सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत पठण यांना एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा
शौकत पठाण हे स्वतः सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुक होते.
मात्र काँग्रेसने शौकत पठाण यांची उमेदवारी नाकारल्याने ते काही दिवसापासून नाराज होते.
आज ओविसी यांच्या सभेत थेट मंचावर येऊन शौकत पठण यांनी एमआयएम उमेदवार फारुख यांना पाठिंबा दिला.
EVM ची माहिती देण्यात दिरंगाई
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
पुण्यातील निवडणूक अधिकारी निष्पक्ष नाहीत.
ईव्हीएम डेटा देण्यास टाळाटाळ करतायेत.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे चिंचवड विधासभेचे उमेदवार राहुल कलाटे आणि शिरूर विधानसभेचे उमेदवार अशोक पवार यांची पुणे जिल्हाधिकारी विरोधात निवडणूक आयोगाला तक्रार
रत्नागिरी : ऐन निवडणूक काळात गुहागर मध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य. भाजपच्या कार्यकर्त्यांनी थांबवला प्रचार
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या बद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला.
दापोलीमध्येही योगेश कदम यांचा प्रचार थांबवला. मतदानाला आठ दिवस असताना जिल्हाभरात भाजपने काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ.
निवडणुकीच्या दिवशी पुण्यातील मार्केटयार्ड बंद राहणार आहे.
२० नोव्हेंबर रोजी पुणे शहरातील मार्केटयार्ड बंद
कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांनी याबाबत पत्रक काढून दिली माहिती
मार्केट यार्ड येथील भाजी, फुलं, फळांची सर्व मार्केट यांना २० नोव्हेंबर रोजी सुट्टी
पिंपरी उपबाजार, खडकी उपबाजार आणि मांजरी उपबाजार सुद्धा राहणार बंद
हिंगोलीच्या कळमनुरीत प्रचार वाहनांची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड झाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर संतोष टार्फे यांच्या प्रचाराच्या गाड्या फोडल्या.
विरोधकांनी गाड्या फोडण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय सावंत यांनी केला आरोप
तातडीने आरोपींना अटक करा म्हणत पोलीस स्थानकात जमाव जमला
उद्धव ठाकरे मालवणमध्ये दाखल झाले आहेत.
वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेला काही मिनिटांतच पोहोचणार
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या प्रकरणी मालवणात येऊन उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे मालवणकरांचे लक्ष
जोगेश्वरी राडा प्रकरणी शिंदे शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाले आहेत.
महिला आघाडीकडून पोलीस ठाण्याला घेराव
शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याला घेराव
शिवसेना ठाकरे गटाचे जोगेश्वरीचे उमेदवार बाळा नर यांच्या अटकेची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव
बाळा नर यांच्या कार्यकर्त्यांकडून महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग झाल्याचा शिंदे गटाकडून आरोप
शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर असणार आहे.
राज ठाकरे यांच्या उद्या पुण्यात दोन सभा
संध्याकाळी सात वाजता खडकवासला मतदारसंघात मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ वडगाव येथे सभा
संध्याकाळी ६ वाजता हडपसर विधानसभा मतदारसंघात शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ सभा
मोदींच्या मुंबईतील जाहीर सभेसाठी वाहतुकीच्या नियमात बदल
शिवाजी पार्क परिसरातील अनेक रस्त्यावर उद्या नो पार्किंग
तर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग श्री सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक पर्यंत वाहतूक बंद
पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जो पी नड्डा मुंबईत दाखल
गरवारे क्लब याठिकाणी व्यवसायिकांसोबत साधणार संवाद
मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे नियोजन
सीए, इंजिनिअर, वकिल, डॉक्टर यांच्यासोबत जे पी नड्डा करणार चर्चा
मुंबईतील उच्च भ्रू मतांसाठी भाजपचे प्रयत्न
नाना पटोलेच्या हेलिकॉप्टरमध्ये भरारी पथकाला काहीच मिळाले नाही
नाना पटोले यांनी बॅग न आणल्याने पथकाला तपासणी करता आली नाही
नाना पटोले यांनी तपासणी पथकाला केली विचारणा तपासून घ्या काही आहे का..
आर्णी विधानसभा मतदारसंघाचे जितेंद्र मोघे यांच्या प्रचारार्थ घाटंजी येथे नाना पटोले यांची होती जाहीर सभा
भरारी पथकाने नाना पटोले यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली मात्र त्यात नसल्याने भरारी पथकाला खाली हात परतावे लागले..
