Mahad Fire: महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी

Mahad Fire: रायगडमधील महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाडमधील प्रदीप शेट्ये केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली आहे. कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
raigad Mahad Fire
raigad Mahad FireSaam tv
Published On

सचिन कदम, रायगड

Raigad Mahad Fire:

रायगडमधील महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाडमधील प्रदीप शेट्ये केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली आहे. कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील महाड एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एमआयडीसीतील प्रदीप शेट्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे.

कंपनीत रसायनांचे ड्रम असल्याने आगीचा भडका उडाला आहे. ड्रम फुटत असल्याने परिसरात स्फोटाचे मोठ्याने आवाज येत आहे. महाड एमआयडीसी आणि लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे फायर फायटर घटनास्थळी पोहोचले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

raigad Mahad Fire
Pune Crime News : पुणे पोलिसांत मोठे फेरबदल होणार; ७०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

आगीची घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. मात्र, अद्याप आटोक्यात आलेली नाही.

raigad Mahad Fire
Crime News: धक्कादायक! दार्जिलिंगच्या तरुणीवर दिल्लीत आठवडाभर बलात्कार; टॉर्चर केलं, अंगावर उकळती डाळ फेकली

आगीचे कारण अस्पष्ट

केमिकल कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. केमिकल कंपनीला नेमकी आग कशी लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्निशमन दलाचे जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.

पिंपरीत गुराच्या गोठ्याला मोठी आग

पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर येथे आज संध्याकाळी पाच वाजता दरम्यान एका गुराच्या गोठ्याला मोठी आग लागली. या आगीत होरपळून जवळपास नऊ गोवंश जनावरे गंभीर जखमी झाले. पिंपरी चिंचवड महपालिकेच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली आहे. या गुरांच्या गोठ्याला आग कशी लागली हे अद्याप अनुत्तरीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com