Amravati Lok Sabha Election: मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही; अमरावतीत झळकले बॅनर्स

Amravati Politics News: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, त्याआधीच अमरावती शहरात नवनीत राणा यांच्याविरोधात बॅनर्स झळकले आहेत.
Navneet Rana Amravati News
Navneet Rana Amravati NewsSaam TV
Published On

Navneet Rana Amravati News

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू असून राजकीय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची नावे घोषित करण्यास सुरुवात केली आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, त्याआधीच अमरावती शहरात नवनीत राणा यांच्याविरोधात बॅनर्स झळकले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Navneet Rana Amravati News
Navneet Rana: राणा दाम्पत्याने साड्या वाटल्या की मच्छरदान्या? आदिवासी महिलांनी व्यक्त केला संताप, पाहा VIDEO

"मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही", असा मजकूर असलेले बॅनर्स अमरावतीच्या शहराच्या राजापेठ चौकात अज्ञात व्यक्तीने लावले आहेत. सध्या हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरत असून यामुळे राणा दाम्पत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा (Navneet Rana) राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरुन अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव आडसूळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला. आता त्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

यासाठी नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये कोणती चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नसले तरी लोकसभा निवडणुकीबाबतचं ही भेट होती, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.

अशातच, नवनीत राणा यांच्या भाजप उमेदवारीबाबत चर्चा रंगली असताना दुसरीकडे त्यांच्याविरोधात शहरात बॅनर्स झळकले आहेत. "मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही", असा मजकूर या बॅनर्सवर लिहण्यात आल्याने अमरावतीचे राजकीय वातावरण आणखीच तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आनंदराव अडसूळ यांच्या प्रचाराचे बॅनर्स देखील अनेक ठिकाणी झळकले आहेत.

Navneet Rana Amravati News
Amravati : भाजपचा अमरावती लोकसभेचा उमेदवार फिक्स? या नावाची होतेय चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com