कराव - संभाजी ब्रिगेड

उठ सूट कुणीही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवरायांचा अवमान आणि बदनामी करत आहे.

भाजपचेच सगळे वाचाळवीर शिवरायांचा अवमान करण्यात पुढे आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी शिवाजी महाराज होते अशा पद्धतीचं संसदेच्या सभागृहात वक्तव्य करणे हे अत्यंत निषेधार्य आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध...

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.

'छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना फक्त स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते.'

भाजपच्या खासदाराचं दुर्दैवी आणि आक्षेपार्ह वक्तव्य हे प्रशांत कोरटकर सारख्या शिवद्रोहींना पाठबळ देणार आहे.

औरंग्याच्या कबरीवर आग पकड करणारे सत्ताधारी मंत्री राणे आणि त्यांच्या लोकांनी पुरोहित प्रकरणावर तोंड उघडावे.

मुख्यमंत्र्यांनी शिवद्रोह्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

Amaravati: ५ हजाराची लाच मागणारा पीएसआय दर्शन दिकोंडवार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पीएसआय दर्शन दिकोंडवार व गाडी चालक पोलीस सुकेश सारडा यांना पाच हजार रुपयाची लाच मागीतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे,

ट्रॅक्टरची ट्रॉली सोडून देण्यासाठी 5 हजार रुपयाची मागणी या लाचखोर पोलीस अधिकारी व त्याचा सहकारी गाडी चालकाने केली..

यात चक्क नांदगाव पोलीस स्टेशनच्या आवारातच लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.

मात्र वेळेवर संशय आल्याने ती रक्कम घेतली नाही, मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल करून दोन्ही लाचखोर पोलिसांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केली आहे,

दरम्यान या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे

तीन दिवसा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर खरेदी विक्रीचे कार्यालय फोडून टाकू - ठाकरे गटाचे पराग गुडधे यांचा इशारा

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेड अंतर्गत शासकीय हमीभावाने सोयाबीनची विक्री केली..

मात्र अमरावती तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीचे पैसे अद्यापही मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे धाव घेत तात्काळ पैसे देण्याची मागणी केली

अमरावती खरेदी विक्री संघाच्या अनागोंधी कारभारामुळे शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे,

31 मार्च पर्यंत कृषी कर्ज शेतकरी बँकेत न भरल्यास त्यांना विनाकारण व्याजाचा भूदंड बसणार आहे.

त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना नाफेड विक्रीचे सोयाबीनचे पैसे द्यावे अशी मागणी ठाकरे गटाचे अमरावती जिल्हा प्रमुख पराग गुडधे यांनी केली जर तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही आणि शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल केले नाही तर शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष येणाऱ्या तीन दिवसानंतर खरेदी विक्रीचे कार्यालय फोडून टाकेल असा इशारा पराग गुडधे यांनी दिला

Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात आढळले मद्य आणि सिगरेटचे पाकिटे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील मद्य आणि सिगरेट पाकिटे आढळून आल्यानंतर आता विद्यापीठाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

विद्यापीठाने या प्रकरणात ३ विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई केली आहे. इतकचं नव्हे तर ज्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील खोल्यांमध्ये हे आढळून आले होते

त्या विद्यार्थिनींच्या पालक आणि विभाग प्रमुखांकडून यापुढे असे कृत्य होणार नाही याची लेखी हमी घेण्यात आली आहे.

काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या, सिगरेट पाकिटे तसेच अमली पदार्थ मिळून आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवा

Pandharpur: विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार

विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यासाठी येत्या 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे.

1 एप्रिल ते 31 जुलै या चार महिन्यांसाठी ही नोंदणी होणार आहे. यामध्ये भाविकांना चंदन उटी पूजेची नोंदणी करता येणार आहे.

मंदिर समितीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा ऑनलाईन पध्दतीने नोंदणी सुरू केली आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज रंगपंचमीचा उत्सव विविध प्रकारच्या रंगांची उधळण करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.

तुळजाभवानीला महाअलंकार,महावस्त्र परिधान करून देवीला कोरडे आणि नैसर्गिक रंग लावून रंगांची देवीच्या मुख्य गाभाऱ्यात रंगाची उधळण करण्यात आली.

