satara , leopard
satara , leopardsaam tv

Satara News : किल्ले अजिंक्यताराहून शिकारीसाठी आला बिबट्या अन्...

रात्री शिकारीच्या शोधात हा बिबट्या या रस्त्यावर आला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Published on

Leopard Cub : सातारा शहराजवळ असणाऱ्या खिंडवाडी येथे साेमवारी रात्री पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या (leopard) ठार झाला. या घटनेची माहिती वनविभागाला (forest department) समजताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पाेहचले. त्यांनी परिसराची पाहणी केली. (Breaking Marathi News)

वनविभागानं दिलेल्या माहितीनूसार मृत्यू झालेला बिबट्या हा नर जातीचा आहे. त्याचे वय अंदाजे दोन वर्ष आहे. दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी याला तात्काळ गाडीत घालून शवविच्छेदनासाठी वनविभागाच्या वैद्यकीय विभागात ठेवण्यात आले. (Maharashtra News)

satara , leopard
Kass Pathar : पर्यटकांनी बहरलं 'कास'; पठारावरील फुलं हिरमुसली (पाहा व्हिडिओ)

अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणाहून राष्ट्रीय महामार्गापर्यंत या बिबट्याचा आधिवास होता. रात्री शिकारीच्या शोधात हा बिबट्या या रस्त्यावर आला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

satara , leopard
Love : अख्या साता-यात रंगलीय त्याच्या प्रेमाची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com