Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; बीडमधील बडा नेता भाजपच्या वाटेवर, राजकीय समीकरण बदलणार

ajit pawar group : अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बीडमधील बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
ajit pawar News
ajit pawar groupSaam tv
Published On
Summary

बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

योगेश क्षीरसागर भाजपच्या नेतृत्वाखाली बीड नगरपरिषदेची निवडणूक लढण्याची शक्यता

योगेश काशिद, साम टीव्ही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. बीडमध्येही निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. बीडमधील बडा नेता भाजपच्या गाळाला लागल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाचे महत्वाचे नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नेत्याच्या पक्षांतराच्या भूमिकेने बीडमध्ये भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. योगेश क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती हाती आली आहे. नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांनी हस्तक्षेप केल्याने योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात बीड नगर परिषदेची निवडणूक योगेश क्षीरसागर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली. योगेश शिरसागर यांनी अजित पवार गटाकडून बीडची विधानसभेची निवडणूक लढवली होती.

ajit pawar News
Tamil Nadu Aircraft Crash : मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे विमान तामिळनाडूत कोसळलं

बीडमध्ये अजित पवारांच्या घड्याळाला तडे

बीडमध्ये मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. बीड नगर परिषदेमध्ये नेतृत्वाच्या संघर्षामध्ये राष्ट्रवादी अजित पवारांची घड्याळाला तडे जाताना पाहायला मिळत आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड नगर परिषदेमध्ये हस्तक्षेप केल्याने योगेश क्षीरसागर नाराज असल्याची चर्चा आहे.

ajit pawar News
Bihar Politics : बिहारच्या विजयानंतर भाजपची मोठी कारवाई; आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसहित तिघे पक्षातून निलंबित

योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. योगेश क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करून नगरपरिषदेची निवडणूक मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे बीडमधील राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com