परभणी : पालम Palam शहरापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या लेंडी नदीला lendi River पहाटेच्या सुमारास जोरदार पावसामुळे Heavy Rain पूर आला आहे. यामुळे ऐन पोळा सणाच्या दिवशी ५ गावांचा पालमशी संपर्क तुटला आहे. दिवसभर पूर ओसरण्याची शक्यता नाही. रात्रीच्या सुमारास पालम तालुक्यातील ग्रामीण Rural भागात अतिमुसळधार पाऊस पडला आहे.
हे देखील पहा-
त्यामुळे नदी ,नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. मागील २ महिन्यांपासून पावसाने शेतकऱ्यांना farmers जेरीस आणले आहे. पालम ते जांभूळ बेट Jambhula bet रस्ता वर लेंडी नदीच्या पात्रात कमी उंचीचा आणि जुनाट नळीचा पूल असून, नळ्या मातीने भरुन गेल्या आहेत. थोडा पाऊस पडताच हा रस्ता पूलावर पाणी येऊन वाहतूक बंद पडत आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाने पहाटेच्या वेळेस पूलावर पाणी वाढण्यास सुरुवात झाली होती.
काठोकाठ पूराचे पाणी वाहत असल्याने रस्ता बंद पडला आहे. यामुळे फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड आणि उमरथडी या पाच गावांचा संपर्क तुटला आहे. पोळा सण असल्याने ऐन याच दिवशी रस्ता बंद पडून संपर्क तुटला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आणि दळणवळण प्रक्रियेला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.