Lonavala MLA Sunil Shelke : तालुक्याची बदनामी थांबवा, नाहीतर अधिवेशनात तमाशा उघड करू: आमदार शेळके यांचा इशारा

MLA Sunil Shelke : लोणावळ्यात वाढत्या गुन्हेगारी प्रकारांवर आमदार सुनील शेळके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मटका, दारू, पावडर विक्री व चोरीच्या घटनांबाबत पोलिस प्रशासनावर थेट हल्लाबोल करत त्यांनी अधिवेशनात ‘तमाशा’ उघड करण्याचा इशारा दिला.
MLA Sunil Shelke
MLA Sunil ShelkeSaam Tv
Published On
Summary
  • लोणावळ्यात चोरी, मटका, दारू व ड्रग्सचे प्रकार वाढल्याने जनतेत असंतोष

  • आमदार सुनील शेळके यांचा पोलिस प्रशासनावर संतप्त हल्लाबोल

  • “गुन्हेगार कुठे आहेत हे आम्ही सांगतो,” असा इशारा आमदारांचा

  • अधिवेशनात पोलिसांची नाचक्की होऊ नये म्हणून कारवाईची मागणी

लोणावळ्यात वाढत्या चोऱ्या, सोनसाखळी हिसकावणे, खुलेआम मटका-जुगार, अवैध दारू आणि अंमली पदार्थांचा व्यापार तसेच ट्राफिक व्यवस्थेतील अकार्यक्षमता यामुळे संतप्त झालेल्या आमदार सुनील शेळके यांनी पोलिस प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे. अधिवेशनात पोलिसांची प्रशंसा करणारे शेळके यांनी आता मात्र त्यांच्याच कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, जनतेच्या असंतोषाला वाचा फोडली आहे.

“तक्रारींचा पाऊस पडतो, पण कारवाईचा मागमूसही नाही,” अशी टीका करत शेळके यांनी सांगितले की, शहरात गस्त घालणारे पोलीस आहेत की नाही, असा प्रश्न नागरिक विचारतात. गुन्हेगार सर्रास मोकाट फिरत आहेत आणि पोलिसांना कोणतीही माहिती नाही, हे अत्यंत धक्कादायक आहे, असे ते म्हणाले.

MLA Sunil Shelke
Lonavala To Nighoj : लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर पाहा नैसर्गाचे अदभूत सौंदर्य, One Day Trip साठी ठिकाण

त्यांनी थेट इशारा देताना सांगितले की, “सोनसाखळी चोर कुठे आहेत, दारू कुठे विकली जाते, पावडर कुठे मिळते, मटका कुठे चालतो हे आम्हाला माहीत आहे. जर पोलिसांना हे सापडत नसेल, तर आम्ही सांगायला तयार आहोत.” शेळके यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचे व्यक्तिशः कौतुक केले आणि त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड अधिकारी म्हणून संबोधले. मात्र, त्याचबरोबर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हा आदर म्हणजे दोष झाकण्याचं झाकण नव्हे. सन्मान आहे, पण भोंगळ कारभार सहन करणार नाही.”

MLA Sunil Shelke
Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

तालुक्याची बदनामी होऊ नये हे आपले सर्वांचेच दायित्व असल्याचे सांगून शेळके यांनी प्रशासनाला शेवटचा इशारा दिला की, जर परिस्थिती सुधारली नाही, तर पुढील अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रासमोर हा ‘तमाशा’ उघड केला जाईल. या वक्तव्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, आता पोलिसांची पुढील पावले काय असतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

Q

आमदार सुनील शेळके यांनी पोलिसांवर नेमकी काय टीका केली आहे?

A

शेळके यांनी वाढत्या चोरी, मटका, दारू व पावडर विक्रीसंदर्भात पोलिसांच्या भोंगळ कारभारावर थेट टीका केली आहे.

Q

गुन्ह्यांविरोधात पोलीस कारवाई करत नाहीत असे शेळके का म्हणाले?

A

त्यांनी म्हटलं की, तक्रारी वाढत असल्या तरी पोलीस कारवाई करत नाहीत. गुन्हेगार मोकाट सुटले असून, पोलिसांना माहिती नसल्याचं ते म्हणाले.

Q

शेळके यांनी पोलिसांना काय इशारा दिला?

A

त्यांनी स्पष्ट केलं की, जर पोलिसांना ठिकाणं माहित नसतील, तर आम्ही दाखवतो. परिस्थिती सुधारली नाही, तर अधिवेशनात सगळं उघड करणार.

Q

त्यांनी कोणाचं कौतुक केलं?

A

जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं कौतुक करत, त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड म्हटलं, पण स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com