ह्रदयद्रावक! वडिलांना Video Call केला अन् स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यानं मारली धरणात उडी

2013 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या एका तरुणाने परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून आपल्या वडीलांना व्हिडिओ कॉल करून आपलं आयुष्य संपवलं आहे.
Competition Test Student
Competition Test Studentअभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदियामध्ये 2013 पासून स्पर्धा परीक्षेची (Competition Test) तयारी करीत असलेल्या एका तरुणाने परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून आपल्या वडीलांना व्हिडिओ कॉल करून भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील कवलेवाडा धरणात उडी टाकत आत्महत्या केल्याची हद्रयद्रावक घटना घडली आहे.

मृतक तरूणाचे नाव कृषिलेष राजू कनोजे वय वर्ष 29 असं आहे. कृषिलेष हा B.com पदवीधारक असुन तो स्पर्धा परीक्षा देत होता. कृशीलेष हा सन 2013 पासून स्पर्धा परीक्षा देऊन सुद्धा त्याला या स्पर्धा परीक्षेत यश येत नसल्याने तो नेहमी नोकरीच्या चिंतेत असायचा.

पहा व्हिडीओ -

दरम्यान आज कृषिलेष हा घरी कोणाला काही न सांगता घरातील मोटरसायकलने कवलेवाडा धरणावर जावून आपल्या वडीलांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल (Video Call) करून सांगितले की, 'मी कवलेवाडा डँम येथे आत्महत्या करीत आहे.' असं सांगुन मोबाईलमध्ये व्हिडीओ कॉल रेकाँर्डिग करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्य़ेने सर्व जिल्हा हादरुन गेला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com