Ramgiri Maharaj: मदरसे आणि चर्च सरकारने ताब्यात घ्यावेत, महंत रामगिरी महाराज यांची मागणी

Government Should Take Over Madrasas and Churches: महंत रामगिरी महाराज हे आपल्या आक्रमक व्यक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. आज ते नंदुरबार येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते यावेळी त्यांनी मदरसे आणि चर्च हे सरकारने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली आहे.
mahant ramgiri mharaj
mahant ramgiri mharaj Saam Tv
Published On

सागर नाईकवाडे, साम टीव्ही

नंदुरबार: राज्यातील मदरसे आणि चर्च सरकारने ताब्यात घेतले पाहिजे. तसेच शिर्डीचे साई मंदिर आणि पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सरकारने ताब्यात घेतले. मग चर्च आणि मदरसा का घेत नाही असा सवाल गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज यांनी सरकारला विचारला. ते नंदुरबार येथे माध्यमांशी बोलत होते. सध्या शासनाच्या ताब्यात भारतातील सुमारे चार लाख मठ मंदिरे आहेत. या मठ मंदिरांवर सुमारे 18 राज्य सरकारांचे नियंत्रण आहे. ज्या मठ मंदिरांची आर्थिक स्थिति भक्कम आहे ते सरकारच्या ताब्यात आहेत. सुमारे 18 राज्य सरकारांचे मठ आणि मंदिरांवर नियंत्रन आहेत.सरकारी नियंत्रणाखाली गेल्याने मठ मंदिरे लूट आणि भराष्टचाराची केंद्रे बनली आहे असा आरोपही काही साधू महंतांनी काही दिवसापूर्वी केला होता.

mahant ramgiri mharaj
Maharashtra Budget 2025 : संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

याच पार्श्वभूमीवर महंत रामगिरी महाराज म्हणाले, आपल्या भारत देशात अनेक मंदिरे आहेत.ज्या मंदिराचे उत्पन्न वाढले ते मंदिर सरकार ताब्यात घेते असे अनेक मंदिर सरकार ताब्यात घेते शिर्डीचे साई बाबा मंदिर असेल पंढरपूर येथील पांडुरंगाचे मंदिर असेल अनेक मंदिरे सरकारने ताब्यात घेतले आहे.परंतु भारतात असे एकही मदरसा आणि चर्च नाही जे सरकारने ताब्यात घेतले आहे. ज्या मदरसा आणि चर्चचे हजारो कोटींचे टर्न ओवर आहे त्यांना सरकारने ताब्यात का घेतले नाही? जर नियम सर्वांना सारखाच आहे. सरकार जर सर्व धर्म समभाव म्हणतात मग जो नियम हिंदुकरिता आहे तोच मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मासाठी का नाही असा सणसणीत सवाल गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज यांनी सरकारला केला.

mahant ramgiri mharaj
Maharashtra Assembly Budget: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; महायुती सरकार येत्या ५ वर्षात मुंबई, नागपूर आणि पुण्यात विणणार मेट्रोचं जाळं

राज्यातील मदरसांमध्ये मध्ये कसलं शिक्षण दिले जाते याची तपासणी सरकारने केली पाहिजे.राज्यातील मदरसांमधून आतंकवादी तयार होत असल्याच्या गंभीर आरोप गोदावरीचे महंत रामगिरी महाराज यांनी केला आहे जर सरकारने हे केले नाही तर सरकारच्या विरोधात आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी दिला.तसेच कोणाला कोणत्या धर्मात जायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु जर कोणी हिंदू धर्माबद्दल वाईट सांगत असेल आणि त्याचे ब्रेन वाश करून धर्मांतर करत असेल त्याचा आम्ही विरोध करू असे ही ते म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com