Nagpur News : बस अडवून खिडकीवर चढला, प्रवाशांना मारहाण; अर्धनग्न होत तरुणाचा भररस्त्यात राडा, शेवटी....

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील सावनेर बसस्थानकावर एका मनोरुग्णाने अर्धनग्न अवस्थेत बसच्या खिडक्यांवर आणि दरवाज्यांवर उड्या मारत गोंधळ घातला. पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करून या युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Nagpur News Update
Nagpur NewsSaam Tv
Published On
Summary
  • सावनेर बसस्थानकावर अर्धनग्न अवस्थेत मनोरुग्णाने गोंधळ घातला.

  • बसच्या काचा आणि दरवाज्यांवर उड्या मारून प्रवाशांमध्ये भीती निर्माण केली.

  • युवक मध्यप्रदेशातील असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

  • सध्या त्याच्यावर मानसिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्ब्यात घुसून एका मनोरुग्णाने अश्लील वर्तन केले होते. अशीच एक डोक्यात तिडीक जाणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिह्यातील सावनेर बसस्थानकावर अर्धनग्न अवस्थेत असलेल्या एका मनोरुग्णाने गुरुवारी प्रचंड गोंधळ घातला. बसच्या खिडक्यांवर आणि दरवाज्यावर लटकून त्याने अश्लील वर्तन केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं ?

नागपूर जिल्ह्यातील सावनेर गावातील बस्थानकावर गुरुवारी दुपारच्या सुमारास एक मनोरुग्ण अर्धनग्न अवस्थेत फिरत होता. बस्थानकावर बस येताच त्याने बसच्या काचांवर उड्या मारत धिंगाणा घातला. तसेच प्रवाशांवर हल्ला देखील केला. त्यानंतर त्याने बसच्या दरवाजात उभे राहून अश्लील वर्तन केले. हा प्रकार जवळ जवळ ४५ मिनिटे असाच सुरु राहिल्याने बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Nagpur News Update
Nagpur : नागपुरात पुष्पा स्टाईल अंमली पदार्थांची तस्करी; भाजीपालाच्या ट्रकमध्ये सापडला 41,00000 रुपयांचा मुद्देमाल

या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.४५ मिनिटांच्या थरारक प्रयत्नानंतर पोलिसांनी २८ वर्षीय मानसिक रुग्ण नीरजला ताब्यात घेतलं. हा युवक मध्यप्रदेशातील नरसिंहपूर येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Nagpur News Update
Nagpur Police : दिल्लीवरून येत नागपुरात मेट्रो प्रवास; दुचाकी चोरून करायचे चैन स्नॅचिंग; आंतरराज्य टोळी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी नीरजला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्याला सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सध्या त्याच्यावर मानसिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. तसेच त्याच्या पालकांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र हा युवक मध्यप्रदेशातून नागपूरमध्ये कसा पोहचला? याचा तपास पोलीस करत आहेत.

Nagpur News Update
Nagpur Crime: दुकानामध्ये घुसून जीवघेणा हल्ला, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूरमध्ये खळबळ
Q

ही घटना नेमकी कुठे घडली?

A

नागपूर जिल्ह्यातील सावनेर बसस्थानकावर ही घटना घडली.

Q

हा युवक कोण होता?

A

पोलिस तपासात समोर आलं की, हा मनोरुग्ण युवक मध्यप्रदेशातील नरसिंहपूर येथील रहिवासी आहे आणि त्याचं नाव नीरज आहे.

Q

त्याने काय वर्तन केलं?

A

नीरज अर्धनग्न अवस्थेत बसस्थानकावर धिंगाणा घालत होता, बसच्या खिडक्यांवर उड्या मारल्या, प्रवाशांवर हल्ला केला आणि अश्लील वर्तन केलं.

Q

पोलिसांनी काय कारवाई केली?

A

४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com