उद्या हडपसर मध्ये शरद पवार आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.संध्याकाळी शरद पवार यांची हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आघाडी चे उमेदवार प्रशांत जगताप यांच्यासाठी सभा होणार आहे.
हडपसर मधून मनसे चे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. हडपसर मध्ये युती कडून चेतन तुपे तर आघाडी कडून प्रशांत जगताप आणि मनसेकडून साईनाथ बाबर अशी लढत होणार आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी प्रचारसभा... राहुरी मतदार संघात राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध भाजपचे शिवाजी कर्डिले अशी लढत...
पाथरी विधानसभेचे महायुती उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मानवत येथे जाहीर सभा होत आहे.
मुंबईहून दमणला जाणाऱ्या बोटीतून 5 जणांना वाचवलं
तटरक्षक दलाची कामगिरी
हेलिकॉप्टर बचावाचा थरार व्हीडीओत कैद
बोट लीक झाल्यानं पाणी भरत असताना पाच लोकांना वाचवलं
खासदार संजय राऊत यांचे धुळ्यात आगमन
संजय राऊत यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे यांच्या प्रचारार्थ धुळ्यातील शाहू नाट्यमंदीर येथे कार्यकर्ता मेळावा
शरद पवारांचे राहाता शहरात आगमन
विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची सभा
काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी पवारांची सभा
शिर्डी मतदारसंघातील राहाता शहरात जाहीर सभेचे आयोजन
न्यू होरीझोन शाळेजवळील ट्रान्सफरमध्ये झाला स्फोट
स्फोट होऊन ट्रान्सफॉर्मरला लागली आग.
स्फोटाचा आवाज मोठा असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काढले मैदानात.
अद्याप पर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
‘कोर्टाने दिलेले आदेश आम्ही पाळले‘ - अजित पवार वकील
कोर्टाच्या सूचनेनुसार आम्ही सर्व वृत्तपत्रात जाहिरात दिल्या - अजित पवार वकील
अजित पवार यांच्या वकिलांकडून ज्याा मराठी वर्तमान पत्रात जाहिराती दिल्या त्या वर्तमान पात्रांची नाव कोर्टात सांगितली
एकूण ११ वर्तमान पत्रात आम्ही जाहिराती दिल्या आहेत - अजित पवार वकील
मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत जाहिराती दिल्या - अजित पवार वकील
"ट्रम्प यांच्या खाली वर्तमानपत्रात जाहिरात दिसतेय"
न्यायमूर्ती सूर्यकांत यांची मिश्किल टिप्पणी
शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची लढत होत असली तरी खेड अपवाद वघळता जुन्नर,आंबेगाव शिरुरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विरोधात लढत होते प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना सभांचा धुमधडाका सुरु असताना शरद पवारांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय.
आदित्य ठाकरे आज दिवसभर करणार मतदारसंघात प्रचार
वरळीतील मतदरांसोबत गाठीभेटी करत मतदारांना घालणार साद
वरळीत आज आदित्य ठाकरे यांची प्रचारफेरी
तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डीदेखील आदित्य ठाकरेंच्या प्रचारार्थ वरळीतील सभेला राहणार उपस्थित
मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघासाठी RSS कडून तयारी करण्यात आली आहे. संघाच्या 72 समन्वयकांकडे मुंबईत एक है तो सेफ है ची जबाबदारी देण्यात आली.
मुंबईतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संघांचे दोन समन्वयक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या मतदारसंघाकडे संघांचे विशेष लक्ष
पालघरच्या बोईसर नागझरी परिसरात दगड खान आणि क्रेशर मालकांच्या घरांवर छापे . एकाच वेळी सहा ते सात क्रशर चालकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे . अरुण अधिकारी , रुपेश अधिकारी , नंद गवळी , विनोद अधिकारी यांच्यासह आणखी काही क्रेशर चालकांच्या घरांवर आणि कार्यालयावर छापे . निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाची कारवाई .
Ajit Pawar Speech in Beed Live : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सध्या बीड जिल्ह्यात रणधुमाळी सुरू आहे.. नेत्यांकडून आपल्या उमेदवारांसाठी सभांचा धडाका सुरू आहे.. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यात दोन सभा आहेत.. बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ अजित पवार हे बीड आणि गेवराई शहरात जाहीर सभा घेत आहेत. दरम्यान बीड मधील या सभेची डॉक्टर योगेश शिरसागर यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली असून सभेच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस प्रशासनाने देखील तगडा बंदोबस्त लावला आहे.
