Nilesh Lanke Oath Ceremony : सुजय विखेंच्या नाकावर टिच्चून निलेश लंकेंची शपथ; इंग्रजीतील शपथेवर शरद पवारही खूश, VIDEO

Nilesh Lanke vs Sujay Vikhe Patil : लोकसभेत सुजय विखेंच्या नाकावर टिच्चून खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. लंके यांच्या इंग्रजीतील शपथेवर शरद पवारही खूश झाले आहेत.
सुजय विखेंच्या नाकावर टिच्चून निलेश लंकेंची शपथ; इंग्रजीतील शपथेवर शरद पवारही खूश
Nilesh Lanke Oath Ceremony Saam tv

नवी दिल्ली : अहमदनगरचे विजयी उमेदवार निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इंग्रजीवरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये कलगीतुरा रंगला होता. त्यामुळेच लंकेंनी सुजय विखेंच्या नाकावर टिच्चून इंग्रजीत शपथ घेतल्याचं बोललं जात आहे. तर निलेश लकेंच्या शपथेवर शरद पवारही खूश झाले आहेत.

इंग्रजीमध्ये खासदारकीची शपथ घेत अहमदनगरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 18 व्या लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या नवनिर्वाचितांचा शपथविधी पार पडला. निलेश लंकेंनी थेट इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखेंसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

सुजय विखेंच्या नाकावर टिच्चून निलेश लंकेंची शपथ; इंग्रजीतील शपथेवर शरद पवारही खूश
Maharashtra Politics: काँग्रेस ठोकणार विधानसभेच्या थेट ८४ जागांवर दावा, दिल्लीच्या बैठकीत काय झाली चर्चा? वाचा...

अहमदनगर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी खासदार सुजय विखे यांनी निलेश लंकेंवर वेगवेगळ्या मुद्द्यावरुन निशाणा साधला होता. निलेश लंकेंनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हानही सुजय विखेंनी दिलं होतं. मात्र, निलेश लंकेंनी विखे पाटलांचा 28 हजार मतांनी धुव्वा उडवला.

विजयानंतरही लंकेंनी अनेक ठिकाणी इंग्रजीमधूनच संसदेत भाषण करणार, प्रश्न विचारणार असं म्हटलं होतं. अखेर लंकेंनी विखेंच्या नाकावर टिच्चून इंग्रजीतून शपथ घेत आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीची सुरुवात केली. यामुळे शरद पवारही चांगलेच खूश झाले.

सुजय विखेंच्या नाकावर टिच्चून निलेश लंकेंची शपथ; इंग्रजीतील शपथेवर शरद पवारही खूश
Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षांची निवड कशी होते? कशी असते प्रक्रिया जाणून घ्या

नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेत विखेंना खिजवलंय.आधी सुजय विखेंना पराभूत करत लंकेंनी नगरी दणका दिला. आता इंग्रजीत शपथ घेऊन त्यांनी विरोधक आणि टीकाकारांना चांगलाच घाम फोडला आहे. आगामी काळात नगरचे प्रश्न सोडवण्यासाठीही लंकेंकडून असाच धडाका अपेक्षित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com