देवीच्या अभिषेकानंतर विधिवत महाआरती करून देवीचे मुख्य पुजारी, महंत आणि सेवेकरी, मंदिर प्रशासनचे अधिकारी यांनी देवीला नैसर्गिक रंग लावून तुळजापुरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली.

विविध रंग देवीला लावल्यामुळे देवीचे रूप अगदीच सुंदर दिसत असल्याने भाविकांनी देखील दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू

शिरूर तालुक्यातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले सध्याला पोलीस कोठडीमध्ये आहे त्याचे पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे

तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे यामध्ये सतीश उर्फ खोकला भोसले ची पत्नी बहीण आणि काही नातेवाईकांनी आमरण उपोषणांमध्ये सहभाग नोंदवला आहे

आमचं अज्ञात लोकांकडून घर जाळण्यात आलं त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात यावी त्याचबरोबर बावी येथील ढाकणे पिता पुत्रांनी आम्हाला चुकीची वागणूक देऊन आम्हाला मारहाण केली त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे

मात्र त्यांना तात्का अटक करावी त्याचबरोबर वनविभागाने अति घाई करून आमचं घर पाडलं आम्हाला रस्त्यावरती आणलं आमची लेकरं रस्त्यावरती आले आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती या उपोषणांमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले च्या पत्नीने केली आहे.

Pandharpur: पंढरपूर तालुक्यात झाडांसोबत साजरी केली रंगपंचमी

आज रंगपंचमी सर्वत्र उत्साह साजरी केली‌ जात असतानाच पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील पर्यावरण प्रेमींनी झाडांना रंग लावून आगळ्यावेगळ्या पद्धतीने पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी केली.

लेकीचे झाड अभियानांतर्गत ज्ञानेश्वर दुधाने यांच्या संकल्पनेतून गावातील तरुणांनी एकत्रित येऊन झाडांसोबत रंगपंचमी साजरी केली.

झाडांना नैसर्गिक रंग लावून येणाऱ्या कडक उन्हाळ्यात झाडे जगवण्याचा अभिनव संकल्प करण्यात आला.

झाडांसोबत साजरी झालेली रंगपंचमी सध्या पंढरपूर तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Yavatmal: भरधाव कंटेनरची कारला धडक,एक जण जागीच ठार; तर दोघेजण गंभीर

भरधाव असलेल्या कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला

तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना अमरावती रोड मार्गावरील यवतमाळच्या लोहारा परिसरात घडली आहे.

विशाल देशमुख असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून युवराज परिहार. नितीन मिश्रा असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जखमी दोघांनाही उपचार अर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे तिघेजण यवतमाळ वरून नेर कडे जात असताना हा अपघात झाला अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Nashik: कल्पना चुंबळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती

- कलपना चुंबळे यांची नाशिकच्या बाजार समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड

- देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर बाजार समितीची झाली निवडणूक

- राष्ट्रवादीचे ( AP ) नेते देविदास पिंगळे यांच्या विरोधात 18 पैकी 15 संचालकांनी आणला होता अविश्वास प्रस्ताव

- आजच्या निवड प्रक्रियेवर देविदास पिंगळे यांचा बहिष्कार

- गिरीश महाजन यांच्याच आदेशाने अविश्वास प्रस्ताव आणल्याचा पिंगळे यांचा पुनरुच्चार

- या संपूर्ण प्रकरणाची माहिती अजित पवार यांना दिल्याची देखील देविदास पिंगळे यांनी दिली माहिती

- दोन वर्षांपूर्वी माझ्या पॅनल मध्ये निवडून आलेल्या संचालकांनी गद्दारी केल्याचे आरोप

Beed: देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 98 दिवसापासून फरार

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 98 दिवस पूर्ण झालेत.

मात्र यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणे अतिशय गरजेचे आहे.

कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली आहे.

कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडून जेर बंद करावे आणि यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असं धनंजय देशमुख यांनी म्हटले.

कृष्णा आंधळे कडे जास्त पुरावे असतील. त्यामुळे तो पोलीस यंत्रणेच्या ताब्यात येण्यासाठी एवढी दिरंगाई करतो आहे.