Amit Shah Dhule Speech Live : शिंदखेडा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारासाठी आज दोंडाईचा येथे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचार सभा पार पडत आहे, अमित शहा यांच्या सभेची जय्यत तयारी ही आयोजकांतर्फे करण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनातर्फे कडेपोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये याची पूर्णतः खबरदारी पोलीस प्रशासनातर्फे घेतली जात आहे,
- दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात केला पक्षप्रवेश
- भाजप आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जातोय
- शिवशरण बिराजदार पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत
- दक्षिण सोलापूर मध्ये लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे.
- शिवशरण बिराजदार पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा
नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय बल्क मॅसेज प्रसारित केल्याने ही नोटीस बनवण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार संगीता पाटील डक, शिंदे गटाचे उमेदवार आमदार बालाजी कल्याणकर आणि अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांचा समावेश आहे.
लोकसभेनंतर विधानसभेतही राणांविरोधात पुन्हा बच्चू कडू यांनी ठोकले दंड
शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांना बच्चू कडूंच बळ
येत्या 17 तारखेला बच्चू कडू आणि नयना कडू घेणार प्रीती बंड यांच्यासाठी भव्य जाहीर सभा
कडू दाम्पत्याच्या एन्ट्रीने बडनेरा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार
बडनेरा मतदार संघात बच्चू कडू एन्ट्री करत असल्याने रवी राणांचं वाढणार टेन्शन
प्रीती बंड प्रहार पक्षात प्रवेश करण्याचीही शक्यता
जळगाव शहरातील मेहरून परिसरात मुलांच्या दोन गटात वाद होऊन या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले असून धार्मिक मिरवणूक काढल्याच्या कारणावरून ही दगडफेक झाल्याची माहिती आहे दरम्यान दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
स्वराज्य पक्षाचे ऐरोली मतदार संघाचे उमेदवार अंकुश कदम यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांचा महिला मेळावा कोपरखैरणे येथे संपन्न झाला. रोजगार, महिला अत्याचार, महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर संयोगिताराजे छत्रपती यांनी भाष्य केले. यावेळी भाषण ऐन रंगात असताना अचानक व्यासपीठावरील समईचा भडका उडाला आणि समईतील तेलाने आग पकडली मात्र संयोगिताराजे यांनी प्रसंगावधान राखत कार्यकर्त्यांना आगीवर पाणी न मारण्याच्या सूचना दिल्या आणि आपले भाषण सुरूच ठेवले. संयोगिताराजे यांच्या प्रसंगावधानामुळे व्यासपीठावर गोंधळ होण्यापासून देखील थांबला. यावेळी आपल्याला फर्स्टऐड आणि आग लागल्यावर काय करावे याची शिकवण द्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया संयोगिताराजे छत्रपती यांनी व्यक्त केलेय.
चिरेखाणीवर अवैधरीत्या राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखेने अटक केली आहे. ही कारवाई रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथील कालरकोंडवाडी येथे करण्यात आली. हे सर्वजण वैध कागदपत्रांशिवाय, बांगलादेश सीमेवरील मुलखी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीने भारतात आले आहेत. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केलीय.
Maharashtra Marathi News Live Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज उद्धव ठाकरे यांच्या सभा होत आहेत. उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यात येऊन टीका केल्यास जिल्हा बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्याकडे लक्ष लागून राहिल आहे. सावंतवाडी, कणकवलीत आणि मालवण येथे उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत आणि याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
Maharashtra Marathi News Live Updates : रत्नागिरी विधानसभा मतदार संघात विविध मतदान केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या आणि बंदोबस्तावर असणारे पोलीस अशा 942 जणांनी टपाली मतदान करुन आपला हक्क बजावला. आजही टपाली मतदान या केंद्रावर होणार आहे रत्नागिरी शहरातील रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.15, दामले विद्यालयातील मतदान केंद्रावर हे टपाली मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलीसांनी केलं. एकूण 1567 पैकी पहिल्या दिवशी 942 जणांनी आपले मतदान केलं. आजही याच ठिकाणी टपाली मतदान होणार आहे. यामध्ये दापोलीमधील 71, गुहागरमधील 66, चिपळूणमधील 88, राजापूरमधील 73 आणि इतर जिल्ह्यातील 171 अशा एकूण 942 जणांना समावेश आहे.
नवापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत असून अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्याकडून ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू आहे, राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेली सभेत दोन ते अडीच हजार लोक असणं हे दुर्दैव आहे, या सभेमुळे त्यांच्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे ही समोर आली आहे. काँग्रेसचे उमेदवार शिरीष नाईक हे महिन्याभरापासून नाना पटोलेंच्या मागे फिरत होते त्यानंतर त्यांना तिकीट मिळाला आहे. त्याच पद्धतीने भरत गावित हे देखील अजित पवारांच्या मागे फिरत होते तेव्हा उमेदवारी त्यांना मिळाली आहे मात्र मी कुठल्याही पक्षाकडे तिकीट मागायला गेलो नाही. नवापूर विधानसभेतील जनता माझ्यासोबत आहे मला कुठल्याही पक्षाची किंवा चिन्हाची गरज नाही यामुळे माझ्या विजय निश्चित आहे असे विश्वास अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी व्यक्त केले आहे.
Maharashtra Marathi News Live Updates : पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातील तीनही उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्याने नोटिसा दिल्या आहेत
भाजपच्या माधुरी मिसाळ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अश्विनी कदम आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल यांना निवडणूक अधिकाऱ्याने नोटिसा बजावल्या आहेत.
प्रचार खर्चात तपावत आढळल्याने निवडणुका आयोगाने या तीनही उमेदवारांना नोटीसा बजावल्या आहेत.
या तीनही उमेदवारांना लेखी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
निवडणूक अधिकारी तीन टप्प्यात उमेदवाराची खर्चाची तपासणी करत असतात.पहिल्या टप्प्यात या तीनही उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळल्याने तिघांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
बुलडोझर कारवाई बाबत कोर्ट ठरवणार मार्गदर्शक तत्त्व
देशभरात चालू असलेल्या बुलडोझर कारवाईविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट आज एकत्र निर्णय देणार
नियमांचा भंग करून देशभरात बेकायदा पद्धतीनं बुलडोझर चालवले जात आहेत अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती
या प्रकरणाची सुनावणी करत असताना कोर्टाने १७ सप्टेंबर रोजी बुलडोझर कारवाईला स्थगिती दिली होती
खास करून उत्तर प्रदेश आणि बिहार मधे मोठ्या प्रमाणावर बुलडोझर कारवाई केल्याच सांगत या याचिका दाखल झाल्या होत्या
न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांचं पिठ निकाल देणार
Mumbai News जोगेश्वरी रात्रीच्या राड्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल. रात्री शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लब बाहेर मोठ्या संख्येने जमा झाले असता 15 ते 20 मिनिट रस्ता जाम झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
दुसऱ्या गुन्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या वाईकरांच्या महिला कार्यकर्त्याचा गाडीचा पाठलाग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या गुन्ह्यात ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाल्यामुळे विनयभंगाचा गुन्हा देखील चार ते पाच कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे यांची दुसरी जाहीर सभा होणार आहे. आज वरळीतील जांबोरी मैदानात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ७ नोव्हेंबरला वरळी कोळीवाड्यात राज ठाकरे यांची पहिली सभा झाली होती. पहिल्या सभेत राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर टीका करणे टाळले होते, आज राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष सागलेय. वरळीत मनसेकडून वरळीतून संदीप देशपांडे मैदानात उतरले आहेत.
गेल्या चार दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने घट होत असून,
मध्यरात्रीनंतर वाढत जाणारा हवेतील गारवा आणि सकाळच्या आल्हाददायक वातावरणामुळे पुणेकरांना थंडीची चाहूल लागली आहे.
सकाळी गारवा आणि धुक्याचाही अनुभव मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
शहरात मंगळवारी शिवाजीनगर येथे १५, तर एनडीए १३.३ आणि हवेली परिसरात पारा १२.९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता.
- खासदार अमर काळे यांनी आर्वी येथील भाजपा आमदार दादाराव केचे यांना मागितली भर सभेतून माफी..
- दादाराव केचे यांच्यासोबत असलेले राजकीय वैर माझे संपले, माझ्याकडून काही अपशब्द यापूर्वी निघाले असेल तर दादाराव केचे यांची दिलगिरी व्यक्त करतो राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांचे सभेदरम्यान वक्तव्य..
