

ऐन निवडणुकीत महाबळेश्वरचा पारा चढला
एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर राजकीय वातावरण तापलं
अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश
अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं
ओंकार कदम, सातारा | साम टीव्ही
मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमधील राजकीय वातावरण ऐन पालिका निवडणुकीत तापलं आहे. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार मदनदादा भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, शनिवारी महाबळेश्वर दौऱ्यावर आले होते. त्यांनी शिवसेना पक्षप्रवेश कार्यकर्ता मेळाव्यात हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री शंभुराजे देसाई हे देखील उपस्थित होते. भाजपचे नेते माजी आमदार मदनदादा भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावांतील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. लाडकी बहीण योजनेविषयी भाष्य करत ही योजना कधीही बंद पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमधील नगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानं तेथे मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिंदे यांच्या दौऱ्यानंतर थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचं राजकारण तापलं आहे. मदत व पुनर्वसन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तेथील दिग्गज नेते मकरंद पाटील यांच्या चिंतेतही वाढ झाल्याचे बोलले जाते. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.