पुढाऱ्यांनी आता मराठा समाजाला फसवू नये- छत्रपती संभाजीराजे

ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जातीविषमता दूर करण्यासाठी, माझा हा लढा असून, कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही.
पुढाऱ्यांनी आता मराठा समाजाला फसवू नये- छत्रपती संभाजीराजे
पुढाऱ्यांनी आता मराठा समाजाला फसवू नये- छत्रपती संभाजीराजेविनोद जिरे
Published On: 

विनोद जिरे

बीड : ओबीसी OBC समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जातीविषमता दूर करण्यासाठी, माझा हा लढा असून, कुठल्याही पक्षाच्या Party विरोधात माझा लढा नाही. लोकप्रतिनिधींनी आता मराठा Maratha समाजाला वेठीस धरू नये.

सगळ्या पुढाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करून आरक्षणाचा reservation प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे. असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. ते बीडमध्ये Beed पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की मी शिव आणि शाहूंचा वंशज आहे. अठरा पगड जातीला एकत्र करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे.

हे देखील पहा-

ओबीसीला दुखावून, मी कोणतही काम करू शकत नाही. त्यामुळे मी तसं बोललो. असे म्हणत संभाजीराजेंना मुख्यमंत्री CM करा. या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे, तर या पुढाऱ्यांनी आता समाजाला फसवू नये. जे खर आहे ते सांगावं. 102 व्या घटना दुरूस्तीचे राज्याचे अधिकार Rights संपुष्टात आले आहेत.

पुढाऱ्यांनी आता मराठा समाजाला फसवू नये- छत्रपती संभाजीराजे
मला मुख्यमंत्री करा बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो - छत्रपती संभाजीराजे

मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा दिला, तर मार्ग निघणार का? निघत असेल, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. पवार साहेबाची मी भेट घेतली, ते मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक आहेत. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्यात मी पाठीशी आहे. ओबीसींच्या राजकीय Political आरक्षण संदर्भात माझा अभ्यास सुरू आहे. मात्र, बहुजनांच्या प्रश्नासंदर्भात सदैव त्यांच्या पाठीशी आहे. असे संभाजीराजे यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com