- दादाराव केचे यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने त्यांना मदतीची साद घालण्याचा खासदारांचा प्रयत्न..
- दादाराव केचे यांना भर सभेतून अमर काळे यांनी माफी मागितल्याने अनेकांच्या उंचावल्या भुवया..
- दादाराव केचे यांच्या काही समर्थकांनीही सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीत प्रवेश..
- आर्वी येथून विद्यमान आमदार दादाराव केचे यांना उमेदवारी न देता सुमित वानखेडे यांना दिली भाजपाने उमेदवारी
- यापूर्वी दादाराव केचे व अमर काळे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत
- आर्वी विधानसभेतून खासदार पत्नी मयुरा काळे या आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार
हिंगोली विधानसभेत भाजप उमेदवाराने विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाशी भारतीय जनता पक्षाशी युती नसताना पोस्टर लावल्याने निवडणूक विभागाने आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे, मनसेच्या तक्रारीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्या विरोधात ही कार्यवाही करण्यात आली आहे दरम्यान सर्व नागरिक व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आता केले आहे.
नवी दिल्ली - झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात होत आहे. झारखंडमधे पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी आज मतदान होणार आहे. सोबतच १० राज्यातील ३१ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान होणार आहे. राहुल गांधी यांनी केरळ मधील वायनाड लोकसभेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणुकीचं आज मतदान होत आहे. काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून नव्या हरिदास आणि डाव्या आघाडीकडून सत्यन मोकेरी उमेदवार आहेत.
Maharashtra News Live Updates : केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी याचिका दाखल केली होती. मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने अजित पवार यांना महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमान पत्रात ३६ तासांच्या आत जाहिरात देण्याचे निर्देश दिले होते. कोर्टाच्या निर्देशानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांच्या पक्षाकडून जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोर्टात आज होत असलेली सुनावणी महत्त्वाची आहे. राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोर्ट काही महत्त्वाचे आणि नवे निर्देश देत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Marathi News Live Updates : भाजपच्या उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना गावकऱ्यांना हकलं,आमदार असताना आमच्या गावातील रस्ता बनवून दिला नाहीये मग आता कशासाठी आलात असा प्रश्न करित उमेदवारांसमोर घोषणाबाजी करून त्यांना हाकलून लावलं.हा सगळा प्रकार वणी विधानसभा मतदारसंघातील मारेगांव तालुक्यातील सराटी इथे घटला.दरम्यान भाजपचे आमदार तथा उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना ग्रामस्थांनी वाहनातून खाली उतरू देखील दिलं नाही.
Pune Crime News Update : शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिषह दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची २६ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात नुकताच घडला.या प्रकरणी एका ३७ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाईलवर सप्टेंबर महिन्यात संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे तरुणाने सायबर चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. चोरट्यांनी सुरुवातीला तरुणाला परतावाही दिला.परंतु मागील चार महिन्यांत २६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कोणताही परतावा दिला नाही.
फसवणूक झाल्यानंतर तरुणाने पोलिसांत तक्रार दिली.त्यावरून गुन्हा दाखल करत कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान आव्हाड यांचा मुळे झाले असल्याचा आरोप अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुंब्रा या ठिकाणि आयोजित सभेत मुंडे बोलत होते. या वेळी त्यांनी नजीब मुल्ला याना विजयी करण्याचे देखील आवाहन नागरिकांना केले.
यवतमाळ शहर तसेच मतदारसंघाचा विकास हेच माझे मुख्य व्हिजन असून मी कधीही कुणावर वैयक्तिक आरोप करीत नाही, विकास आणि विचार या मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याची माहिती महायुतीतील यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मदन येरावार यांनी दिलीय.
देशाचे गृहमंत्री अमित शहा आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे प्रचार सभा पार पडणार आहे,
आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारासाठी होत असलेल्या प्रचार सभेमध्ये अमित शहा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Pune News : कसब्यात मनसेच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला. कसब्याचे मनसे उमेदवार गणेश भोकरे यांचा आरोप आहे. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्याकडून धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. कसब्यात भाजप आणि मनसेत वाद होण्याची चिन्ह आहे. गणेश भोकरे यांच्यासाठी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी सभा घेतल्यानंतर धमक्यांना सुरुवात झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.