तर नक्कीच त्याच्याकडे ठोस पुरावे असतील आणि त्याची चौकशी गरजेची आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्याविरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

औरंगजेबाच्या कबर प्रकरणे सामना वृत्तपत्रात संपादकीय मथळ्यातून "हिंदू तालिबानी" असा उल्लेख करण्यात आला आहे,

क्रूर संघटनेची उपमा देऊन जाणीवपूर्वक हिंदू समाजाचा अपमान केला गेल्याने हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळे सामना वृत्तपत्राचे संपादक उद्धव ठाकरे, व्यवस्थापकीय संपादक संजय राऊत, आणि प्रकाशक सुभाष देसाई यांच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहर पोलीस ठाण्यात ऍड शेखर जोशी यांनी तक्रार दाखल केली आहे,

तिघांवरही गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे...

Amravati: अमरावती जिल्ह्यात 15 दिवसात तब्बल 457 लोकांना मोकाट कुत्र्यांचा चावा

अमरावती शहरासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट...

मागील काही महिन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात कुत्रा चावा घेण्याच्या घटनेत झाली वाढ..

जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजच्या लशीचा साठा कमी..

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी..

Latur School: उन्हाची तीव्रता वाढल्याने लातूर जिल्ह्यातल्या शाळा सकाळच्या सत्रात, सकाळी 8 ते 1 ची शाळेची नवीन वेळ

लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढ चालला आहे..

उन्हाचा पारा वाढल्याने, जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भराव्यात अशी मागणी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती

तर मी त्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळा ह्या सकाळी 8 ते दुपारी 1 च्या वेळेत भरवण्याच्या सूचना दिल्या आहेत..

दरम्यान मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा वाढल्याने पुढच्या काळात देखील तापमान वाढीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे...

Washim: चोरद येथील रस्त्यांचे काम तीन महिन्यांपासून रखडले, नागरिक त्रस्त

वाशिमच्या चोरद येथील रस्त्याची दुरवस्था झाल्यानं रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं.

मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं सुरु असून केवळ 1 किलोमीटर असंलेलं काम तीन महिने उलटूनही पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळं चोरद येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.

विद्यार्थी, कामगार, दूध व्यवसाय करणारे शेतकरी यांना प्रामुख्याने रस्त्याच्या अपूर्ण अवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर सर्वत्र खडी, माती, पसरवण्यात आली असून दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ह्या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Shirdi: साई मूर्तीसह समाधी विविध रंगात रंगली, शिर्डीच्या साई मंदिरात रंगपंचमीचा उत्साह

साईबाबा आज विविध रंगात रंगले असून शिर्डीत रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळतोय..

साई समाधी आणि साईमुर्तीवर घातलेल्या सफेद शालीवर आकर्षक रंगाची उधळण करण्यात आली असून कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळ साईमुर्तीला घालण्यात आली आहे..

तर साई समाधीवर बाल कृष्णाचा फोटो ठेवण्यात आलाय..

आज चार वाजता रंगाची उधळण करत साईरथाची मिरवणूक काढण्यात येणार असून हजारो भाविक आज शिर्डीत रंगपंचमी साजरी करणार आहेत...

Nandurbar: नंदुरबार शहरातून काढण्यात आली जगदंबा देवी अवताराची मिरवणूक

साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या नंदुरबार शहरातील बालाजी वाडा भागातील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या होलिका उत्सवाची दिवशी सांगता झाली असून पारंपारिक डफाचा वाद्यात होलिका उत्सवाचा पंचमीनिमित्त नंदुरबार शहरातून जगदंबा देवी अवताराची मिरवणूक काढण्यात आली रात्री उशिरापर्यंत या मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीला नंदुरबारकरांनी उदंड प्रतिसाद दिला असून यावेळी जगदंबा देवी आणि महिषासुर यांचा युद्धाचा देखावा सादर करण्यात आला.. हि मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते..

Beed: अतिमारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव आणि शॉकमध्ये जाऊन तरुणाचा मृत्यू

बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. या अहवालातून विकास बनसोडेच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.

अति मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव आणि शॉक मध्ये जाऊन विकासचा मृत्यू झाला. विकाच्या अंगावर भरपूर मारहाण झाली. शरीर काळे निळे झाले.

त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तो शॉक मध्ये गेला. आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद झाले आहे.

विकास बनसोडे या तरुणाचे आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर याच्या मुलीशी प्रेम संबंध असल्याचा संशय होता.

12 मार्चला विकास पिंपरी येथे आला होता. त्यानंतर त्याला ही मारहाण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

विकास बनसोडे हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक

बनसोडे हत्या प्रकरणात दहा जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यातील आठ आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com